S R Dalvi (I) Foundation

Tr. Glanice Pinto

Tr. Glanice Pinto

आज आपण सौ.ग्लॅनीस रॉजर पिंटो यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ग्लॅनीस मॅडम या वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १७ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या मदर तेरेसा, वेंगुर्ला या शाळेत विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

टीचर ग्लॅनीस याना ज्ञानदानाची अत्यंत आवड आहे. या आवडीमुळेच त्यांनी शिक्षकी पेशा निवडण्याचे ठरविले. आणि त्यातही विज्ञान विषयावर त्यांचे अपार प्रेम आहे. त्यामुळेच विज्ञान शिक्षिका व्हायचे असे त्यांनी ठरविले. मात्र पूर्वापासून शिक्षिकाच व्हावे- हा हेतू नव्हता. सुरुवातीला स्वावलंबन व गरज म्हणून खाजगी शिकवणी त्या घेत असत त्यानंतर बी. एड्. चे त्यांनी शिक्षण घेतले व याच क्षेत्रात सक्रिय असा सहभाग घ्यायचे ठरवले.

काही विद्यार्थी स्वतःहून ज्ञानार्जनाची आवड असलेले भेटले. परंतु काहीना विषयांची आवड व गोडी निर्माण व्हावी म्हणून अथक प्रयत्न त्यांना घ्यावे लागले. अशावेळी विद्यार्थ्यांना शिकविणे समजावणे कठीण जाते. परंतू आता ओळखणे त्यांच्या समस्या हाताळणे अनुभवामुळे शक्य झाले आहे.

विद्यार्थी ज्ञानार्जन करत असताना त्यांच्या कलाने शिकविणे- सोप्या पद्धतींचा / अवलंब करणे व क्लिष्ट असा विज्ञान विषय सोपा करून सांगणे हे शिक्षकाचे कसब असते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला विज्ञान विषयाचा अभ्यास आवडीने करण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करतात. त्यासाठी विविध संदर्भ, प्रात्यक्षिके यांचा आधार त्या घेतात.

सध्या कार्यरत असताना एक शिक्षक म्हणून त्यांना मुलांच्या पालकांशी संवाद साधणे हे खूप मोठे माध्यम आहे असे वाटते. कारण त्यामुळे आपण प्रत्येक विद्यार्थ्याला फार जवळून ओळखू शकतो व त्याच्या समस्यांचे योग्य ते निराकरण करू शकतो. म्हणूनच विदयार्थ्यांच्या पालकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्या वेळावेळी पालकांना मुलांच्या प्रगती संदर्भात जागृत करतात.

एक विज्ञान शिक्षिका या नात्याने त्या केवळ प्रश्नोत्तरे पाठवाचन किंवा चर्चा यांचा वापर न करता प्रत्येक घटक मुलांना समजावून सांगून त्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देखील देतात. त्याचप्रमाणे डिजिटल व तंत्रज्ञानाचा वापर व प्रात्यक्षिके देखील दाखवतात.

एक विद्यार्थीप्रिय व स्वतःला शिक्षिका व स्वतःला सतत विद्यार्थी समजून updated knowledge मिळविणे व ते इतरांना देणे हीच सर्वात मोठी Achievement आहे असे त्या मानतात.

अविस्मरणीय प्रसंग – २०१८ सालातील विज्ञान प्रदर्शन व एका विद्यार्थ्याने व मी बनविलेली प्रतिकृती- स्वयंचलित विदयुत उपकरणे बनवली.

Scroll to Top