आज आपण श्री.गिरीश बाळासाहेब कुलकर्णी यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. गिरीश सरांचे शिक्षन बी फार्मसी,गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,येथून झाले.सध्या ते परभणी येथे वास्त्यव्यास असून ते सध्या एमएसपी मंडळाचे श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी परभणी या महाविद्यालयात कार्यरत आहेत व त्यांना शिक्षण क्षेत्रात एकूण 36 वर्षांचा अनुभव आहे.
तुम्हाला शिक्षक व्हावेसे कधी व का वाटले? (प्रसंग असल्यास तो हि लिहा)
:- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी फार्मसी कॉलेज ,परभणी येथे अधिव्याख्याता म्हणून माझी निवड झाली.कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी परभणी हे ठिकाण अत्यंत उत्तम होते म्हणून मी शिक्षक हा पेशा स्वीकारला.शिक्षकी पेशाचा काही अनुभव नव्हता ,परंतु काम करता करता हळूहळू आवड निर्माण झाली.
ज्या विद्यार्थ्याला शिकवणे तुम्हाला कठीण वाटते त्याला तुम्ही कसे हाताळता?
:- काही मुलांना लिहिलेले लक्षात राहते तर काहींना ऐकलेले लक्षात राहते,तर काहीजणांना रोजच्या जीवनातले काही उदाहरण देऊन गोष्टी रूपाने सांगितले तर लक्षात ठेवणे सोपे जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करून मुलांची संवाद साधून त्यांना किती आकलन झाले आहे त्याचा अंदाज घेऊन पुन्हा सांगतो.विषयाच्या मूळ संकल्पना नीट समजावून सांगतो,स्वयंपाक घरातील छोट्या छोट्या उदाहरणातून गंमतशीर उदाहरण देतो,त्यामुळे लक्षात ठेवणे सोपे जाते.
तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
:- मुळात शिकणे आणि शिकवणे हा एक आनंददायी प्रवास आहे.मुलांच्या मनातील परीक्षेचे भीती काढून टाकण्याचा प्रयत्न करतो,वाचन मनन आणि लेखन ही त्रिसूत्री अमलात आणण्यासाठी प्रेरणा देतो.
तुम्हाला पालकांशी संवाद साधायला आवडते का? मुलांच्या पालकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत?
:- मी शिकवत असलेला कोर्स हा बारावी नंतरचा डिप्लोमा कोर्स आहे,विद्यार्थ्यांचे वय जास्त असल्यामुळे, शाळे इतका पालकांचा फारसा संबंध येत नाही,परंतु विद्यार्थ्यांना जमेल तसे मार्गदर्शन करतो प्रामुख्याने खेड्यातून आलेल्या मुलांना व वसतिगृहात राहत असणाऱ्या मुलांना त्यांच्या राहण्या व खाण्यापिण्याच्या व्यवस्थेविषयी आपुलकीने चौकशी करतो.
तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
:- पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अवघड विषय टप्प्याटप्प्याने समजावून सांगतो,
मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस चे व्हिडिओ प्रोजेक्टरच्या माध्यमातून वर्गात दाखवून विषय सोपा करून सांगतो.
शिक्षण क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी Achievement कोणती?
:- नुसत्या डिप्लोमा कोर्स वर न थांबतापुढील शिक्षण घेण्यासाठी मी सतत प्रेरणा देत असतो, त्यातील माझ्या काही विद्यार्थ्यांनी ,ग्रॅज्युएशन,पोस्ट ग्रॅज्युएशन,इतकेच नाही तर पीएचडी पर्यंत शिक्षण घेतले आहे व आज ते उच्च पदावर काम करत आहेत,याचे मला अतिशय समाधान आहे आणि हीच माझी सर्वात मोठी अचीवमेंट आहे.
शिक्षक म्हणून तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे.
:- 20 – 22 वर्षानंतर सुद्धा विद्यार्थी भेटल्यानंतर आदराने बोलतात , मी शिकवलेल्या संकल्पना अजूनही लक्षात आहेत याचा उल्लेख करतात.तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये खूप प्रगती झाली असे आवर्जून सांगतात.