नमस्कार मी आरती सुरवाडे (D. Ed, Diploma in early childhood education, Jolly Phonics, Diploma in Child Psychology, Graduation in school management ) मी नवी मुंबई खारघर येथे राहत असून गेल्या 10 वर्षांपासून Harmony international School मध्ये शिकवत असून 3 वर्षांपासून Smart Mind Academy चालवत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावसे वाटले?
माझ्या मुलीमुळे खरतर मला शिकवण्याची आवड निर्माण झाली माझी मुलगी लहान असताना तिला शिकवायचे तेव्हा तिच्या मैत्रिणीही सोबत शिकायला बसायच्या तेव्हापासूनच खरतर माझ्यातली शिक्षिका घडत होती.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
हो आल्या माझ लग्न मी १२ वीला असतानाच झाल होत.त्यामुळे लग्नानंतर एडमिशन घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर मी Early Childhood Education कोर्स केला. मग मी हळू हळू बाकीचे कोर्सेस ही पूर्ण करण्यास सुरुवात केली असे करत करत आता मी स्वतःची फाउंडेशन तयार केली आहे.
शिक्षक म्हणून जो प्रवास सुरु आहे त्यातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
मी शिक्षिका झाल्यानंतर माझी पहिली Parents Meeting होती त्यावेळेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी माझे खुप भरभरून कौतुक केले होत. माझ्याबद्दल बेस्ट रिव्यू पालकांकडून देण्यात आले होते. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.
तुमची आत्तापर्यंत ची मोठी Achievement कोणती?
माझ्या लग्नानंतर मी हळू वेगवेगळे कोर्स करायला सुरुवात केली आणि आज रेप्यूटेड फाउंडेशन ची संस्थापक आहे. माझ्यासाठी ही खुप मोठी अचीवमेंट आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असं वाटते?
अभ्यासक्रम हा व्यावहारिक विचारांवर अवलंबून असतो, त्यामुळे अभ्यासाचा बोजा विद्यार्थ्यांवर जास्त देऊ नये. तसेच शारीरिक एक्टिविटी वर जास्त भर देण्यात यावा अस वाटत मला.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
आई नंतर पहिला गुरु हा शिक्षक असतो त्यामुळे ज्याला शिक्षक व्हायचे आहे त्यांनी आणि आहे जे शिक्षक आहेत त्यांनीही शिक्षक होण्याऐवजी चांगला गुरु होण्याचा प्रयत्न करावा.