श्री. रवींद्र दत्तात्रय इनामदार. यांचे शिक्षण- बी.एस.सी.बी.एड झाले आहे.
श्रीमती रा.गो.जागुष्टे हायस्कूल कुवारबाव या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते . त्यांना शिक्षण क्षेत्रात एकूण 29 वर्षांचा अनुभव आहे . मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जागुष्टे हायस्कूल येथे 3 वर्षे काम केले . सेवेत असताना ते बर्याच वेळा राज्य स्तरीय मार्गदर्शक होते . जिल्ह्यातील विविध प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ, माजी विद्यार्थी मंडळ शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी आणि इतर अन्य संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षकांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.
रवींद्र सरांचे वडील कै.दत्तात्रय इनामदार हे स्वातंत्र्य सैनिक होते . समाजसेवेची आवड असल्यामुळे बी.एस.सी.नंतर कोकणात शिक्षक म्हणून ते हजर झाले. त्यांच्या जीवनप्रवासातील अविस्मरणीय अनुभव असा आहे की , त्यांच्या शाळेत शिंदे नावाचा विद्यार्थी होता. त्याच्या मेंदूत एक गाठ होती पालक गरीब त्यांचाही प्रयत्न होता त्याला बरे करण्यासाठी सिव्हिल हाँस्पीटल रत्नागिरी, मुंबई येथील दवाखान्यात ट्रिटमेंट देऊन बरे केले यासाठी त्यांना शिक्षक, समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि लोक प्रतिनिधींचे चांगले सहकार्य लाभले. त्यांना एड्स जनजागृती बद्दल मुंबई येथील आंबेडकर ट्रस्ट चा पुरस्कार मिळाला आहे.
शिक्षकांना त्यांनी असा सल्ला दिला आहे की , शिक्षकांसाठी ज्ञानाचा प्रस्फोट झाला आहे. आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे.राष्ट्रनिर्मिती मध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थी-गुणवत्तेबरोबर संस्काराची शिदोरी असावी. भारताचा आदर्श नागरिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे. पर्यावरण संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे .