आज आपण शिक्षिका श्रीमती धनलक्ष्मी केशव नि-हाळी (M.A.D.Ed, B.Ed) यांच्या शिक्षिकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती धनलक्ष्मी या आंबेगाव बुद्रुक,तालुका-हवेली,जिल्हा-पुणे येथे राहत असून गेली २० वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निधान, तालुका -भोर,जिल्हा-पुणे येथे शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत. धनलक्ष्मी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे त्या इयत्ता 8वीत असल्यापासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी वर्ग घेत होत्या .ज्यामुळे त्यांच्या घरी थोडीफार आर्थिक मदत होत होती .
1996 साली D.Ed कमी पैशात होणारे असे शिक्षण होते आणि ते केले की नोकरीसाठी कोणतीही अडचण येणार नाही या हेतूने धनलक्ष्मी यांनी D.Ed ला प्रवेश घेतला. आणि याच क्षेत्रात आवड निर्माण झाली.
1998 साली धनलक्ष्मी यांचे D.Ed पूर्ण झाले मात्र त्या वर्षी शिक्षक भरती झालीच नाही. त्यानंतर त्यांनी B.A, Computer Courses, MSCIT हे असे कोर्स केले.अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. maternity leave वर गेलेल्या शिक्षकांच्या जागेवर त्यांनी 3 महिने काम केले.असेच जवळजवळ तीन वर्षे सुरु राहिले अखेर डिसेंबर 2001 साली जिल्हा परिषदेची मोठी भरती झाली. आणि त्यांना चांगले मार्क असल्यामुळे पहिल्या यादीमध्ये त्यांचा नंबर लागला.
अविस्मरणीय क्षण / प्रसंग:
शिक्षिका धनलक्ष्मी यांची पहिली नोकरी काठापूर बुद्रुक,तालुका आंबेगाव,जिल्हा-पुणे येथील शाळेत होत. तिथे त्यांनी 3 वर्षांचा शिक्षक सेवक कालावधी पूर्ण केला. या ३ वर्षात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खूप काही चांगले मार्गदर्शन केले.त्यांची जेव्हा तिथून बदली झाली त्यावेळी निरोप समारंभाच्या वेळी शाळेतील सगळे जण खूपच भावुक झाले आणि त्यांच्या गावचे सरपंच मा.श्री अशोक कारंडे यांना देखील आपले अश्रु आवरता आले नाही. तो क्षण धनलक्ष्मी यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता.
Achievement:
2004 साली धनलक्ष्मी यांच्याकडे इयत्ता 4थी चा वर्ग शिकवण्यासाठी होता 100% विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते आणि त्या वर्षी 100% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धनलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. हीच त्यांच्यासाठी मोठी अचीवमेंट आहे.
विद्यार्थ्यांनी फक्त गुण मिळवण्यासाठी अभ्यास करू नये तर त्या ज्ञानाचा व्यवहारात ही त्याचा वापर केला पाहिजे. असे धनलक्ष्मी यांना वाटते.
शिक्षक होणाऱ्यांसाठी सल्ला:
शिक्षक हा असा पेशा आहे ज्या मध्ये समाधान मिळते, शिवाय उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ही त्याच्याकडे पाहिले जाते. शिक्षक झाले की आपले काम प्रामाणिकपणे करा, त्याची पोहच पावती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा बहुमोल सल्ला शिक्षिका धनलक्ष्मी यांनी दिला.