S R Dalvi (I) Foundation

प्रा. डॉ. अरुण पांडुरंग

प्रा. डॉ. अरुण पांडुरंग

प्रा. डॉ. अरुण पांडुरंग माळी हे मुंबई विद्यापीठाशी सलग्न असलेल्या संत. गोंसलो गर्सिया महाविद्यालय वसई, येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून 1993 पासून   27 वर्षे कार्यरत आहेत..

प्राध्यापक अरुण माळी  यांनी ‘ग्रामीण विकास’ विषयातील पीएचडी करिता एकूण चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

त्यांचे एकूण बारा शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत तसेच एक लघू शोधनिबंध मुंबई विद्यापीठास सादर केला आहे.

 

संत गोंसलो गर्सिया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाचे समन्वयक म्हणून 2006 पासून कार्यरत

महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स व डिसिप्लिन विभागाचे प्रमुख, कल्चर विभागात सक्रिय सहभाग.

 

सेंट जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा, विरार, पश्चिम येथे ते 1997 ते 2000 अशी चार वर्षे  तासिका तत्त्वावर अध्यापनाचे कार्य केले आहे.

 

प्राध्यापक अरुण माळी यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला असून ते मूळचे शिरगांव, तालुका, जिल्हा पालघर, येथील असून, मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी. ए. अर्थशास्त्र व ग्रामीण विकास, एम, ए., ग्रामीण विकास, पी. एच. डी. ग्रामीण विकास या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण याचा त्यांना बावीस वर्षाचा अनुभव आहे.

 

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल अंड इकॉनोमिक रिफॉर्म, बेंगलोर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लाइफ टाइम अचीव्हमेंट नॅशनल अवॉर्ड 2019

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय नामवंत पुरस्कार 2020

 

शिक्षणासोबतच अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असून ते  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक म्हणून त्यांनी वीस वर्षे कार्य केले आहे. त्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभाग मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून सन्मानित केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये त्यांनी निवासी शिबीरे तसेच जिल्हास्तरीय, विद्यापीठ स्तरीय व राज्यस्तरीय शिबिरे आयोजित करून त्याद्वारे त्यांनी सेंद्रिय शेती, सार्वजनिक आरोग्य, महिला सबलीकरण, पंचायत राज, आदिवासी युवकांना रोजगार प्रशिक्षण इत्यादी विविध विषयांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे.

आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनात पदवीधर आदिवासी युवकांचा सहभाग वाढावा म्हणून ग्लोबल अॅप्रोच फोर रुरल डेवलोपमेंट या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व खजिनदार.

 

वसई तालुक्यातील राणगाव ग्रामपंचायतीमधील18 बचतगट स्थापनेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

 

पद्मश्री अनुताई वाघ यांच्या ग्राममंगल या स्वयंसेवीसंस्थेचे 1991ते 1992 दोन वर्ष व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

 

पालघर जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य,

श्री गणेश बिगरशेती पतसंस्था शिरगाव जिल्हा पालघर, संस्थापक व माजी सदस्य

एड्स या विषयावर कार्य करणाऱ्या वसई  विरेक्स या स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार समिती सदस्य म्हणून कार्यरत.

सोरठी माळी समाज कल्याणकारी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत