S R Dalvi (I) Foundation

[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”Tr. Hemant Gopal Pakle” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1663743492525{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”9918″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”Tr. Hemant Gopal Pakle” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]आज आपण शिक्षक श्री. हेमंत गोपाळ पाकळे (B.Sc.B.Ed.M.A.Ed.) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांना एकूण १७ वर्षांचा अनुभव आहे . ते सध्या पांडुरंग गोविंद महाडीक माध्यमिक विद्यालय धामापूर ता. संगमेश्वर या शाळेत कार्यरत आहे.

मी हेमंत गोपाळ पाकळे माझे शिक्षण B.Sc.B.Ed.M.A.Ed. झाले असून मी गेली 17 वर्षे महाराष्ट्र राज्यातील एक अग्रणी संस्था सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे या संस्थेच्या विविध शाखांमध्ये सेवा केली असून सध्या मी या संस्थेच्या पांडुरंग गोविंद महाडीक माध्यमिक विद्यालय धामापूर ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी या प्रशालेत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे माझे मराठी माध्यमाचे विद्यालय असून 118 विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत आणि मी या विद्यालयात विज्ञान विषयाचे अध्यापन करीत आहे.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले ?

मी लहानपणी आमच्या गावी निवळी हायस्कूलला शिकत असताना विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत होतो. त्या दिवशी आम्ही शिक्षक झालो होतो आणि शिक्षक म्हणून आम्हाला अध्यापन करावयाचे होते माझ्यावर इयत्ता नववीचा वर्गशिक्षक म्हणून जबाबदारी होती माझा पहिला तास मला शिकवायचे असल्यामुळे मी चांगली तयारी देखील केली होती त्यादिवशी शिकवत असताना मला आजही आठवते मी विज्ञान विषयाचा पाठ घेत होतो माझा आवाज मोठा व स्पष्ट होता शिवाय मी मुलांना प्रश्न विचारत होतो पाठ संपल्यानंतर त्यावेळी माझे वर्गशिक्षक तसेच माझे मित्र यांनी मला सांगितले तू चांगला बोलत होतास, शिकवत होतास आणि तुझा पाठ चांगला झाला त्यावेळी मला कोणतीही भीती वाटली नव्हती शिवाय मला एक विश्वास देखील आला होता होता की आपण चांगले बोलू शकतो लहानपणापासूनच शिक्षकांविषयी चा प्रचंड आदर होता. शिवाय माझी आई अंगणवाडी सेविका होती तसेच माझे वडील देखील अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे प्रचंड अभ्यासक असून त्याविषयी बऱ्याच जनाना माहिती देताना मी पाहत आलेलो आहे त्यामुळे मला खुणावत होते की आपण देखील एक चांगला शिक्षक म्हणून घडावे.

सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?

नाही, तशा फारश्या काही अडचणी आल्या नाहीत कारण माझे आई-वडील शिक्षणासाठी फार उत्सुक व आग्रही होते उलटपक्षी आई वडिलांना वाटे मुलांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नाव कमवावे त्यामुळे शिक्षणासाठी त्यांनी मला कुठेही कमी पडू दिले नाही शिक्षण घेण्यासाठी आई-वडिलांनी आमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास व उमेद जिद्द निर्माण केली आहे . माझे मोठे भाऊ, बहीण यांचे अधिक शिक्षण झाल्यामुळे त्यांचा देखील माझ्यावर तसा संस्कार झाला होता. आई-वडिलांच्या भाऊ बहीण यांच्या प्रचंड पाठबळामुळे मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो आहे. तसेच मी ज्या संस्थेत शिकलो, घडलो ती सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे या संस्थेतच मला सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे परमभाग्यच समजतो.

शिक्षक म्हणून 17 वर्षाच्या प्रवासातील असे काही क्षण , अनुभव जे अविस्मरणीय आहेत .

जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हापासून ते आतापर्यंत माझ्या या सेवेतील असे अनेक सुवर्ण क्षण ,अविस्मरणीय क्षण माझ्या सेवेत घडले आहेत निर्माण झाले आहेत. काही अनमोल क्षण यानिमित्ताने मी येथे व्यक्त करू इच्छितो. माझ्या सेवेच्या सुरुवातीलाच साधारण सन 2005-06 या शैक्षणिक वर्षामध्ये मी व माझे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता मी शिक्षक साहित्य गटामध्ये मॉडेल मांडले होते त्यावेळी दापोली तालुक्यामध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये माझा प्रथम क्रमांक लागला होता . माझ्या मॉडेलची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आणि महत्त्वाचे म्हणजे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये देखील माझ्या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. त्यावेळी मिळालेल्या या यशामुळे मी खूपच भारावलो होतो. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते मला गौरविण्यात आले खरंतर सेवेच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या यशामुळे माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्‍वास, जिद्द निर्माण झाली होती . सन 2007-08 इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा माझे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यावेळी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ना मधून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी आमच्या मॉडेलची निवड झाली होती. खरंतर विज्ञान प्रदर्शनामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी गटातून, मला शिक्षक गटातून आजपर्यंत सातत्यपूर्ण यश मिळत आले आहे. क्रीडा क्षेत्रातील मिळालेले यश मला येथे सांगावेसे वाटते सन 2008-09 या वर्षामध्ये दमामे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मी खो- खो खेळाचे मार्गदर्शन केले होते. खो -खो मुलांचा गट त्यावेळी दापोली तालुक्यात विजयी झाला होता अत्यंत अटीतटीचा हा सामना होता दोनदा टाय झाला होता तिसऱ्या वेळेस माझ्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून आम्ही जिल्ह्याला पोहोचलो होतो. विद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी आज पर्यंत निवेदन करीत आलेलो आहे विद्यालयात मी मार्गदर्शन केलेल्या काही एकांकिका त्यावेळी डॉ. काशिनाथ घाणेकर चषक एकांकिका स्पर्धांमध्ये उत्कृष्ट ठरल्या होत्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेली आम्ही सारे एकाच रक्ताचे ही एकांकिका त्यावेळी प्रेक्षकांना खूपच भावली होती. विविध शालेय उपक्रम, स्पर्धा, विज्ञान, सांस्कृतिक क्रीडा, पर्यावरण विषयक आरोग्यविषयक उपक्रम राबवत असताना दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजी माझी रत्नागिरी जिल्ह्याचा मानाचा पुरस्कार साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्कारासाठी निवड झाली तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याच्या उपशिक्षणाधिकारी तसेच रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आदी मान्यवर यांच्या हस्ते मला या पुरस्काराने गौरविण्यात आले. सातत्याने कार्य करत असताना सन 2017-2018 निवळी बावनदी विद्यालयाचा रौप्य महोत्सव साकारण्याची संधी मिळाली. रौप्य महोत्सव प्रसंगी विद्यालय डिजिटल करण्यात आले होते तसेच या रौप्य महोत्सवाचे निवेदन करण्याची संधी देखील मला मिळाली होती हा माझ्यासाठी अपूर्व क्षण होता तसेच या रौप्यमहोत्सव प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. शेखरजी निकम सर यांच्या हस्ते मला गौरविण्यात आले होते. हा माझ्या सेवेतील सुवर्णक्षण होता. केलेल्या कार्याची पोचपावती पुरस्काराच्या माध्यमातून मिळत होती. हेरिटेज प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार ता. लांजा, स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार, विश्व समता कला मंच लोवले ता. संगमेश्वर या संस्थेचा राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार, स्वराज्य शिक्षक संघ आणि स्वामी विवेकानंद समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोव्हिड स्वराज्य समाज रक्षक पुरस्कार तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून मी केलेल्या कार्याची ओळख करून घेऊन पुरस्काराच्या माध्यमातून मला अधिक कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. खरंतर मिळालेले हे पुरस्कार माझ्या सेवेतील अपूर्व क्षण आहेत असे मी मानतो कारण या पुरस्काराच्या माध्यमातून मला वेळोवेळी अफाट कार्य करण्याची उमेद, प्रेरणा, ऊर्जा मिळत आलेली आहे .

तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती ?

विद्यालयात विविध राबवलेले उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा ,विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षा, अखिल भारतीय विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन ,क्रीडा स्पर्धेतील यश, विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम, डिजिटल शाळा, संस्कृतिक कार्यक्रम आदी विभागातील सातत्यपूर्ण यशाच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने झालेला सन्मान तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष यांनी केलेले अभिनंदन व दिलेली प्रेरणा तसेच सह्याद्री उद्योग समूह अहमदनगर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षणरत्न पुरस्काराने मला अनाथांची माता डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात आले हे क्षण माझ्यासाठी अनोखे आहेत. तसेच विज्ञानातील सातत्यपूर्ण यश, विज्ञान कार्यशाळेतील मार्गदर्शन याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कोरोनाच्या लॉकडाउन काळात एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून स्वतःच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता दहावीसाठी सुरू केलेल्या अभ्यासमाला , प्रश्नसराव माला, ऑनलाईन वर्कशॉप आदि. कार्याची दखल घेऊन दादासाहेब फाळके कोव्हीड योद्धा अवॉर्ड 2020 ही माझ्या सेवेतील Achivement समजतो.

समाजात शिक्षक -विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?

बदलत्या काळात किंवा स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला अधिक उन्नत करायचे असेल तर शिक्षकाने अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित होणे आवश्यक आहे पारंपारिक अध्यापन पद्धती बदलून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अभिव्यक्ती , कलाविष्कार , सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी वेगवेगळ्या अध्यापन तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे .या माहितीच्या युगात वेगवेगळे माहितीचे स्त्रोत उपलब्ध असून शिक्षकाने स्वतः डिजिटल असणे आवश्यक आहे. आधुनिक अध्यापनाची तंत्रे आत्मसात करणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याने देखील या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर उत्तम शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील स्वतःची बलस्थाने ओळखून योग्य दिशेने मेहनत घेतली तर नक्कीच यश मिळणार आहे, ठरवलेल्या ध्येयाशी सातत्याने प्रयत्नशील राहिल्याने ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करता येते हे लक्षात घ्यावे.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

आज समाज विकासाच्या दृष्टीने व राष्ट्र विकासाच्या दृष्टीने शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे कारण आजचे बालक घडले अधिक ज्ञानसमृद्ध झाले तर देश बदलणार आहे यासाठी शिक्षकाने दूरदृष्टी ठेवून त्याने स्वतःला अधिकाधिक ज्ञानसमृद्ध करणे आवश्यक आहे ज्यांना शिक्षक व्हायचे असेल त्यांनी अगोदर स्वतःला निरंतर विद्यार्थी म्हणून समजावे कारण स्वतःमध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती, स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे आपण स्वतः उपक्रमशील असणे आवश्यक आहे नाविन्यपूर्ण, क्रिएटिव्ह करण्याची उमेद सातत्याने ठेवणे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे अवलोकन केले तर नक्कीच शिक्षकाने स्वतःमध्ये बदल करून नव्या शैक्षणिक धोरणानुसार आपण समृद्ध असणे आवश्यक आहे.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]

Scroll to Top