आज आपण शिक्षिका भार्गवी भालचंद्र कापडी (एम. ए. मराठी,डी.एड, बी,एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ भार्गवी या रा.ओरोस, जि.सिंधुदुर्ग येथे राहत असून गेली २० वर्षे त्या शिक्षिका क्षेत्रात कार्यरत आहेत.आणि सध्या त्या जिल्हा परिषद शाळा आवळेगाव पूर्व ता. कुडाळ सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहेत.
दहावी नंतर पुढे काय? हा प्रत्येकीला पडणारा प्रश्न त्यांनाही त्यांच्या दहावी नंतर पडला. त्यावेळेस त्यांच्या आयुष्याचे दिशा दर्शक ठरले त्यांच्या कॉलेज चे हिंदी शिक्षक आदरणीय नाईक सर आर.पी.डी कॉलेज सावंतवाडी, त्यांच्या एका वाक्याने कॉलेजमध्ये चांगले गुण मिळवत डी.एड कॉलेज ला शिक्षिका भार्गवी याना सहज ऍडमिशन मिळाले.
त्या शिक्षक म्हणून रुजू झाल्या ती तारीख होती 25 नोव्हेंबर 2002. त्यांचा एकही प्रवास अडचणी शिवाय कधी झालाच नाही तसंच काहीसे झाले, ज्या शाळेत त्या लागल्या तेथील शाळेच्या बाईंची सहा महिन्यांत बदली होऊन पहिली ते चौथी ची 40 मुले आणि सोबत बालवाडी ची 16 बालगोपाळ यांना घेऊन 6 महिने एकट्याने शाळेची धुरा त्यांनी सांभाळली. नंतर बालवाडी ताई मिळाल्या आणि ज्युनिअर शिक्षक असा त्यांचा शालेय प्रवास सुरु झाला.
त्यांच्या शाळेतील मुलं खूप हुशार होती स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत होती आणि इतक्यातच त्यांची बदली आंबरड बाजार शाळेत झाली. या शाळेत पुन्हा मुख्याध्यापक पदाचा पदभार सहा महिन्यांतच त्यांच्या जवळ आला. या शाळेतील पालक जागरूक होते पालकांचे त्यांना उत्तम सहकार्याला मिळाले तसेच या शाळेतील पटसंख्या हि चांगली होती.
उत्कृष्ट पटनोदनी पुरस्कार, मुलांना जिल्हा स्तरिय क्रीडा शिष्यवृत्ती, चौथी स्कॉलरशिप मिळवून नवोदय साठी विद्यार्थी निवड अशा प्रकारे शाळेची आणि त्यांची शान वाढत होती. सात वर्ष सरली आणि त्यांची शाळा नूतनीकरनाच्या दिशेने वाटचाल करू लागली. यानंतर त्यांची माझी बदली झाली पण लगोलग त्या शाळेला आय.एस.ओ नामांकन मिळाले. यानंतर झालेला त्यांचा प्रवास जरा वेगळा होता, 5 वी पर्यंत शाळा पण पट अत्यंत कमी होती तरीही सर्व उपक्रम त्यांनी अत्यंत प्रामाणिक पणे राबवले.
शिक्षिका भार्गवी यांनी 6 पटसंख्येच्या शाळेत ही शाळा नूतनीकरण केली, संगणकीकरण केली, आणि शाळेचे आंतर बाह्य रूप बदलून टाकले. राखी देसाई सारखी मुलगी जिल्हा क्रीडा शिष्यवृत्ती स पात्र ठरली. या शाळेत 6 मुलांसोबत सुरु झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास काही वर्षात पटसंख्येच्या अभावी एका मुलीवर आला. त्यानंतर त्यांची बदली झाली ती आताच्या शाळेत. शाळेला स्वतः च्या अशा बऱ्याच सुविधा इथे नव्हत्या.
भार्गवी शिक्षीका त्यांच्या सहकारी मनिषा मॅम आणि शाळा व्यवस्थापन कमिटी कामाला लागले, शाळेसाठी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन व पपं, दोन लोखंडी कपाटे, खेळाचे साहित्य, आणि सलग तीन वर्षे मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असे साहित्य लोकवर्गणीतून त्यांनी मिळवले. यापुढे शाळा छप्पर दुरुस्ती आणि शाळा सुशोभीकरण करणे ,मुलांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी करणे हि त्यांची उद्दिष्टे होती.
मुलांना शिक्षणा सोबत संस्कार दिले तर येणारी पिढी निश्चितच गुणी व क्रियाशील होईल तसेच शिक्षक, बालक, पालक ,समाज एकत्र येऊन काम केलं तरच भविष्य उज्वल आहे असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.