S R Dalvi (I) Foundation

Tr. Mahesh Ladu Sawant

Mahesh Sawant - Teachers community NGO

TR MAHESH LADU SAWANT

मी महेश सावंत. सिंधुदुर्ग या ठिकाणी राहतो.गेले १९ वर्षे मी शिक्षक क्षेत्रात काम करत आहे. या १९ वर्षात मी एकूण ४ शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केले असून गेल्या ३ वर्षापासून सिंधुदुर्ग येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमळे नं.२ या शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

मी स्वतः शाळेत असताना जेव्हा शिक्षकांना पहायचो तेव्हा मला नेहमी असे वाटायचे की आपण ही मोठे होऊन शिक्षक व्हायच. माझी स्वतःची एक बहिण ही शिक्षिका आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना मला डॉक्टर ही व्हावेसे वाटले होते पण त्यासाठी खुप खर्च येणारा होता म्हणून मी सुरवातीला ठरवलेला पर्याय निवडला आणि शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का? 

अजिबात नाही. कोर्स ला प्रवेश घेण्यापासून ते अगदी शिक्षण पूर्ण होईपर्यन्त मला कधीच कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. शिक्षण झाल्यावरही मला एका वर्षाच्या आत जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.

शिक्षक म्हणून १९ वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे 

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ,Canadian Teachers Federation आणि एज्युकेशन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी Professional Development Program आयोजित केला जातो. त्यामध्ये काही ठराविक शिक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. 2018 साली दिल्लीला झालेल्या या खास प्रोग्राम मध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान मला Canadian शिक्षकांकडून खुप नव्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. माझ्या शिक्षक प्रवासातील हा अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय गोष्टींपैकी एक आहे.

तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती? 

मला महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार , आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच माझा एक विद्यार्थी सध्या तामिळनाडू येथे एका मोठ्या पोस्टवर कार्यरत आहे ही गोष्ट  सुद्धा माझ्यासाठी कोणत्या ही   Achievement पेक्षा कमी नाही.

शिक्षक-विद्यार्थी  यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?

ग्रामीण भागात शिक्षकांना मिळणारे अनुदान खुप कमी आहे असे मला वाटते. त्याबद्दल काही तरी विचार व्हावा. तसेच शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत जास्त सुविधा आहेत. ग्रामीण भागात ही शाळांना आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढ व्हायला हवी. कोविड मुळे ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आली मात्र ग्रामीण भागात पालकांकडे साधे फोन ही मुश्किलीने असतात त्यामुळे आपल्या पाल्याला ऑनलाइन शिकण देणे ही त्यांच्यासाठी मोठी समस्या होती. तसेच ऑनलाइन शिक्षण होत असल्याने इंटरनेटची सुविधा ही तेवढी चांगली असणे गरजेचे आहे मात्र ग्रामीण भागात इंटरनेट वापरताना खुप अडचणी येतात त्यामुळे ऑनलाइन अभ्यास शिकत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. शाळा बंद होत्या त्यामुळे ऑनलाइन शिकवणे हा नक्कीच चांगला  पर्याय होता मात्र ग्रामीण भागात ते तितकेसे सोपे नव्हते.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?

सर्वात प्रथम मी हेच सांगेन की, बदल स्विकारायला यायला हवा. मी या क्षेत्रात पदार्पण केले त्या वेळची परिस्थिती आणि आताची या क्षेत्रातील परिस्थिती यामध्ये खुप मोठा बदल झाला आहे. आणि आपल्याला वेळेनुसार बदल स्विकारणे गरजेचे आहे. ज्यांना या क्षेत्रात यायचे आहे त्यांनी स्वतःमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण करा. सगळ्या क्षेत्रातील माहिती मिळवत रहा. कोणताही विद्यार्थी कधीही काही प्रश्न विचारु शकतो तेव्हा आपल्याकडे त्याचे उत्तर असणे गरजेचे आहे. तसेच हल्लीचे जग हे टेक्नोसॅव्ही आहे त्यामुळे आपल्यालाही त्याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे. सगळ्या प्रकारचे ज्ञान आपल्याकडे असणे हे कधीही उत्तमच.
English Marathi