‘‘शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात.”
आज आपण शिक्षिका सौ.अमिता मनिष पाटील यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका सौ. अमिता निसर्ग रम्य अशा वसई या ठिकाणी राहतात. त्यांचे शिक्षण एम.ए.डी.एड् असून त्यांनी डी.एस.एम.,एम ए एज्युकेशन.देखील केले आहे. २००३ साली अमिता यांनी शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून सुमारे गेली १८ वर्ष त्या एक शिक्षिका म्हणून कार्य करत असून बालगोपाळांसोबत नवे नवे शिकत आहे.
सध्या त्या डहाणू तालुक्यातील आसनगाव केंद्रातील माटगाव या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.सौ अमिता यांचे काका,काकी, आत्या शिक्षक होते. मात्र असे जरी असेल तरी सौ अमिता यांच्या माझ्या तिसरीच्या वर्गशिक्षिका संगीता बाईंमुळे त्यांच्यात शिक्षिकाहोण्याची इच्छा निर्माण झाली. इयत्ता तिसरीच्या वर्गापासून त्यांनी शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहिले आणि पुढे जाऊन त्यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले.
इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते सौ अमिता यांचा मार्ग त्यांनी आधीच निश्चित केला होता त्यामुळे हा पल्ला गाठत असताना त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही.
सौ अमिता यांच्या १८ वर्षाच्या शिक्षिकी प्रवासात गेल्या १८ वर्षात अनेक अविस्मरणीय क्षण वाट्याला आले असे त्या आवर्जून सांगतात. त्या ‘मुलांची लाडकी शिक्षिका’ म्हणून विद्यार्थ्यांचे भरभरून प्रेम अनुभवत आहेत. त्यांच्यासाठी ‘आमच्या आवडत्या बाई’ हीच सर्वात मोठी अचीवमेंट आहे.
शिक्षिका शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून सतत अपडेट रहावे, त्यांच्यात नवे शिकण्याची आवड असावी, त्यांनी सामाजिक जबाबदारीचे राखून वागावे असे शिक्षिका अमिता यांना वाटते. विद्यार्थी मित्रांनी देखील सतत शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.असे ही त्यांना वाटते. तसेच शिक्षकांना आपल्या कामामुळे समाजाकडून नेहमीच आदर मिळतो. शिक्षक होणे खरंच सन्मानाची बाब आहे, ज्यांना सतत नवे शिकायला आवडते त्यांनी नक्कीच शिक्षक व्हावं असे मत शिक्षिका अमिता यांनी व्यक्त केलेआहे.