डॉ. दिलीप पाटील

डॉ. दिलीप पाटील
प्राध्यापक डॉक्टर दिलीप शंकरराव पाटील हे मुंबई विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक म्हणून २००६ पासून आतापर्यंत गेली १५ वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३१४ महाविद्यालयांमधून ३४७८६ विद्यार्थी व ९०० शिक्षक कोकण विभागात विस्तार कार्यचे काम करीत आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि जनता यांच्याकरिता विविध प्रकल्प राबवित आहेत. त्यात ‘कौशल्य विकास’, ‘व्यवसाय मार्गदर्शन’, ‘उद्योजकता’, ‘माहिती तंत्रज्ञान’, ‘लोकसंख्या शिक्षण’, ‘समाजातील महिलांची स्थिती’, ‘औद्योगिक क्षेत्रातील कार्यानुभव’, मुक्त शिक्षण म्हणजे होम स्कूलिंग’ अशा विविध प्रकल्पांचा समावेश होतो.
प्राध्यापक पाटील यांनी ‘ग्रामीण विकास’ विषयातील पीएचडी करिता एकूण १५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यामधील सात विद्यार्थ्यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान झालेली असून, आठ विद्यार्थी सक्रिय आहेत.
सेंट जोसेफ महाविद्यालय महाविद्यालय आगाशी विरार पश्चिम येथे ते २००४ ते २००६ अशी तीन वर्षे प्राचार्य पदावर कार्यरत होते तसेच १९९० ते २००४ सेंट जी जी महाविद्यालय वसई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणुन त्यांनी कार्य केले आहे.
ग्रामीण विकास विषयावर त्यांनी पंधरा पुस्तके लिहिलेली आहेत. पंडित मदन मोहन मालवीय नेशनल मिशन फोर टीचर्स ट्रेनिंग, भारत सरकारसाठी ते प्रशिक्षक म्हणूनही कार्य करतात. कम्युनिटी डेव्हलपमेंट सोसायटी, अमेरिका या संस्थेच्या संचालक मंडळावर आशिया विभागाचे प्रतिनिधित्व ते करत आहेत.
प्राध्यापक पाटील हे मूळचे सोनवडे, बांबवडे तालुका, शाहूवाडी जिल्हा, कोल्हापूर येथील असून, मुंबई विद्यापीठातून त्यांनी बीए अर्थशास्त्र व राज्यशास्त्र बी ए ग्रामीण विकास, एम ए ग्रामीण विकास, एम बी ए पी एच डी ग्रामीण विकास या पदव्या प्राप्त केलेलया आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण याचा त्यांना तीस वर्षाचा अनुभव आहे.
शिक्षणासोबतच अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असून गेल्या ४० वर्षांपासून निर्मिती फाउंडेशन या राष्ट्रीय सेवा योजना रुईया महाविद्यालय मधून निर्माण झालेल्या स्वयंसेवी संस्थेचे ते सध्या अध्यक्ष असून त्यांचे कार्यक्षेत्र वसई तालुक्यातील पूर्वेकडचा आदिवासी डोंगराळ भाग आहे.
पाटील यांना १९८४ ते १९९० अशी सहा वर्षं जमनालाल बजाज प्रतिष्ठानची पूर्णवेळ कार्यकर्त्याची फेलोशिप मिळाली होती. त्याद्वारे त्यांनी ‘शिक्षण युवा व ग्रामीण क्रिडा’, ‘महिला व बालकल्याण’, ‘सामाजिक वनीकरण’, ‘समुचित तंत्रज्ञान’, ‘सांडपाणी’, ‘पशुसंवर्धन व्यवस्थापन’, ‘शौचालय’, ‘गोबर गॅस’ इत्यादी प्रकल्प राबविले आहेत.
प्राध्यापक पाटील यांनी संसद आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत सोनवडे गावी ‘पेयजल विकास योजना’, ‘पाटबंधारे’, ‘व्यायाम शाळा’, ‘अंगणवाडी’, ‘दलितवस्ती सुधार कार्यक्रम’, ‘ग्रामपंचायत इमारत बांधकाम’, ‘शोषखड्डे’, ‘तलाव बांधणे’ इत्यादी कामे केली आहेत.
करोना काळात त्यांनी कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये सतरा हजार पाचशे असे ‘अर्सेनिक अल्बम’ औषध वाटपाचे काम केलेले आहे.
प्राध्यापक पाटील यांनी पंधरा देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून संशोधन पेपरचे वाचन केलेले आहे.