आज आपण शिक्षिका श्रीमती अदिती वैद्य (Bsc, MBA, B.Ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका अदिती या पुण्याच्या असून गेली १८ वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या त्या इंदिरा नॅशनल स्कूल या शाळेत कार्य करत आहेत.जेव्हा पासून आपण शिकून मोठे होऊन काय व्हायच हा प्रश्न किंवा विचार यायचा अगदी तेव्हापासूनच श्रीमती अदिती यांना शिक्षिकाच व्हायच अस वाटायच त्यामुळे त्यांनी इतर कोणत्याही क्षेत्राचा कधी विचारच केला नाही.
इतकी वर्षे श्रीमती अदिति शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत आणि या दरम्यान हजारो मुले त्यांच्या हाताखालून शिकून गेली आहेत मात्र आज एवढ्या वर्षांनीसुद्धा त्यांचे बरेचसे विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आहेत. हीच त्यांच्या मोठी अचीवमेंट आहेत असे त्या सांगतात. तसेच एक शिक्षिका म्हणून त्यांची एक बॅच होती, ज्यामध्ये 14 जणांनी Sst विषयात 10 CGPA मिळवले होते जे अगदी परफेक्ट स्कोर होते.
शाळांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र आणि त्यांच्या योग्यतेचे वास्तविक चित्र बनवण्याची संधी दिली पाहिजे.शाळांना १००% निकाल मिळणे आवश्यक आहे या वस्तुस्थितीवर आधारित खोट्या जाहिराती, विद्यार्थ्याची खरी क्षमता देत नाहीत.असे मत शिक्षिका अदिती यांनी मांडले.