आज आपण शिक्षक श्री. गणेश गोविंद कुलकर्णी (M.Sc.B.Ed.Dip.V.G.DIP.S.M. MSCIT) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक गणेश हे रत्नागिरीत राहत असून त्यांना अध्यापनाचा एकूण 23 वर्षांचा अनुभव आहे , .ग .ज .तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरी आगर, ता.गुहागर.जि. रत्नागिरी येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत . त्यांच्या कुटुंबात दोन काका, भाऊ व वहिनी व बहीण हे सर्वच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने लहानपणापासूनच शिक्षक होण्याची इच्छा होती . शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्य्यांना नोकरी मिळाली .
अचीवमेंट:
सुरुवातीला काही वर्षे त्यांनी विनाअनुदान तत्वावर काम केले.
त्यांची शाळा साध्या मोठ्या घरात सुरुवातीला भरत असे. काही वर्ग पडवीत बसत असत परंतु नवीन प्रशस्त इमारत संस्थेने बांधून दिली व तिचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले . नवीन सुसज्ज अशा इमारतीत अध्यापन करणे हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय होता .त्यांना गणित, विज्ञान व व्यवसाय मार्गदर्शन या तिन्हीही विषयांचा राज्य साधन व्यक्ती होता आले आहे हीच सर्वातमोठी Achievement वाटते .गणित विषयासाठी मास्टर ट्रेनर व कुप्पम येथोल ज्ञानरचनावादाचे प्रशिक्षण ही सुद्धा त्यांच्यासाठी मोठी achievement आहे .
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काय बदलण्याची गरज वाटते:
सध्याचे विद्यार्थी तंत्रज्ञानात पारंगत आहेतच परंतु त्याला संस्काराची जोड असणे आवश्यक वाटते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी असे वाटते . शिक्षकांनी समाजाप्रती संवेदनशील असायला हवे .
शिक्षक होणाऱ्यांना काय सल्ला दयाल:
नव्याने या क्षेत्रात प्रवेश करताना हे क्षेत्र आवडीने निवडणे आवश्यक असून तंत्रस्नेही असायला हवे . विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जाणता यायला पाहिजे .या क्षेत्रात तुमची devotionally काम करण्याची तयारी पाहिजे .