S R Dalvi (I) Foundation

Tr. Chetan Bodekar

Tr. Chetan Bodekar

”शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे ,आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण”

आज आपण श्री. चेतन अंबाजी बोडेकर (एम.ए.,बी.एड.,डी.एस.एम.) या यांच्या शिक्षक म्हणून आतपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. शिक्षक चेतन हे मु.पो.ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग इथले असून गेली 18 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. आणि सध्या ते श्री. रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं 1, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथे शिक्षक म्हणून काम करत आहेत.

शिक्षक चेतन यांचे माझं प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागात आणि तेही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले आहे. त्यांचे वडील आणि चुलते शिक्षक असल्यामुळे त्यांचा प्रभाव अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर होता. त्यांचं वागणं-बोलणं तसेच परिसरातील लोकांकडून त्यावेळी त्यांना मिळणारा सन्मान, वागणूक व समाजोपयोगी, लोकोपयोगी कामात त्यांचा असलेला वावर यामुळे ग्रामीण भागात तरी त्यावेळी शिक्षकांच्या एवढा मान बहुदा कोणालाच मिळत नव्हता. त्यामुळे नकळतपणे याचा प्रभाव चेतन यांच्यावर होताच पण यासोबतच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत, गुरुजी अभ्यासात चांगल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्वरित विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी देत असत ज्यात चेतन यांचा समावेश असायचा त्यामुळे लहान वयात या गोष्टींनी प्रचंड समाधान त्यांना मिळत होते. याचाच परिणाम म्हणून कदाचित त्यांचा अगदी प्राथमिक शाळेपासूनच शिक्षक बनण्याचा प्रवास सुरू झाला होता. आणि समजत्या वयात तर शिक्षकी पेशा आणि त्यातील प्रामाणिकपणा, साधेपणा व त्यांचा अखंड सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनावर सर्वांगाने होणारा सकारात्मक परिणाम लक्षात आल्याने तो प्रवास सुलभ होत गेला.

शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी-

 बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर च चेतन यांचा प्रमुख मार्ग हा शिक्षक होणे हा होता.  त्यातही त्यावेळी बऱ्याच जणांकडून वकिलीचे शिक्षण घ्यावे असे त्यांना सुचवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या मनात चलबिचल निर्माण झाली होती; परंतु सारासार विचार केल्यावर शिक्षकी पेशाचे पारडे अधिक जड असल्याचे व आपल्या ध्येयाकडे नेणार त्यावेळी त्यांना वाटले. त्यादरम्यान डि.एड साठी बरेच विद्यार्थी अर्ज करीत होते. मुळात डि.एड नंतर नोकरी मिळणार याची हमी होती. पण विभागस्तरीय गुणवत्ता यादीत त्यांचा नंबर काही गुणांनी हुकला आणि शिक्षकी पेशाकडे नेणारा प्रवास लांबण्याच्या वाटेवरगेलेला दिसू लागला. तेवढ्यातच शासनस्तरावरून अनुशेष भरण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. त्यावेळी पहिल्या यादीतच गुणानुक्रमे त्यांची निवड झाली आणि सरळ शिक्षक म्हणून ते हजर झालो.

शिक्षक म्हणून 18 वर्षाच्या प्रवासातील अविस्मरणीय क्षण- 

शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसोबत जगताना अनेक सुखद अनुभव येतात. तसेच त्यांना ही आले. गेल्या 18 वर्षातील माझी सेवा विचारात घेता आलेल्या विविध प्रसंगांची एकमेकांशी तुलना करता येणे अवघड आहे असे चेतण म्हणतात. कारण त्यावेळची परिस्थिती,विद्यार्थी, प्रसंगाचे स्वरूप, काळ, विद्यार्थी व पालकांकडून मिळणारे प्रेम याला तोलता येणार नाही. तरीदेखील अलीकडचा एक प्रसंग त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलाय, विद्यामंदिर लोरे मांजलकरवाडी, तालुका – वैभववाडी या शाळेत विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला होता. मुलांनाही इंग्रजी विषयाची प्रचंड आवड लागली होती, असे म्हणण्यापेक्षा त्यांची ज्ञानाची भूक दिवसेंदिवस वाढू लागली होती असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. शब्दसंपत्ती वर ताबा मिळवून इंग्रजी संभाषणाकडे त्यांची यशस्वी घोडदौड सुरू होती. यावेळी जिल्हा स्तरावरील एका शिक्षण विभागातील अधिकारी यांनी  शाळेला अकस्मीक भेट दिली आणि विद्यार्थ्यांनाकडून इंग्रजी बाबत जाणून घ्यायला सुरुवात केली. बघता-बघता त्यावेळी इंग्रजीतून शब्दांच्या भेंड्या सुरू झाल्या आणि त्या स्पर्धेत अधिकाऱ्यांना वेळी माघार घ्यावी लागली होती. मुलांनी पूर्वतयारी शिवाय दाखवलेली चमक आणि अधिकारी यांनी स्वतः व्हाट्सअप मेसेज द्वारे सर्वत्र प्रसारित केलेले मुलांचे व उपक्रमाचे कौतुक हे नक्कीच त्यांना अफाट समाधान देऊन गेलं.

आतापर्यतची Achievement-

शिक्षक चेतन यांनी कोणत्याही पुरस्कारासाठी अगदी सन 2003 ते 2018 पर्यंत मी कधीही प्रस्ताव केला नव्हता व ना कधी ऐकीव गोष्टींनी त्याबाबतचे मतही तयार झाले नव्हते. परंतु एप्रिल 2019 च्या दरम्यान बा.रा. कदम गुरुजी ज्ञानदर्शी आदर्श शिक्षक पुरस्कार बाबतच्या आवाहनाचा मेसेज शिक्षक मित्रांकडून त्यांना मिळाला. पुरस्कार संबंधित तितकेसे मत चांगले नसल्याने सहाजिकच दुर्लक्ष झाले.परंतु त्यांचे शिक्षक मित्र योगेश सपकाळ सर यांनी त्या पुरस्कार समितीची कार्यपद्धती, इतिहास व त्यामागचा हेतू या बाबतचा उलगडा केला आणि ‘तुझ्या सारख्या शिक्षकांच्या कामाचे नक्कीच तेथे प्रामाणिक मूल्यांकन होईल असे सांगून राबवित असलेल्या इंग्रजी उपक्रमास नक्की दाद मिळेल व आपण इतरांच्या तुलनेत कुठे आहोत याची जाणीव होईल’ असं त्यांना सुचविले. स्वतःला तपासून घेण्याची कल्पना तेव्हा चेतन यांना आवडल्याने त्यांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्याचे ठरवले. आणि माझ्या त्यांच्या सोबतच्या जिल्हा राज्य व इतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्राथमिक विभाग विभागांमधून ते एकमेव विजेता ठरले. आणि योगायोगाने पुरस्कार वितरणाचा दिवस त्यांच्या वडिलांचा अर्थात त्यांच्यासाठीच्या आदर्श शिक्षकाचा स्मृतिदिन होता. हा पुरस्कार आणि आलेला योगायोग हीच त्यांना त्यांच्या शिक्षक म्हणून आतापर्यंच्या प्रवासातील मोठी अचिव्हमेंट वाटते.
प्रसिद्ध साहित्य – मालवणी काव्यसंग्रह – ‘गावय’  (सन –2020)

अजून काय बदल होण्याची गरज आहे असं वाटते-

समाज व्यवस्थेतील शिक्षकाचे स्थान हे पूर्वीपासूनच महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि भविष्यातही ते निश्चितच राहणार आहे. बदलत्या व गतिमान जीवनातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षकाने स्वतः सक्षम बनणे गरजेचे आहे असे शिक्षक चेतन यांना वाटते. काळानुरूप क्षमता, कौशल्य आत्मसात करावयास हवी. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या विषयी त्यांच्या कर्तव्यातून व ज्ञानदानातून आदर निर्माण झाला पाहिजे. असेही मत त्यांनी मांडले.आजचा विद्यार्थी हा आधुनिकतेने नटलेल्या व सजलेल्या तंत्र -यंत्र युगात वावरत असला तरी त्याला संस्कारक्षम बनवण्यासाठी आई-वडिलांसोबत शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.आजच्या विद्यार्थ्याना उद्याची आव्हाने डोळ्यासमोर ठेवून घडवलं पाहिजे. त्यांना डिजिटल साक्षर बनवण्यासोबत जीवन कौशल्ये अंगीकारण्यास लायक बनवले पाहिजे. शिक्षकांनी व्यावसायिक दृष्ट्या नेहमीच अद्ययावत राहायला हवे. तरच ज्ञानाचा अखंड दिवा तेवत ठेवून ते विद्यार्थ्यांना सदोदित प्रकाशित करू शकतात.असे शिक्षक चेतन यांना वाटते.

शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी सल्ला- 

शिक्षक हा पेशा निव्वळ व्यवसाय व उपजीविकेचे साधन म्हणून मुळीच स्वीकारू नये. व्यवसाय म्हणून स्वीकारला तर पैशाची तुलना होईल आणि इतर गैर मार्गाने पैसे मिळणा-या पेशाकडे लक्ष जात राहील; तर उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारला तर शिक्षकी पेशात जिवंतपणा राहील की नाही? याबाबत शंका निर्माण होते.  शिक्षकी पेशा म्हणजे ज्ञानदानाचे, संस्कारदानाचे, चांगलेपणाचे व मानवतेचे व्रत आहे. उद्याच्या अखंड समाजाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या पिढीचे शिक्षक हे शिल्पकार असणार आहेत. त्यामुळे केवळ वाचणे-लिहिणे शिकवणे म्हणजे शिक्षण देणे नव्हे किंवा विद्यार्थी एवढेच शाळेत शिकतात असं नव्हे. तर माणूस कसं बनायचं याचं शिक्षणही त्याला शिक्षकांकडून मिळत असते. त्यामुळे व्रत म्हणून पेशा स्वीकारण्यासाठी देशसेवा, मानवसेवा म्हणून हा पेशा स्वीकारला तर तुम्ही जबाबदारीने स्वतः एक अष्टपैलू शिक्षक बनून पेशाला व देशाला न्याय देऊ शकाल. असा सल्ला चेतन यांनी शिक्षक क्षेत्रात येणाऱ्यांना दिला आहे.