आज आपण श्री.गौरव शंकर नाईक B.Sc.B.Ed.(Maths) यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. गौरव सर हे पेंडूर – तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे राहत असून गेली १० वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. आणि सध्या ते जि. प.पू. प्रा. केंद्रशाळा मठ नं.१, ता – वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या शाळेत कार्यरत आहेत.
गौरव सरांना शिक्षक होण्याचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले कारण त्यांच्या घरातील तीन पिढ्या शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांचे आजोबा त्या वेळेच्या जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांची आत्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि आता ते जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून कार्यरत आहे त्यामुळे त्यांच्या जीवनाचा प्रवास व त्यांचे शिक्षण हे शिक्षक होण्याच्या दृष्टीनेच पुढे चालू राहिले. घरातील सर्वांच्या मार्गदर्शनामुळे लहानपणापासूनच शिक्षक होणे हे त्यांचे ध्येय राहिले व त्यापासून ते कधीही विचलित झाले नाही व ते ध्येयही त्यांनी साध्य केले
कोणत्याही विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकाला कठीण वाटते असे त्यांना वैयक्तिकरित्या कधीच वाटले नाही कारण प्रत्येक विद्यार्थ्याची संपादणूक पातळी वेगवेगळी असते ती प्राथमिक स्तरावर समजणे गरजेचे आहे व त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या संपादनूक पातळीनुसार समजून घेऊन अध्यापन केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला कोणताही विषय कठीण वाटणार नाही व आपणास अध्यापन करणे देखील सोपे जाईल
विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ते वर्गामध्ये जास्तीत जास्त कृतीयुक्त अध्यापनाचा वापर करतात. बऱ्याच वेळा 100% कृतीयुक्त अध्यापन करणे साध्य होत नाही तरीपण ते 80% पर्यंत कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सरांजवळ गणित व विज्ञान हे विषय असल्यामुळे विविध कृती त्यांना घेता येतात त्यांच्या यूट्यूब चैनल ला देखील त्यांनी घेतलेल्या कृतींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही आपण पाहू शकता.
विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी ते प्रथम त्यांना यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देतात, त्यांच्या वर्गातील विद्यार्थी स्वतःच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत त्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला आणि ते मोठे झाले ही दहा वर्षाच्या अनुभवातील त्यांच्या विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन मुलांनी देखील त्याप्रमाणे बना तेही तुमच्या सारखेच विद्यार्थी होते त्यांनी अभ्यास केला आणि यश प्राप्त केले तसे तुम्हीही मिळवू शकता असे विद्यार्थ्यांना सर मुलांना पटवून देतात. जे त्यांचे विद्यार्थी आहेत काही इंजिनिअरिंग मेडिकलचे शिक्षण घेत आहेत काही विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना शक्य असल्यास शाळेमध्ये येऊन ते त्यांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा घडवून आणतात त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांना प्रेरित करून आयुष्याबद्दल विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो
सर हायस्कूलला कार्यरत होते त्यावेळी बऱ्याचदा पालकांशी त्यांचा संपर्क व्हायचा, बरेचसे पालक विशेषता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक हे विद्यार्थी अभ्यासात लक्ष देत नाहीत मोबाईलवर तासांचा वेळ घालवतात याविषयी तक्रार घेऊन येत याची ज्यावेळी कारणे शोधली गेली त्यावेळी विद्यार्थी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे दिसून आले यावर उपाय म्हणून सोशल मीडिया द्वारे होणारे सायबर क्राईम फसवणूक इत्यादी प्रकार जे दहावी विज्ञान च्या पुस्तकात देखील आहेत विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणणे त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर ऑनलाईन राहण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेले दिसून आले
गौरव सर वर्गामध्ये अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करतात. पृथ्वीगोल दाखवण्यासाठी ते एप्लीकेशन चा वापर करतात. आकाशदर्शन दाखवण्यासाठी स्टेलेरियम सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतात. विविध ठिकाणी होणारी वादळ दाखवण्यासाठी वाईंडी किंवा नल स्कूल डॉट कॉम यासारख्या वेबसाईटचा उपयोग करतात. प्ले स्टोअरवर पी एच इ टी सारखी काही एप्लीकेशन आहेत जी केमिस्ट्री विषयासाठी उपयुक्त आहेत जिओजेब्रा सॉफ्टवेअर चा उपयोग करून गणित विषयाचे मार्गदर्शन करतात तसेच आवश्यक तेथे YouTube चा देखील उपयोग केला जातो
शालेय विज्ञान प्रदर्शन हा माध्यमिक स्तरावर विज्ञान विषयासाठी एक जणू उत्सवच मानला जातो या विज्ञान प्रदर्शनात सर हायस्कूलला असताना सलग तीन वर्ष तालुकास्तरावर पारितोषिक मिळवून जिल्हास्तरावर त्यांच्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले, ते ज्यावेळी प्राथमिक ला आले त्यावेळी देखील शिक्षक व प्रतिकृती मधून मी बनवलेल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या उपकरणास तालुक्यात क्रमांक प्राप्त झाला. विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी बक्षीसे मिळवली हायस्कूलला असताना त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मध्ये मेरिटमध्ये येऊन यश मिळवले सलग सात वर्षे क्लासेस व हायस्कूलच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी गणित व विज्ञान विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवले यासारखे अनेक उदाहरणे आहेत जी त्यांना अचीवमेंटच वाटतात.
नुकतीच त्यांची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आईसर विज्ञान केंद्र पुणे या ठिकाणी शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड झाली. देशामध्ये अशी निवडक आईसर आहेत आणि त्यातील पुण्यातील आयसरमध्ये त्यांची निवड झाल्याने हे खरोखरच त्यांचे भाग्य आहे असे ते मानतात. या ठिकाणी दहा दिवसात त्यांना जे अनुभव मिळाले ते खरोखरच त्यांच्या साठी अविस्मरणीय होते. ग्रामीण भागातील ज्ञान आणि केंद्रस्तरावर ते ज्ञान त्याच्यावर केलेले संशोधन याची माहिती त्यांना मिळाली.