नमस्कार मी श्री. अजित तुकाराम सावंत ( BA-राज्यशास्त्र ,M A- मराठी .I T I,NCVT,POT ) मी गेले 2४ वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या I T I COLLEGE GOVANDI येथे शिक्षक म्हणून कार्य करत आहे.
घरची परिस्थिती गरिबीची होती अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे तेव्हा पासूनच माहित होते त्यामुळे करीअर ,पैसा याची गरज म्हणून नोकरी स्विकारली.
शिक्षक म्हणून माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे माझे माजी विद्यार्थी इस्रो सारख्या संस्थेत काम करतात.कांही नामांकीत कंपनित काम करतात.काही बिझीनेसमॕन झालेत.कधी भेटले तर आवर्जून पाया पडतात.त्यावेळी मला माझ्या क्षेत्राचा अभिमान वाटतो.
नोकरी मिळाल्यानंतर माझ्या पहील्या कमाईने मी स्वतःसाठी रु.५००/- चे स्पोर्ट शुज घेतले.तो क्षण माझ्यासाठी एक अचिव्हमेंटच होती.कारण स्वतःची कमाई. पहील्यांदा स्लिपर ,चप्पल ऐवजी पायात वयाच्या २५ व्या वर्षी शुज घातले होते.
मला असे वाटते कि समाजात शिक्षक हा संवेदनशिल व विद्यार्थी सृजनशिल असायला हवा. विद्यार्थ्यांना नवीन तांत्रिक ज्ञान देणे हि आता काळाची गरज आहे .
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना मला एकच सल्ला द्यावासा वाटेल तो म्हणजे MOBILE पेक्षा दर्जेदार पुस्तके वाचली पाहीजेत.आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा.अन्यथा नविन पिढीशी जुळवुन घेताना कठीण जाईल.