आज आपण श्री. दिनकर पांडुरंग फसाळी ( MA Ded DSM) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. दिनकर सर हे मु.पो. खोडाळा, जि. पालघर येथे राहत असून गेले १८ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहेत. सध्या ते जिल्हा परिषद शाळा कोचाळे या शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
विद्यार्थी आणि समाजात असलेला मान मिळणारा आदर या गोष्टींना प्रभावित होवून, तसेच इयत्ता १० वित असताना शिक्षक दिनाच्या दिवशी इयत्ता ९वी च्या मुलांना शिकविण्याची संधी त्यांना मिळाली आणि शिकविलेल्या कवितेस मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि त्यांचा वाढलेला आत्मविश्वास यामुळे त्यांनी शालेय जीवनातच ठरवले होते की व्हायचं तर शिक्षकच.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना त्यांना काही अडचणी आल्या कारण घरात शैक्षणिक वातावरण नसल्या सारखे त्यात कोनिही मोठी व्यक्ती मार्गदर्शक नसल्यामुळे स्वतच माहीती मिळवायची आणि स्वतःच प्रयत्न करायचे असे होते परंतु त्यांना नशिबाने साथ दिली आणि शासकीय ded कॉलेजला त्यांचा नंबर लागला आणि शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले
शिक्षक म्हणून १८.वर्षाच्या प्रवासातील असा अनुभव जो अविस्मरणीय आहे तो म्हणजे २०१४ साली शिक्षणात डिजिटलतंत्रज्ञानाचे वारे वाहत असताना पालघर जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा सरानी बनवली ती ही १००% आदिवासी पाड्यावर आणि लोक सहभागातून याची दखल घेवून तत्कालीन शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या समोर जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेत यांची यशोगाथा मांडण्याची संधी मिळाली आणि मा. नंदकुमार साहेबांच्या हस्ते झालेला सन्मान एक अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी आहे.
दिनकर सरांच्या आतापर्यंतच्या Achievement :
1) पालघर जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा व राज्यातील दुसरी टॅब स्कूल -.जिल्हा परिषद शाळा – सावरपाडा
2) तालुक्यातील पहिली ISO शाळा – जिल्हा परिषद शाळा कोचाळे
3) जिल्ह्यातील पहिली आणि राज्यातील एक विद्यार्थी सुटाबुटात आसलेली शाळा – सावरपाडा
४) अनेक प्रसार माध्यमांनी शाळेची घेतलेली दाखल
५) मिपा औरंगाबाद यांच्या फ्लीप बुक मध्ये शाळेची यशोगाथा प्रसिद्ध – जिल्हा परिषद शाळा – कोचाळे
६) शाळेत राबविलेल्या उपक्रमाचे शिक्षणाची वारी च्या मध्यातुन २०१८/१९ मध्ये महाराष्ट्र भर सादरीकरण कामाची दखल घेवून१) नोकरीच्या ३ ऱ्या वर्षी NPEGEL चां जिल्हा स्तरीय पुरस्कार २) नोकरीच्या ९व्या वर्षी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार ३)नोकरीच्या १२व्यां वर्षी जिल्हा परिषद पालघर आदर्श शिक्षक पुरस्कार. विविद्ध सामाजिक संस्था कडून दोन राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
जिल्हा परिषद शिक्षकांनी शाळा हे मंदिर आणि आपण त्या मदिराचे पुजारी समजून विद्यादानाचे पवित्र काम करावे, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान घेवून नाही तर सर्वांगीण विकास साधावा
ज्ञानदानासारखे पवित्र कार्य नाही निस्वार्थी कार्य करावे असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.