आज आपण श्री.दिनकर सुर्यकांत शिरवलकर (B.A. D.Ed.B.Ed.) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. श्री दिनकर कुडाळ,सिंधुदुर्ग येथे राहत असून गेले १३ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सध्या ते मालवण तालूक्यातील पेंडूर सोनारवाडी येथे शिकवण्याचे कार्य करत आहेत.
श्री दिनकर यांनी १२ वी सायन्समधून पूर्ण केल्यावर त्यांना इंजिनियरींग करायचे होते. मात्र त्या वेळेस त्यांचे वडील नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यामूळे लवकर शिक्षण पूर्ण करून एखादी सरकारी नोकरी मिळवावी असा एक संकुचित दृष्टीकोन त्यांचा बनून गेला. त्यांचा एक मित्र प्रज्योत सावंत याची आई शिक्षिका होती तसेच जवळचा मित्र अजिंक्य कुळकर्णी याचे वडील सुद्धा शिक्षक होते. त्यांचा प्रभाव तर दिनकर यांच्यावर होताच मात्र त्यांचे मार्गदर्शन सुद्धा वेळोवेळी त्यांना लाभत होते. त्यामुळे अखेर खुप विचार केल्यानंतर त्यांनी इंजिनियरींग सोडून डि.एड ला अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतला.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
शिक्षक दिनकर ज्या शाळेत नोकरीलासाठी त्या शाळेत सहा संगणक होते. ग्रामस्थांच्या मदतीने संगणक कक्ष उभारला. लँडलाईन कनेक्शन शाळेत घेऊन इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्शन जोडले.सहा संगणक LAN नेटवर्कींगने जोडले.तसेच विद्याभारती मार्फत मिळालेला चाणक्यनिती हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी २०१२ मध्ये श्री.अंकुश गुरव या दात्याच्या मदतीने शाळेत प्रोजेक्टरसूद्धा घेतला.अशी २०१२ मध्ये माझी शाळा डिजीटल झाली. या सर्व प्रवासाचा श्री दिनकर हे भाग होते हा त्यांच्यासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय काळ आहे.
संगीत क्षेत्राची कोणतीच जाण नसताना कोरीओग्राफर व स्थानिक संगीतप्रेमींच्या सहाय्याने श्री दिनकर यांच्या शाळेतील मुले सलग पाचवेळा लहान गट ,मोठा गट जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत चमकली आहेत.
२०१६ मध्ये कट्टा नं.१ येथे त्यांची बदली झाली .तिथेसुद्धा ग्रामस्थांच्या मदतीने पैसे जमवून कट्टा नं.१ शाळा डिजीटल केली.इंग्रजी माध्यमाची मुलेसुद्धाआमच्या शाळेत दाखल झाली.
समाजात विशेषतः गावात शिक्षकाला खूप मान दिला जातो. मात्र काही प्रकारांमूळे शिक्षक व समाजातील समन्वय कमी झालेला दिसून येतो.मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर समाज व शिक्षक या दोघांचीही जबाबदारी समसमान आहे. त्यामूळे समाज व शिक्षक एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे व हे होतच आहे.यामुळेच तर शाळांचा चेहरामोहरा बदलत आहे. असे मत शिक्षक दिनकर यांनी व्यक्त केले.
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला:
ज्यांना नव्याने व शिक्षक व्हायचे आहे त्यांनी आपल्याकडे किती ज्ञान आहे याच्यापेक्षा आपण किती चांगल्या पद्धतीने असलेले ज्ञान दुसऱ्याला देऊ शकतो हे महत्त्वाचे. सर्वजण सर्वगुणसंपन्न होऊ शकत नाहीत मात्र उपलब्ध साधनशक्तींचा वापर करून विकास साधणे हे महत्त्वाचे.असा सल्ला शिक्षक दिनकर यांनी शिक्षक होणाऱ्यांना दिला.