माझे नाव आकाश परमेश्वर सावंत. लातूर येथे राहतो. माझे शिक्षण B.sc.B.ed केले असून सध्या Now M. sc च्या पहिल्या वर्षाला आहे. मी गेल्या ३ वर्षांपासून प्राइवेट क्लासेस घेत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
माझे वडील शिक्षक आहेत आणि त्यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे.माझ्या वडिलांनी 5 वर्षे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना काहीही अनुदान न घेता शिकवले मग 2001 पासून त्याना पगार चालू झाला. 5 वर्ष मोबदला मिळत नव्हता तेव्हा घरच्यांकडून वडिलांना खुप वाईट ऐकावे लागत असे वडिलांनी शिकवण्याची नोकरी सोडली नाही.माझे B. Sc झाल्यावर M Sc. FY ला प्रवेश घेतला तेव्हा माझ्या वडिलांना तो प्रवेश रद्द करून मला B ed करायला सांगितले. M sc करून सुद्धा शिक्षकच व्हायचे आहे तर तू आधी B Ed कर समजावून त्यांनी मला B Ed करायला सांगितले. मग मी B. Ed पूर्ण केलं. ते करत असतानाच माझ्यात शिक्षक होण्याची इच्छा निर्माण झाली.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
नाही ,माझे वडील एक शिक्षक असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभत होते त्यामुळे अडचण अशी कोणती आली नाही.
शिक्षक म्हणून प्रवास करताना असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे?
मी B. Ed ला असताना शाळेत पाठ व्हायचे. आमचे पाठ 4 दिवसाचे असायचे पण शाळेतील विद्यार्थ्यांना माझे शिकवणे आवडायचे म्हणून तेथील मुख्याध्यापक मला बोलवून घेतले सांगितले की तुम्ही जास्त दिवस पाठघये कारन विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलेले आवडते आणि समजते. माझ्यासाठी ही पोचपावती होती.
तुमची आत्तापर्यंतची मोठी Achievement कोणती?
मी B.Ed FY ला असताना 100 मुलांमुली मध्ये मुलाखतीसाठी फक्त माझी निवड झाली होती. आणि मी S.Y. असताना मला राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम या मध्ये जिल्हा स्तरीय निबंध स्पेर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे असं वाटते?
मला वाटते विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकात जास्त बदल होण्याची गरज आहे. समाजात 70% ते 80% शिक्षक वाईट व्यसन करणारे आहेत, दारू पिणारे आहेत हे चित्र बदलणे गरजेचे आहे. शिक्षक असा एकमेव जॉब आहे जो समाजात कसे राहायचे, विद्यार्थ्यांना शिकवतो म्हणून स्वतः शिक्षकाने आधी निरव्यसनी असणे गरजेचे आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्याना तुम्ही काय सल्ला द्याल?
मला असे वाटते की शिक्षक होण्यासाठी फक्त टॅलेंट असणे आवश्यक नाहीतर तर मेहनती असणे आवश्यक आहे. फक्त टॅलेंट असून उपयोगाचे नाही तर ते विद्यार्थ्यांना समोर प्रसेन्ट ही करता यायला हवे.