S R Dalvi (I) Foundation

Tr. Ajit Dumbre

Tr. Ajit Dumbre

नमस्कार मी अजित शांताराम डुंबरे (B. Sc. B.Ed. ) कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे येथे राहतो. मी गेले 4 वर्ष शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून सध्या महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत येथे शिक्षक म्हणून काम करत आहे.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

माझे मूळ क्षेत्र मार्केटिंग हे होते कालांतराने मला समाजात आवश्यक सेवा व संस्कार देण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करावी असे वाटू लागले म्हणून मि मार्केटिंग क्षेत्र सोडून शिक्षण क्षेत्र निवडले.

सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का? 

होय, मार्केटिंग मधून शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी मानसिकता व कौशल्य विकास करावा लागला. प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव मिळण्यासाठी एका ओळखीच्या शाळेत दोन आठवडे शिकवले. त्याचा खूप फायदा झाला.

समाजात शिक्षक-विद्यार्थी  यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?

शिक्षक बांधवाना शाळाबाह्य काम करण्यासाठी आशा वर्कर सारखी यंत्रणा उभी करायलाहवी असे मला वाटते. तसेच विद्यार्थ्यांना संगीत, कला, सादरीकरण, बहू भाषा शिकण्यासाठी वेळ मिळण्यासाठी त्यांचा अभ्यासक्रमात सहभाग करायला हवा.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल? 

आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षा थोडया मर्यादित असतील व आयुष्यात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून सामाजिक योगदान द्यायचं असेल तर शिक्षण क्षेत्रासारखं छान क्षेत्र नाही.