S R Dalvi (I) Foundation

[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”सीमा नितीन शेडगे” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1624605505922{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”5469″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”सीमा नितीन शेडगे, संचालिका सुविद्या इंग्लीश मिडीयम स्कूल, मुरुड जंजिरा” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]मी सीमा नितीन शेडगे, संचालिका सुविद्या इंग्लीश मिडीयम स्कूल, मुरुड जंजिरा, रायगड

मुरुड मध्ये त्यावेळी नर्सरी प्ले गृप ही कन्सेप्ट फारशी कोणाला माहिती नव्हती, मुलांना डायरेक्ट ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश घेतला जायचा तेही एकमेव मुस्लिम समाजातील मॅनेजमेंट असलेली इंग्लिश मिडीयम स्कूल होती त्यामुळे बहुतांशी लोकांचा कल मुलांना फक्त मराठी मिडीयम मध्ये प्रवेश घेण्याकडे असायचा , अशातच 2002 साली माझ्या लहान मुलीच्या जन्मानंतर 2004 साली तिच्या प्ले गृप नर्सरी च्या प्रवेशाचा प्रश्न उभा  राहिला तेव्हा आपण स्वतःच प्ले ग्रुप नर्सरी सुरू करण्याची संकल्पना डोक्यात आली व 2004 साली मुरुड मध्ये प्रथमच फक्त पाच विद्यार्थी मिळवून प्ले ग्रुप नर्सरी सुरू केली नंतर वर्षभरामध्ये 15 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यानंतर शिक्षणपद्धती आवडल्याने लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला मी स्वतः यावर अभ्यास करून प्रचंड मेहनत घेत होते, काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत होते, मुंबई सारख्या शहरांतील नर्सरीमध्ये भेट देऊन तेथील कार्य पद्धतीचा अभ्यास करीत होते , विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्याने बॅचेस कराव्या लागल्या, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी असे करता करता पालकांच्या आग्रहास्तव प्रायमरी विभाग म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवी साठी शासन मान्यता मिळवली व 2014 साली पहिली ते पाचवी चे वर्ग सुरु केले, स्टाफ वाढला, पुढे नैसर्गिक वाढीत आता इयत्ता दहावी पर्यंत वर्ग सुरू असून प्रि प्रायमरीच्या नांदगाव व रेवदंडा येथे दोन शाखा सुरू केल्या आज जवळपास पाचशेच्या वर विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत असून शाळेमुळे 32 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, तसेच शाळेला कॉमर्स व सायन्स विभागातुन ज्युनिअर कॉलेज ची मान्यता मिळाली असून लवकरच ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे. मुरुडमध्ये ज्युनिअर केजी पासून Cursive handwriting आम्ही प्रथम सुरू केले , अभ्यासासोबत मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्याकडे आमचा नेहमीच कल असतो , शाळेमध्ये कराटे, स्केटिंग , नेमबाजी, मल्लखांब यांचे खास प्रशिक्षण मुलांना दिले जाते, मल्लखांब हा लोप पावत चाललेला व्यायाम प्रकार तसेच नेमबाजी, स्केटिंग या सारख्या खेळांची मुरुड तालुक्यातील मुलाना आमच्या शाळेतूनच प्रथम ओळख झाली. बुद्धिबळ, कॅरम व इतर सर्व खेळांमध्ये जिल्हा तसेच स्टेट लेव्हल पर्यंत विद्यार्थी बक्षिसे मिळवितात, शाळेत मुलांना गायन शिकवले जाते, मुलांचा शैक्षणिक विकास व त्यांच्या बुद्धिमत्तेचे निकष हे अनेक स्पर्धात्मक परिक्षांमधून मार्गी लागत असतात, मुलांना इंग्रजीतुन संवाद घडवून आणण्यासाठी शिक्षक वृंद अथक परिश्रम घेत असतात , मुंबई पुणे शहरापासून पासून लांब असलेले हे मुरुड गाव येथे इंग्रजीतून शिक्षण, वेगवेगळे खेळ, वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम, प्रोजेक्टर द्वारे शिक्षण या व अश्या अनेक गोष्टी आम्ही लोकांसमोर आणल्या. शिक्षण, खेळ या बरोबरच संस्कारांना महत्व दिले जाते, त्यासाठी ग्रँड पँरेंट्स डे, मदर्स डे, फादर्स डे सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, मुलांच्या मनात देशभक्ती जागृत करण्यासाठी ‘सँलूट इंडिया’ सारखे कार्यक्रम आयोजित करून सैनिकांना मानवंदना व सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार केला. मुलांना नात्यांची ओळख व जाणीव राहण्यासाठी संपूर्ण वार्षिक स्नेहसंमेलन 2019-20 साली ‘ रिश्ते ‘  या थीम मध्ये साजरी केली. दर वर्षी बालदिनाच्या दिवशी शाळेमार्फत आदिवासी वाड्यांवर खेळणी, खाऊ, कपड्यांचे वाटप विद्यार्थी करतात, तसेच विद्यार्थ्यांना शेतीविषयी जवळून ओळख व्हावी यासाठी मुलांना शेतावर भात लावणीच्या वेळी नेऊन त्यांना प्रात्यक्षिक दाखविले जाते. नेहरू सायन्स सेंटर, मुंबई येथून प्रथमच त्यांची मोबाईल व्हॅन मागवून मुलांना वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग व मॉडेल्स यांची ओळख करून दिली तसेच इतर शाळेतील विद्यार्थ्यांना ही त्याचा लाभ मिळवून दिला. विज्ञान प्रदर्शनात मुले मोठ्या संख्येने भाग घेतात. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळेला सतत चार वर्षे ‘अ ‘ श्रेणी दर्जा प्राप्त झाला आहे तसेच गोल्डन स्कूल अवॉर्ड व असे अनेक पुरस्कार शाळेला प्राप्त झाले आहेत. शाळेमार्फत प्लास्टिक बंदी, स्वच्छता तसेच इतर सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी पथनाट्य, फ्लॅश माँब सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, अश्याच प्रकारचे दर्जेदार शिक्षण व कार्यक्रम नांदगाव व रेवदंडा येथेही आयोजित करून विद्यार्थी घडविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे , याची दखल घेऊन मुंबई मधील अर्थ संकेत या संस्थेमार्फत माझा सत्कार ही करण्यात आला होता.

अशा हुंहार शिक्षिकेला त्यांच्या कार्याबद्दल दळवी फौंडेशन चा सलाम.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]

Scroll to Top