आज आपण शिक्षिका अरुणा निवृत्ती खरात (M.A .B Ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. अरुणा मॅडम या मालाड येथे राहत असून सध्या त्या आदर्श विद्यालय गोरेगाव ( पश्चिम ) येथे कार्यरत आहेत .
शिक्षक व्हावेसे कधी वाटले :
इयत्ता दहावी मध्ये असताना माझ्या वर्गातील अभ्यासात कमी असलेले विद्यार्थी त्यांना शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि ती जबाबदारी मी बऱ्यापैकी पार पडली होती असं माझे शिक्षक म्हणत होते तेव्हाच असे वाटलं होतं की आपण शिक्षक झालो तर आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतो .
ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे कठीण वाटते अशा विद्यार्थ्यांना याप्रकारे हाताळता:
विद्यार्थ्यांना शिकवणे ही एक कला आहे ही कला व्यवस्थित हाताळली तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्यामुळे वर्गातील अशी काही मुले असतात त्यांना मी प्रथम वेगळं बसवते . त्यांच्या काय समस्या आहेत , त्या समस्या जाणून घेतो , त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ बरेच पालक एकत्र राहत नाहीत ( आई वडील एकत्र राहत नाही ) त्यामुळे ती मुलं थोडीशी हट्टी , हेकेखोर होतात आणि वर्गात आल्यानंतर इतर मुलांना त्रास देतात मग अशा मुलांना वेगळ्या पद्धतीने हाताळून त्यांच्याशी प्रेमाने बोलून , त्यांना समजावून सांगून ज्यात त्यांना गोडी वाटेल असे विषय काढून त्यांच्याशी मी प्रथम बोलते त्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक मैत्रीचं नातं तयार होतं आणि मग त्या विद्यार्थीना हळूहळू शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येते.
विद्यार्थ्यांना प्रेरित करते:
दोन वर्षानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत आले तेव्हा त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने ही एक मोठी समस्या निर्माण झाली होती . सोप्या कडून कठीणा कडे जाणे . ज्ञातांकडून अज्ञाताकडे जाणे या पायऱ्या लक्षात घेऊन सुरुवातीला सोपा भाग शिकवून त्यासाठी वेगवेगळे खेळ शैक्षणिक साहित्य यांचा वापर करून त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करते एकदा अभ्यासात गोडी निर्माण झाली की मूळ विषय जो आहे त्या विषयाला हात घालून त्यांना ती संकल्पना समजावून सांगते .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना थोरा मोठ्यांच्या गोष्टी उदाहरणार्थ एपीजे अब्दुल कलाम , मार्क इंग्लिश , आनंद यादव , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यामध्ये बरेच कष्ट सहन करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलेला आहे अशा व्यक्तींचे चरित्र , त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी , अनुभव त्यांना सांगते आणि त्यातून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे . असं काहीतरी आपण केलं पाहिजे हे वारंवार सांगते कुछ कर दिखाओ ऐसा दुनिया करना चाहे आपके जैसा हे वाक्य मी वर्गात नेहमी बोलत असते.
पालकांशी संपर्क व संवाद :
पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असेल तर विद्यार्थ्यांची नक्कीच प्रगती होते हे लक्षात घेऊन पालकांशी माझे संबंध किंवा आमच्या शाळेचे संबंध खूप चांगले आहेत प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पालकांच्या मीटिंग घेतो पालकांना सर्व गोष्टी सांगितल्या जातात उदाहरणार्थ मुलांची प्रगती कोणत्या विषयात आहे , कोणतं काम अधिक चांगलं केलं आहे आणखीन काय आपल्याला करता येईल आपण दोघांनी मिळून म्हणजे शिक्षक आणि पालकांनी मिळून असा विचार जेव्हा आपण पालकांसमोर मांडतो तेव्हा पालक देखील त्याला तयार होतात आमच्या शाळेत बऱ्याच ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात उदाहरणार्थ अगस्त्या , फाउंडेशन होमी भाभा या सारख्या ऍक्टिव्हिटी मध्ये बरीच मुलं सहभागी होतात कारण त्यात पालकांची सहमती असते.
अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर :
ऑनलाइनच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर जास्त केला गेला आणि त्यानंतर म्हणजे शैक्षणिक वर्ष 22 23 यामध्ये जास्त तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत मुलांना एखादी संकल्पना समजावून सांगताना उदाहरणार्थ कीटक भक्षी वनस्पती दाखवताना व्हिडिओ दाखवतो . तसेच आमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर ची सोय आहे त्यामुळे त्याचाही वापर केला जातो .
शिक्षण क्षेत्रातील माझी अचिव्हमेंट :
विज्ञान प्रदर्शनामध्ये मी नेहमी सहभागी होत असते आणि त्यामध्ये मला नेहमीच प्रथम पारितोषिक मिळत असतं परंतु जेव्हा मी शिक्षकांची शैक्षणिक साधने यामध्ये भाग घेतला तेव्हा मला सतत सात वर्ष बक्षीस मिळत गेलं तेव्हा मला शाळेला त्याचा खूप अभिमान होता , आहे . आजही वैज्ञानिक कोणतेही काम असेल तर ते मी त्यात आवडीने भाग घेते .
शिक्षण प्रवासातील अविस्मरणीय अनुभव :
विद्यार्थ्यांशी असलेलं एक अतूट नातं मनाला फार हवा करून जातो आतिश गायकवाड नावाचा एक विद्यार्थी इयत्ता पाचवी ला माझ्या वर्गात आला होता त्याच्या घरी भरपूर समस्या होत्या आणि त्यामुळे वर्गात तो इतर मुलांना मारायचा चावायचा पुस्तक चोरी करायचा तेव्हा त्या विद्यार्थ्याला हाताळणं ही एक मोठी समस्या होती कारण मी पण तेव्हा नवीनच लागले होते. वय तसं लहानच होतं माझं पण असं वाटलं की , नाही आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याला इतकं छान प्रेमाने समजावून सांगितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या नंतर त्याच वागणं बरं चल सुधारलं गेलं आता गुरुपौर्णिमेला तो आला होता लग्नाचा आमंत्रण घेऊन मॅडम लग्नाला या तुमच्यामुळेच मी आज ज्या काही पदावर आहे ते तुमच्यामुळेच हे वाक्य म्हणाला खूप सुखावून गेलं असे बरेच प्रसंग आहेत ड्रॉइंग ची परीक्षा मी देत होते आणि क्लास आमचे रविवारी होते ट्रेन ने जात होते गोरेगाव स्टेशन आलं म्हणून मी ट्रेनच्या दारात उभे राहिले तर प्लॅटफॉर्म वरती काही युनिफॉर्म घालून पोलीस उभे होते त्यातला एक पोलीस धावत धावत प्लॅटफॉर्मवरून जिथे मी उतरणार होते त्या डब्यापर्यंत आला आणि वाकून नमस्कार केला तेव्हा सगळेच प्लॅटफॉर्मवरची सर्व माणसं पाहत होते म्हणजे तेव्हा त्याला मी ओरडले म्हटले युनिफॉर्म चा मान रखन गरजेचा आहे वाघमारे तो विद्यार्थी असे बरेच प्रसंग सांगता येतील