मी लिंबराज गणपतराव बोंडगे उदगीर जिल्हा लातूर येथे राहतो. मला शिक्षण क्षेत्रात 14 वर्षाचा अनुभव असून मी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक आश्रम शाळा उदगीर या शाळेत ज्ञान दानाचे कार्य करतो.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
माझं मूळ गाव उजनी हे एक खेडेगाव होतं या गावातील क्वचित लोक नोकरी करत व इतर लोक शेती व मजुरी करत या गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शाळा होती येथील सर्व शिक्षक हे गावातच राहायचे, म्हणतात ना शिक्षक हा समाजशील प्राणी आहे अगदी त्याप्रमाणे गावातील सर्वच शिक्षक गावच्या कार्यात, अडीअडचणीत, सुखा-दुःखात सोबत राहायचे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावण्याचे काम त्यांनीच गावकऱ्यांनीच केले त्यांच्यामुळेच लहान असल्यापासूनच मला शाळा, गुरुजी खूप आवडू लागले त्यांना समाजात असणारे आदराचे स्थान पाहून तेव्हाच मी पण शिक्षक व्हायचे ठरवले. आणि माझे हे स्वप्न मी पूर्ण केले.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
शिक्षक या क्षेत्राची निवड झाली त्या दिशेने शिक्षण चालू झाले डीएड पूर्ण केले. मात्र नोकरी साठी अनेक ठिकाणी इंटरव्यू द्यावे लागले होते . अखेर बरेच इंटरव्यू दिल्यानंतर प्राथमिक आश्रम शाळा येथे शिक्षक म्हणून नोकरी मला मिळाली आणि तिथे रुजू झालो.
शिक्षक म्हणून 14 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
माझ्या शाळेची मान्यता गेल्यानंतर मी व माझ्या सहकाऱ्यांनी मिळून खूप स्ट्रगल करून पुन्हा शाळा मिळवली व पुन्हा शिक्षक म्हणून रुजू झालो. तो क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे.
तुमची आत्तापर्यंतची मोठी Achievement कोणती?
SR Dalvi Foundation कडून मला देण्यात आलेला ‘महा शिक्षक’ पुरस्कार हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचे एक मोठी Achievement आहे.
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?
माझ्या मते समाजात विद्यार्थ्याकडे फक्त गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर त्याला सुसंस्कारित नीतिमूल्यांची जोपासना करणारा खरा माणूस बनवण्याचे महान कार्य शिक्षक का कडून अपेक्षित आहे कारण शिक्षक हाच समाजात परिवर्तन घडवून शकणारा समाजशील प्राणी आहे. यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल होणे गरजेचे आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
ज्यांना शिक्षक व्हायचे असेल त्यांना मी एवढेच सांगेन समाजात राहून सामाजिक कार्य सोबत शैक्षणिक कार्य करता येण्याचे पवित्र क्षेत्र म्हणून या क्षेत्राची ओळख आहे एका शिक्षकातून च भारताचा राष्ट्रपती झालेला आपण पाहिले आहे त्यामुळे हे क्षेत्र खूप चांगले आहे.