नमस्कार मी बाबुराव मारुती ताटे ( M.A. B. Ed ). गेले 4 वर्षे मी शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या कॉ. जीवनराव सावंत श्रमिक विद्यालय बाणगे या शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
सुरुवातीला शिक्षक व्हायचे असे काही निश्चित नव्हते . या आधी मी कुस्ती हा खेळ खेळत होतो. पण एकदा कुस्ती खेळत असताना माझ्या पाठीला दुखापत झाली काही दिवसांनी मी बरा झालो पण खेळ मात्र बंद झाला. त्यानंतर हळूहळू अभ्यासाची गोडी वाढू लागली आणि वेगळं काहीतरी करायचे या हेतूने हे क्षेत्र निवडले. मला मुलांना शिकवायला आणि त्यांच्यात राहून त्यांच्या भविष्याला आकार द्यायचा आहे. शिक्षणाव्यतिरिक्त अनुभव देवून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करायची आहे.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
नाही, क्षेत्र निवडताना काही अडचण आली नाही.
शिक्षक म्हणून 25 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
अजुन तरी असा अविस्मरणीय प्रसंग नाही पण लवकरच असे क्षण माझ्या आयुष्यात येतील हा विश्वास आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे?
समाजाला आपल्या मुलाची क्षमता ओळखून त्याच्याशी मित्रत्वाचे नाते प्रस्तापित करता आले पाहिजे कारण बऱ्याचदा पालकांकडून मुलांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला हवे त्या पद्धतीने दिले जात नाही.आजची मुले हे पुढे देशाचे प्रतिनिधित्व करणारे उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे त्यांना घडवताना पालकांनी नीट विचार करुन निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांना वेळ दिला पाहिजे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
शिक्षक होणाऱ्यांना मी हेच सांगेन की, फक्त चांगला पगार याकडे न पाहता एक सेवा म्हणून या क्षेत्राकडे पहा. तुम्ही समाजाचे एक घटक म्हणून कार्यरत झाला पाहिजे. सेवाभावी वृत्तीने काम करा म्हणजे यश हे मिळणारच.