श्री बापू हे जेव्हा माध्यमिक शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना शिक्षण देणारे सर श्री.जगताप सर, श्री.जाधव सर,श्रीम.मोरे मॅडम या अगदी मनापासून त्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असत. हे शिक्षक शिकवत असताना त्या-त्या विषयातील प्रसंग डोळ्यासमोर उभे रहायचे .तेव्हापासून आपणही शिक्षक व्हावे असे बापू यांना वाटू लागले.आणि तेव्हाच त्यानी शिक्षक होण्याचे ठरवले.
शिक्षक क्षेत्र निवडताना अडचणी:
श्री बापू यांच्या घरात शिक्षण घेऊन शिक्षक होणारे हे पहिलेच आहेत. त्यांच्या आईवडिलांनी जेमतेम २ री – ३ री पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. घरातील गरीबीमुळे त्यांना अभ्यासाची पुस्तक घेणे अवघड होते. डी.एड असताना फी भरणे ही त्यांना शक्य न्हवते तेव्हा गावातील शिक्षक श्री.तुकाराम घोगरे गुरूजी यांनी त्यांच्या पहिल्या वर्षाची फी भरली. तर दुसऱ्या वर्षाची फी रस्त्यावर कामकरणाऱ्या महिला पवार बाईनी भरली होती . एवढेच नाही तर पैसा नाही म्हणू त्यांना कधीच पुस्तक घेता आले नाहीत केवळ लेक्चर्स ऐकून ते अभ्यास करत असत आणि असाच अभ्यास करुन ते परीक्षेत उत्तीर्ण झाले.
शिक्षक प्रवासातील अविस्मरणीय क्षण:
शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक प्रथम डोंगरगाव-खालचीवाडी ता.मुळशी येथै झाली. त्यावेळेस त्यांची शाळा गावात देवळात भरत होती. शाळेत जातानाचा प्रवास पण नदीतून करावे लागत. नदीचे पाणी अक्षरशः कंबरेवर आसायचे.अशा परिस्थितीतून शाळेपर्यंतचा प्रवास करावा लागे. बऱ्याचदा पावसाळ्यात शाळेतच राहावे लागायचे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता बापू आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून गावातील लोकांकडून शाळेसाठी जागा घेऊन श्रमदानातून शाळेस दोन वर्गखोल्या बांधून शाळेस रोटरी क्लब कडून भौतिक सुविधा मिळवून दिल्या. तो आनंदाचा क्षण अजूनही त्यांच्या डोळ्यासमोर तसाच उभा राहतो आणि आयुष्यातील हा क्षण त्यांच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहील.
Achievement:
– शिक्षक बापू शिकवत असलेल्या डोंगरगाव-खालचीवाडी येथील शाळेचा इ.4थी शिष्यवृत्ती निकाल सलग 11वर्षे 100 टक्के लागला होता तसेच.10वी शाळेचे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने पास झाले या गोष्टींचा अभिमान वाटतो
– गावातील लोकांच्या सहकार्यातून भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी बदल गरज:
शिक्षक विद्यार्थी यांच्यातील जवळीक वाढणे आवश्यक आहे. शिक्षकाला शिक्षणापासून दूर जाताच येणार नाही याची काळजी प्रशासकीय स्तरावर घेणे आवश्यक आहे.अशैक्षणिक कामे शिक्षकाला न देता विद्यार्थी घडविण्यास वेळ देणे गरजेच आहे. असे शिक्षक बापू यांना वाटते.