S R Dalvi (I) Foundation

Tr. Ashwini Jadhav

Tr. Ashwini Jadhav

नमस्कार मी अश्विनी अनिल जाधव (B.A.D.Ed, Diploma in Computer Technology) माझे मूळगाव बारामती असून सध्या मी पुण्यात राहते. गेले 12 वर्ष मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि सध्या  पुण्यातील भोसरी येथील स्टर्लिंग स्कूल या शाळेत शिक्षिका आहे.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

कुठल्याही गोष्टीची सुरुवात घरापासून होते तसेच माझ्या बाबतीत ही झाले. माझे वडिल शिक्षक असल्यामुळे मी पण त्याच क्षेत्रात काम करावे अशी त्यांची इच्छा होती पण मला इंजिनियर व्हायचे होते. माझी बारावी झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील गुणवंत विदयार्थी आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले तेव्हा मला आणि पप्पांना एकाच दिवशी गौरविण्यात आले. तेव्हा इतर शिक्षकांनी पप्पांचे जे कौतुक केले ते मी ऐकले की, ” खऱ्या हाडा मासाच्या शिक्षकाला आज आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि तो योग्यच आहे.” तेव्हाच मला वाटले आपणही वडिलांसारखे शिक्षक होवून समाजात नाव कमवावे.

शिक्षक क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?

खर तर नाही, जस मी आधीच सांगितले माझे वडिल शिक्षक होते आणि मामा ही प्रोफेसर असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मला लाभत होते . त्यामुळे शिक्षक होण्याच्या प्रवासात मला अडचण अशी आली नाही. 

शिक्षक म्हणून प्रवास करताना असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे?

एक दिवस माझ्या शाळेतील काही पालकांना समजले की मी ही शाळा सोडून दुसरीकडे जाणार आहे. तेव्हा त्या सर्व पालकांनी माझी प्रत्यक्ष भेट घेवून सांगितले की ‘आमच्या मुलांना तुम्हीच शिक्षिका म्हणून हव्या आहात’ माझ्यासाठी तो प्रसंग अविस्मरणीय आहे.

तुमची आत्तापर्यंतची मोठी Achievement कोणती?

 इथे मला दोन गोष्टी सांगाव्याच्या वाटतात पहिली म्हणजे प्रिंसिपल मॅडम म्हणाल्या की अश्विनीला दिलेली जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पाडते आणि त्यातू तीची चूक होणारच नाही. अगदी शेवटच्या क्षणी दिलेले कामही ती व्यवस्थित पूर्ण करते मी हां विश्वास कमवू शकले  एक अचीवमेंटच आहे आणि दुसरे म्हणजे आमच्या सोसायटी तर्फे 26 जानेवारीला एक शिक्षक म्हणून माझा झालेला सत्कार.

समाजात शिक्षक – विदयार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे असं वाटते ?

शिक्षण क्षेत्र हे समाजातील महत्वाचे क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्रातील संबधित सगळ्यांनी आपली 100% देऊन काम करावे असे मला वाटते.कोरोनाच्या काळात आँनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागात बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले त्यामुळे ग्रामीण भागातही आधुनिक शिक्षण पद्धतीने शिक्षण देण्यात यावे असे ही मला वाटते.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?

शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी जिद्द,मेहनत आणि चिकाटीची खूप गरज आहे .शिक्षण देण्यासारखे पवित्र कार्य समाजात दुसरे कोणतेही नाही तेव्हा शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा कारण शिक्षक हे देशाचे भावी नागरीक घडविण्याचे काम करीत असतात.