आज आपण शिक्षक श्री अनिल तुकाराम गाडे (B. A, D.Ed., DSM) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक अनिल हे कात्रज -पुणे येथे राहतात. त्यांना एकूण १९ वर्षांचा अनुभव आहे . ते सध्या जि.प.प्रा. शाळा पंचशिल कॉलनी, खडकाळे /कामशेत ता. मावळ जि. पुणे.या शाळेत शिकवत आहेत. अनिल सरांना संगीताची आवड आहे. तसेच त्यांना कविता लेखन करणे, गीत लेखन करणे, कथा-पटकथा व संवाद लेखन करणे, संगीत /गाणे ऐकणे, बुद्धिबळ खेळणे, प्रवास करणे चित्रपट पाहणे ई. छंद आहेत.
तुम्हाला शिक्षक व्हावंसे कधी व का वाटले?
असं म्हणतात कीं “परिस्थिती ही शोधाची जनणी ” असते. माझ्या जीवनाला कलाटणी प्राप्त झाली ती माझ्या अत्यंत हलाकीच्या परिस्थिती मुळे. जेव्हा मला खऱ्या अर्थाने समज आली किंवा मी तर म्हणेन कीं मला खऱ्या अर्थाने समज करून दिली ती माझ्या गरिबीच्या परिस्थितीने. मी तसा मूळचा बीड जिल्ह्याचा आणि माझ्या लहानपणापासून जि ओळख बीड ची आहे ती आजही कायम आहे. आणि ती म्हणजे,’ ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा ‘ म्हणून अर्थाततच माझे आईवडील ऊसतोडणीला जायचे. मात्र मला माझ्या मामाकडे शाळा शिकण्यासाठी ठेवायचे. याच परिस्तिथीत मी मोठा झालो आणि समज आली तेंव्हा माझ्या परिस्तिथी ने माझ्या वर कुरघोडी केलेली होती. आणि म्हणून माझं पहिलं ध्येय कीं परिस्थिती बदलण्यासाठी नोकरीं हवी आणि नोकरीं साठी अभ्यास हवा. म्हणून मी जोमाने आणि सतत परिस्थिती ची जाण समोर ठेवून अभ्यास करत राहिलो. आणि माझ्या शिक्षक होण्या मागील तात्कालिक कारण म्हणजे माझा अभ्यास पाहून मला माझे सर मला म्हणायचे की तू नक्कीच पुढे जाऊन शिक्षक होणार म्हणजेच माझी परिस्थिती आणि सरांची विश्वासाची थाप यामुळे मी 21 जुलै 2003 रोजी जि.प. प्रा. शाळा. कोठारी( सि) ता. किनवट जि. नांदेड येथे शिक्षण सेवक पदावर रुजू झालो.
ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे तुम्हाला कठीण वाटते त्यांना तुम्ही कसे हाताळता?
आपणास माहित आहे कीं “व्यक्ती तितक्या प्रवृत्ती “म्हणजेच काय तर गावातील प्रत्येक घरातून म्हणजेच वेगवेगळ्या घरातून मुले येत असतात त्यामुळे सर्वांची बुद्धिमत्ता सारखीच असेल असे नसते. आणि यात अजून भर म्हणून आपण म्हणतो कीं मुले म्हणजे माकडे होत. कारण माकडे आणि मुले एका जागेवर टिकून राहिले तरंच नवल समजावं. आणि अशातच अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांना शिकवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. पण म्हणतात ना जगाच्या पाठीवर असा एकही प्रश्न नाही कीं त्याचे उत्तर नसेल. फक्त आपली नजर तीक्ष्ण आणि शोध वृत्तीची हवी. आणि आजकाल तर इलेट्रॉनिक मीडिया आणि तंत्रज्ञान व इतर अनेक साधनं उपलब्ध आहेत. यामध्ये जेव्हा मला असा प्रसंग येतो तेंव्हा मी या साधनाचा वापर नक्कीच करतो आणि मी स्वतः you tube च्या वर माझे स्वनिर्मित शैक्षणिक video निर्माण करून ते e-learning द्वारे दाखतो, तसेच मला डायलॉग ची आवड असल्याने मी फिल्मी style ने त्या विद्यार्थ्याला समजून सांगतो आणि मनोरंजक पद्धतीचा वापर करतो.
तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
मुलांचे मन हे वाहत्या पाण्यासारख असत त्याला वेळावं तस वळत म्हणजेच काय तर मातीच्या घड्याला जसं वळण द्यावं तसा आकार तयार होतो. अगदी मुलांचं देखील तसेंच असतं. त्यांच्या कोवळ्या मनावर जे बिंबवल जात तेच चिरकाल टिकतं. म्हणून अशा वेळी मुलांना प्रेरणा मिळणाऱ्या कथा, प्रसंग आणि आपल्या होऊन गेलेल्या महान व्यक्तिमत्वाच्या कथा, प्रसंग सांगून आणि सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे ” you can do. ” हे छोटंसं वाक्य त्यांना नेमीच ऐकवतो.
तुम्हाला पालकांशी संवाद साधावायस आवडते का? पालकांशी तुमचे संबंध कसे आहेत?
शिक्षण पद्धतीत ” शिक्षक -विध्यार्थी -पालक हे तीनही घटक महत्वपूर्ण आहेत आणि यापैके तीनही घटकामध्ये समतोल आसावयास हवा आणि यासाठी पालकांशी संवाद साधण्याची इच्छा असो कीं नसो त्यांच्याशी संपर्कात राहावेच लागते आणि माझे म्हणाल तर मी नेहमीच पलंकाच्या संपर्कात असतो आणि मला ते गरजेचे वाटते. आपले पालकांशी संबंध कसे आहेत हे सांगणे तसें कठीण आहे. कारण सगळेच जण खरं सांगतील असे नाही म्हणजेच कोणीच म्हणणार नाही कीं माझे पालकांशी संबंध खराब आहेत किंवा ठीक नाहीत. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर देताना मी असं म्हणेल कीं सर्व शिक्षकांचे पालकांशी संबंध हे सालोख्याचे असायला हवेत.आणि सध्यातरी माझे तसेच आहेत.
तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
अध्ययन -अध्यापन प्रक्रियेत जशा विद्यार्थ्यांना अडचण /समस्या निर्माण होतात अगदी त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील अडचणी निर्माण होतात. अशावेळी सध्या उपलब्ध असणारे तंत्रज्ञान साहित्य हे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एक “god gift ” च आहे. या तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या अध्यापनामध्ये नक्कीच करतो. माझ्या शाळेत प्रत्येक वर्गात e -learning संच उपलब्ध आहेत, त्यांचा वापर मी करतो आणि मी स्वतः शै.video निर्माण करतो व मुलांना you tube links, videos, whats app group वर send करतो. प्रत्येक वर्गाचा whats app group तयार केलेला आहे आणि google meet वर खास करून कोरोना काळात याचा खूप फायदा झाला. मी आणि आम्ही सर्वच शिक्षकांनी google meet वर अध्यापणाचे काम केले.