आज आपण हर्षदा पांडुरंग पाटणकर (BA,Bed ) यांचा शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवास याबद्दल जाणून घेणार आहोत. हर्षदा टीचर या मु.पो.कलमठ ता.कणकवली जि.सिंधुदूर्ग येथे राहत असून सध्या त्या फोंडाघाट गांगोवाडी या शाळेत कार्यरत आहेत.
कन्या शाळा राधानगरी येथे शिकत असताना त्यांच्या वर्गशिक्षिका म्हापसेकर बाईंमूळे त्यांना शिक्षक व्हावेसे वाटले.
ज्या विद्यार्थ्याला शिकवणे त्यांना कठीण वाटते अशा मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असते तसेच त्यांच्या कौटुंबिक समस्या देखील पहाव्या लागतात. कोणत्या क्षामता विषयानुरूप पहाव्यात लागतात आणि त्यावर त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचे असते व त्यांचा खूप सराव घ्यावा लागतो असे त्यांना वाटते.
यशस्वी व्यक्तीच्या गोष्टी त्या मुलांना सांगतात. त्यांच्या प्रगतीमूळे भविष्यात होणारे परिणाम त्या मुलांना सांगतात तसेच कोणत्या विषयात कसे पुढे जाता येईल याचे योग्य मार्गदर्शन करून त्या मुलांना प्रेरित करतात. १०/१२वीत मार्क चांगले कसे आणता येतील त्यावर तुम्हाला कुठे जाता येईल त्यांची स्वप्ने कशी पूरी होतील स्वप्ने कशी पूर्ण होतील यावर वारंवार मार्गदर्शन करून त्या मुलांना मोटिवेट करतात.
पालकांना मुलांच्या प्रगती बाबत बोलून त्यांचा मुलगा/मुलगी कशामध्ये मागे आहे हे सांगून पालक व शिक्षक यांच्यामध्ये समन्वयाने त्याची कशी प्रगती करता येईल याबाबत सतत चर्चा त्या पालकांसोबत करत असतात. हर्षदा टीचर वर्गात दिक्षा हे शैक्षणिक app, इंटरनेट search, डिजिटल education या तंत्रज्ञानाचा वापर करतात.
जिल्हा स्तरापर्यंत मुले कबड्डी,खो.खो, समूह नृत्य ,समूह खान,उंच उडी,लांब उडी, धावणे ,वक्तृत्व,निबंध स्पर्धेत जातात ही त्यांची अचिव्हमेंट आहे. समूह नृत्य स्पर्धेत जिल्हास्तरीय दुसरा नंबर मिळाला तेव्हा हा त्यांच्या शिक्षक म्हणून आतापर्यंतच्या प्रवासातील अविस्मरणीय अनुभव आहे.