S R Dalvi (I) Foundation

Tr. Damodar Chaudhary

Tr. Damodar Chaudhary

आज आपण श्री.दामोदर शंकरराव चौधरी यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचे शिक्षण HSC/ Ded,BA / Bed,MA Med in Education असे झालेले असून सध्या ते  UGC NET व SET ची preparation करत आहेत. त्यांचे राहते मूळ गाव मु.पो.पार्डी टकमोर ता.जि. वाशिम असे हे एक छोटेसे सुंदर खेडेगाव असून तेथे माणुसकी ने ओतप्रेत भरून असणारी,जीवाला जीव लावणारी माणसे जेथे गुण्या गोविंदाने राहतात. सरांचे सर्व बालपण व 10 वी किंबहुना 12 वी पर्यंतचे शिक्षण हे येथेच पूर्ण झालेले आहे. त्यांचे पुढील शिक्षण हे विदर्भाचे शिक्षण हब म्हणून ज्या शहराची ओळख आहे अशा संत गाडगेबाबा/पंजाबराव देशमुख यांच्या जन्म व कर्म भूमीत म्हणजेच अमरावती या ठिकाणी झाले. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडेल गावकर वाडी ता.देवगड,जिल्हा. सिंधुदुर्ग या ठिकाणी द्विशिक्षकी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून जवळपास 11 वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे सर्व विषय शिकविले जातात.

दामोदर सर हे एका ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र असून त्यांचे आई वडील हे शेतकरी आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ आई वडील यांची मेहनत व संस्कार तसेच शालेय शिक्षक व गुरुजनांच्या प्रेरणेने ते एक चांगला शिक्षक होऊ शकले. शालेय बालपण व जीवन जगत असताना दररोज सकाळी ते शाळेत जायचे व दुपारी  शेतावर गुरे व म्हशी राखण्याकरिता/ चारण्याकरिता त्यांना जावे लागे. अशाही परिस्थितीमध्ये सोबत रानामध्ये पुस्तक घेऊन ते अभ्यास करायचे.  त्यांचा जीव मेटाकुटीस आला तेव्हा त्यांनी ठरविले होते की आपण शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करायचे. शाळेत असताना10 वीत शिकत असताना  त्यावेळी श्री.गोटे नावाच्या सरांचा निरोप समारंभ होता, त्या कार्यक्रमात त्यांचे 300पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्या आजी माजी विद्यार्थ्यांनी सरांबद्दल काढलेले ते भावनिक शब्द एवढे आपुलकी, प्रेमाचे होते त्यावेळी वाटलं ज्या क्षेत्रात पैसा भलेही कमी कमवता येईल पण माणसं नि प्रेमाची श्रीमंती खूप मिळवू शकतो असे क्षेत्र म्हणजे शिक्षक पेशा व आपणही विद्यार्थ्यांच्या मनातला गुरू व्हायचं हे तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं. आई वडील/शिक्षक /समाज व गावाचे नाव मोठे करायचे. असे करत असतानाच 12 वी Math Science ते पास झाले. तेव्हा शासकीय Engineering college ला BE करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला परंतु परत आर्थिक अडचण ही एक बाब व दुसरी म्हणजे Ded झाले की लवकर नोकरी मिळते हा त्यांच्या वडिलांचा हट्ट यामुळे BE चे स्वप्न सोडून शिक्षकी पेशामध्ये त्यांनी पदार्पण केले. एवढेच नसून Ded पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या गावामध्ये सर्वप्रथम त्यांनी KD Chande International Junior/Senior KG ची एक छोटी व सुंदर शाळा स्थापन केली तेथून 1000 हजार रुपयांपासून त्यांनी जीवनाची सुरुवात केली. काही दिवसांनी TET मध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन इकडे ZP सिंधुदुर्ग ला 21/07/2011 ला हजर झाले. अशा या दुर्दम्य परिस्थितीवर मात करून शेवटी आशावाद व मेहनत यामुळे ते शिक्षक होऊ शकले.

एक प्राथमिक शिक्षक म्हणून शैक्षणिक जीवनामध्ये विविधांगी मिळणाऱ्या अनुभवांमुळे जीवनामध्ये त्यांना खुप शिकायला मिळाले. अशाच अनुभवामधील एक अनुभव म्हणजे त्यांची शाळा डिजिटल करत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांनी लोकवर्गणी व लोकचळवळ याद्वारा शाळेचा मुख्य रस्ता/रोड तयार केला व शालेय परिसर स्वच्छ व शाळा संपूर्णपणे ज्ञानरचनावादी व डिजिटल शाळा केली. शाळेमध्ये विविधांगी नवोपक्रम यांची अंमलबजावणी करत असतानाचा अनुभव म्हणा किंवा गावातील गणपती शाळेला भेट असो की वनराई बंधारा बांधने असो असे खुप चांगले अनुभव त्यांना मिळाले.  असाच एक प्रसंग म्हणजे जो ते आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही ते म्हणजे 1)घाणीच्या पाण्यात/तळ्यात तोंडाला प्लास्टिक ची पिशवी अडवून जायबंदी झालेले डुक्कर ज्याला त्यांनी केवळ एक निष्पाप जीव यादृष्टीने त्या घाण पाण्यात पोहत जाऊन त्याचा जीव वाचविला तेव्हाचा अनुभव  व त्या अनुभवाद्वारा समाजामध्ये झालेला सकारात्मक बदल व आयुष्यभर मिळालेला आशीर्वाद एक शिक्षक म्हणून ते कधीच विसरू शकत नाही. या कार्याची दखल जागतिक वन्य प्राणी संघटना व सिंधुदुर्ग आताचे सिंधुदुर्ग Live चॅनेल म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या कोकणसाद ने दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करून सरांना *गुरुगौरव *हा पुरस्कार दिला. तसेच कोविड सदृश कालावधीमध्ये केलेली समाजाची सेवा. बऱ्याच वेळा त्यांचा  blood group दुर्मिळ असा B negative असून खूप मागणी असणारा असा आहे . त्यांनी बऱ्याच वेळा अगदी अडचणीच्या प्रसंगी blood देऊन कितीतरी लोकांचे प्राण वाचविले.  एवढेच नाही तर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची शाळा संपूर्णपणे प्रगत केली असून त्यांच्या शाळेतील मुलांनी जिल्हास्तरावर क्रीडा लंगडी/खोखो /विविध स्पर्धा परीक्षा मध्ये विविध  पुरस्कार मिळविले आहेत…कब बुलबुल यामध्ये सुद्धा त्यांच्या शाळेतील मुलांनी तालुका व जिल्हास्तरावर विविध स्पर्धांमध्ये भरीव अशा प्रकारची अविस्मरणीय कामगिरी केली आहे. यामध्ये अजून मैलाचा दगड म्हणजे सन 2020/2021 या शैक्षणिक वर्षांमध्ये ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ची PET Exam Qualify झाले. तेव्हाचा आनंदी क्षण अवर्णनीय /अविस्मरणीय ठरला असा ठरला. एवढेच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये दरवर्षी पुरुष 400 मीटर धावणे प्रथम क्रमांक,कबड्डी/क्रिकेट मध्ये सुद्धा अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच शिक्षक म्हणून कार्य करत असताना, हुंडाबळी,स्त्री भ्रूण हत्या व पेन्शन मिळणे असो की इतर सामाजिक समस्या यांना तोंड देऊन त्या प्रथा बंद कराव्यात याकरिता त्यांच्या सर्व मित्रांनी मिळून पेन्शनवती भव/छब्बू आर्मी रेस्कु टीम*यासारख्या विविध शॉर्ट फिल्म यामध्ये भूमिका  केली.तेव्हाचा अविस्मरणीय क्षण.असे कितीतरी प्रसंग सांगता येतील.

सरांच्या Achievement खालीलप्रमाणे आहेत.
1) शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित Education Expo 2018 अंतर्गत जि.प.शाळेतील मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी केलेले उपक्रम स्पर्धा /Education App निर्मिती स्पर्धा यामध्ये विशेष उत्तेजनार्थ शिक्षक पुरस्कार मिळाला.
2) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था आयोजित पुणे येथील  पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन 2017 ला पर्यावरण संरक्षणाबद्दल विशेष गौरव केला.
3) Tejas या  Govt of महाराष्ट्र ,British Council, Tata Trusts द्वारा आयोजित राज्यस्तरीय विविध प्रशिक्षणे व तालुका स्तरांवर शिक्षकांचे English भाषा समृद्धी विषयक मुख्य मार्गदर्शक यांची भूमिका बजावत असताना मिळणारा विशेष आनंद…व त्यांची दखल.
4) DIET सिंधुदुर्ग द्वारा आयोजित सामाजिक शास्त्र संबंधित  विविधांगी नाविन्यपूर्ण अध्ययन  अद्यापन या स्पर्धेमध्ये तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळविलेला शिक्षक.
5)डाएट सिंधुदुर्ग द्वारा उत्कृष्ट तंत्रस्नेही प्रशिक्षण पूर्ण केले…व कार्यशाळेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग मुलांकरिता व केंद्रामधील सर्व शाळेतील शिक्षकांच्या online कामे निशुल्क पूर्ण करून समाजसेवा केली. विविधांगी अशाप्रकारे तालुका स्तरांवर १.भाषा व गणित विकास प्रशिक्षण२.शारीरिक शिक्षण कला व क्रीडा प्रशिक्षण ३.समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत वर्ग अध्ययन अध्यापन तंत्रपद्धती प्रशिक्षण४.सिंधू स्पार्क तालुका तज्ज्ञ मार्गदर्शक
Tag Co-Ordinator म्हणून जवळपास 3 वर्षांपासून शिक्षकांचे व मुलांचे English भाषा सुधार म्हणून मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.
6) जिल्हा व तालुकास्तरावर शिक्षक डान्स स्पर्धा यामध्ये कोरिओग्राफर म्हणून केलेली कामगिरी.
7) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चा सन 2017/2018 चा मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणी साठीचा पुरस्कार प्राप्त शिक्षक.
8) राज्यस्तरीय MPS ग्रुप औरंगाबाद याद्वारा मिळालेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.
9) सिंधुदुर्ग live आणि कोकणच पाहिलं दैनिक कोकणसाद  यांच्याद्वारे सन 2021/2022 चा गुरुगौरव पुरस्कार मिळाला
10) आणि यामध्ये भर म्हणजे समाजातील गोरगरिब लोकांचा मिळालेला पाठिंबा व आशीर्वाद व आमच्या प्राथमिक शाळेत मुलांचे भविष्यामध्येही 10 वी /12 वी मध्ये Topper असणे, व या शिक्षणासारखे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडत आहे व या कार्याचा पडसाद म्हणून आज रोजी गावी त्यांची आई गावची सरपंच म्हणून /वडील शेतकरी म्हणून तर भाऊ Indian आर्मी मध्ये नोकरी करून देशसेवेचे कार्य करीत आहेत. अशा या पवित्र शैक्षणिक कार्यापेक्षा कोणतीही मोठी achievement त्यांच्यासाठी असू शकत नाही. तसेच याठिकाणी येऊन मिळालेले सर्व जिवाभावाचे शिक्षक मित्र व नातेवाईक यांची झालेली आयुष्यभराची ओळख , येथील हिरवाईने नटलेला संपूर्ण कोकण भूभाग व निसर्ग दर्शन ,संस्कृती, परंपरा हे कधीच न विसरता येणार अनमोल धन याठिकाणी मिळाले असे त्यांना वाटते.

शिक्षकाबद्दल बोलायचं झालं तर देशाचं भविष्य घडवण्याचं काम शिक्षक करत असतो. म्हणून तर शिक्षकांना Pillar of Nation म्हंटल जातं. पण आजकाल शिक्षकाला ज्ञानदान या त्याच्या मुख्य कामापेक्षा इतर कामांमध्ये जास्त जखडून ठेवले जातं आहे. शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी शिक्षकांच्या खांद्यावरील अतिरिक्त कामाचं ओझं कमी करणे आवश्यक आहे. तसेच दुसरं म्हणजे समाजात पूर्वीप्रमाणे शिक्षकांना मान सन्मानाची वागणूक मिळत नाही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. शिक्षकांना त्यांच्या कार्यात पूर्ण स्वातंत्र्य देणं आणि अपलेपनाची वागणूक देणं गरजेचं आहे तरच अपेक्षित यश मिळेल अस त्यांना वाटते.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मुलांमध्ये मूल्यशिक्षनाचा अभाव खूप प्रकर्षाने दिसून येतो आहे म्हणून घरापासून ते शाळेपर्यंत मूल्यशिक्षण यावर भर दिला जावा . दुसरं मुलांच्या पाठीवरच दप्तराचं ओझं कमी झालं पण डोक्यावर पालकांच्या अपेक्षांचं ओझं मात्र दिवसेंदिवस वाढतं आहे,ज्या ओझ्याखाली मुलांचं बालपण, स्वातंत्र्य दाबलं जातं आहे हे कुठे तरी कमी होणे आवश्यक आहे. तसेच इ १२वी पर्यंत विद्यार्थी गुणात्मक तुलना नसावी त्यामुळे न्यूनगंड भावना वाढीस लागते आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कारण प्रत्येक मुलाची अध्ययन क्षमता वेगवेगळी असते त्याप्रमाणे त्याला शिकता यायला हवं यासाठी सध्याची ‘अध्ययन स्तर निश्चिती’हा कार्यक्रम योग्य आहे. दरवर्षी नवीन धोरण,नवनवीन प्रयोग शिक्षण क्षेत्रात चालू असतात एक कार्यक्रम कमीत कमी पाच वर्षे राबवला जावा तरच त्याचे output मिळतील दिसतील. सरकार बदललं, अधिकारी बदलले,  धोरण बदललं जातं यावर कुठे तरी विचार होणं आवश्यक आहे असे त्यांना वाटते.

देशाचं भविष्य घडवणारा बहुगुणी कलाकार म्हणजे शिक्षक जो कित्येक डॉक्टर, इंजिनिअर,शास्त्रज्ञ,पायलट. यांचा गुरू असतो. अशा पवित्र क्षेत्रात ज्ञानदान जे सर्वश्रेष्ठ दान आहे ते करण्याची संधी मिळते अशा या क्षेत्रात बिनधास्त या प्रामाणिकपणाने आपलं कार्य करत राहावे , प्रसिद्धी,आदर्शा साठी कधीही काम करू नका त्यामागे धावू नका  मुलांच्या मनात ज्या दिवशी आदर्श व्हाल तो तुमचा सर्वात मोठा पुरस्कार असेल  असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.

Scroll to Top