S R Dalvi (I) Foundation

Tr. Satuppa Dattu Kamble

Tr. Satuppa Dattu Kamble

आज आपण शिक्षक सटूप्पा दत्तू कांबळे (Ded, BA-मराठी ,M A- मराठी Bed, DSm, HRc) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

शिक्षक स्टूप्पा हे संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे राहतात. त्यांना एकूण १५ वर्षांचा अनुभव आहे . जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा उमरे नं 1 ता संगमेश्वर या शाळेमध्ये ते त्यांचे शिक्षणाचे कार्य करतात.

त्यांना इयत्ता 4 थी ते 7 वी पर्यंत एकच गुरुजी शिकवायला होते ते इतके हुशार, ऍक्टिव्ह आणि प्रभावी वक्ते होते त्यामुळे त्यांच्यासारखं शिक्षक व्हावं असे वाटले.

सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना बऱ्याच अडचणी आल्या कारण खूपच हलाखीची परिस्थिती होती त्यामध्ये बारावीला डिस्टिंगशन मध्ये येउन पण Ded ऍडमिशन खूप लांब साताऱ्यात झालं होतं  त्यामुळे तेथील सर्व शिक्षण बाहेर हॉटेल ला पार्ट टाइम नोकरी करत पूर्ण केलं होतं पण Ded चा स्कोर चांगला काढल्यामुळे त्यांना रत्नागिरी जि.प.सहजच नेमणूक मिळाली.

शिक्षक सटूप्पा यांना हेदली ता. संगमेश्वर या शाळेत पहिली नेमणूक मिळाली, शाळा लहान कमी पटाची त्यामुळं विशेष उपक्रम राबविले जात नसत पण नवीन असल्यामुळे नवीन उर्मी ने कामाला सुरुवात केली आणि सलग तीन वर्षे शाळेतील इयत्ता 4थी ची मुलं TSE स्पर्धा परीक्षेत तालुका मेरिट यादीत आली, मराठी मीडियम मधील 100% मुलं इंग्रजी वाचन ,लेखन तरबेज केली त्यामुळे सर्व तालुक्यामध्ये इंग्रजीचे प्रभावी मार्गदर्शक म्हणून वेगळी ओळख झाली .तीन केंद्राचा टॅग coordinator म्हणून काम पाहतोय याचा नेहमी त्यांना समाधान वाटते

हलाखीच्या परिस्थिती मुळ मातीच्या छोट्या घरात अनेक वर्षे काढली पण नोकरी लागताच चार वर्षात वाडीतील सर्वात पहिले 2011 साली 18 लाखाचा बंगला आई वडिलांच्या साठी बनवला हीच पहिली यशाची पायरी नक्कीच वाटते. आई वडिलांच्या डोळ्यातील समाधान खूप काही देऊन जातं.

शिक्षकाला नवनिर्मितीची संधी सतत मिळाली पाहिजे चाकोरीबद्ध शिक्षणा बरोबर मूल्यवर्धक शिक्षण देता आलं पाहिजे.
विध्यार्थी हा फक्त शिक्षित न होता तो सुशिक्षित नी संस्कारी बनणं खूपच काळाची गरज आहे.

खरचं खूप चांगलं क्षेत्र आहे शिक्षक ही केवळ नोकरी नसून ती एक अविरत चालणारी सेवा आहे. उद्याचा जबाबदार आणि सुजाण नागरिक घडवायची प्रभावी संधी आहे असा बहुमूल्य सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला आहे .