S R Dalvi (I) Foundation

Tr. Aarti Mishra

Tr. Aarti Mishra

मी आरती मिश्रा. मुंबई मध्ये राहत असून माझ सर्व शिक्षण नशिकमध्येच झाले आहे. गेल्या १६ वर्षांपासून मी शिक्षक या क्षेत्रात काम करत आहे. आणि गेल्या 5 वर्षांपासून मुंबई येथील न्यू मॉर्डन इंग्लिश स्कूल या शाळेत शिकवत आहे. मला गाण्याची आणि नृत्याची आवड आहे तसेच मी लेखन ही करते, ब्लॉग मधून मी माझे विचार मांडते.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

आमचे राहते घर सोडून आणखी एक घर होते जे घराला अगदी लागून  होते तिथे माझ्या बाबांनी ज्यांना भाडेकरू म्हणुन ठेवले होते त्यांच्या घरी ट्यूशन घेतले जायचे.मी नेहमी ते ट्यूशन सुरु असताना लपून छपून बघायचे आणि घरी ओढणी घेऊन शिकवण्याची एक्टिंग करायचे. मी माझ्या मैत्रिणींना ही शिकवायचे तेव्हापासूनच मला शिक्षक होण्याची इच्छा निर्माण झाली होती.

हे क्षेत्र निवडताना काही अडचणींचा सामना करावा लागला का?

अजिबात नाही. मला या गोष्टीच नेहमीच कौतुक वाटत की मला सर्व गोष्टी वेळेवर मिळत गेल्या. मला शिकवण्याची आवड माझ्या बहिणीच्या मैत्रीणीला माहित होती. नाशिक येथील एका शाळेत शिक्षकाची जागा खाली असल्याचे तिने मला सांगितले. त्या वेळी मी  TYBA च्या शेवटच्या वर्षाला होते. मी इंटरव्यू ला गेले असताना तिथे खुप B Ed , D Ed केलेले लोक आले होते. पण त्यातूनही  माझी त्या शाळेत शिक्षक म्हणून निवड झाली आणि माझा पहिला जॉब सुरु झाला.अवघ्या 500 रु पासून मी या जॉब ची सुरुवात केली होती. सकाळी कॉलेज ला जायचे आणि दुपारी विद्यार्थ्यांना शाळेत शिकवायला जायचे.
मी अनेक जण पाहिली आहे ज्यांना शिकून ही जॉब मिळवण्यासाठी खुप स्ट्रगल कराव लागते पण सुदैवाने माझ्या नशिबात ते आल नाही.

शिक्षक म्हणून १९ वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
मी नानावटी स्कुल मध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना एक दिवशी ‘चांगली शिक्षिका’ म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांनी मिळून शाळेत माझे खुप सुंदर पद्धतीने स्वागत केले होते. अगदी माझ्या स्वागतासाठी फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या होत्या. मी तो दिवस कधीच विसरु शकत नाही. तसेच मला दिल्ली मध्ये शिक्षक गौरव पुरस्कार आणि नुकताच एस आर फाउंडेशन तर्फे वर्षा ताई गायकवाड यांच्याकडून Teacher Recognition अवार्ड ने सन्मानित करण्यात आले हे क्षण ही माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.

तुमची आतापर्यंतच्या  Achievements कोणत्या?

CED फाउंडेशन द्वारे 2018 मध्ये दिल्ली, नेहरू विज्ञान केंद्र येथे “शिखा गौरव पुरस्कार” .
ऑगस्ट २०२० रोजी “आचार्य चाणक्य शैक्षणिक सन्मान” द्वारे पुरस्कृत.
“Best Teacher of the year” इंटरनॅशनल स्कूल पुरस्कार” दुबई द्वारे प्रदान.
Appreciation Award  एस.आर.दळवी फाउंडेशनतर्फे वर्षा गायकवाड आणि रणजितसिंग डिसले यांच्या हस्ते.

शिक्षक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला दयाल?

बऱ्याच जणांचा असा समज असतो की शिक्षक व्हायच म्हणजे सगळ्याच विषयात स्मार्ट असणे गरजेच आहे. पण तस नाहीये सगळ्या विषयाची माहिती असणे,त्याचे ज्ञान असणे नक्कीच गरजेचे आहे. पण तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्यामध्ये तुम्ही १००% स्मार्ट असणे जास्त महत्वाच आहे. १० विषयांची थोडी थोडी माहिती असण्यापेक्षा असा एक विषय पक्का करा ज्यात तुम्ही परिपूर्ण असाल.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन करत रहा. याची जबाबदारी खर तर पालकांवर ही आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला लहानपणापासून वाचनाची सवय लावली मग त्या मुलांना आपोआपच पुढे जाऊन वाचनाची गोडी निर्माण होते.