S R Dalvi (I) Foundation

Tr. Iliyas Abdul Latif Shaikh

Tr. Iliyas Abdul Latif Shaikh

मी इलियास अब्दुल लतीफ शेख. (BSC, MA, B.ed , D.ed )सोलापुर येथे राहत असून गेले 17 वर्ष शिक्षक क्षेत्रात काम करत आहे. सध्या मी सोलापूरमधली सर्वात जूनी शाळा (1944) एम.ए.पांगल अँग्लो उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर येथे ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित हा विषय शिकवतो.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

माझी आई शिक्षिका आहे. ती तब्बल १० वर्ष Kg च्या मुलांना शिकवायची आणि तेव्हा तिचा पगार केवळ 250 रुपये होता. माझे आजोबा एकदा आईला बोले होते की, ‘मी तुला 1000 देतो तू आणखी किती वर्ष 250 रुपयांवर काम करणार’. पण माझ्या आईने शिकवणे सोडले नाही. 10 वर्षानंतर आई सोलापुर कॉर्पोरेशन मध्ये शिक्षिका झाली नंतर केंद्रप्रमुख आणि आता ती सुपर वाईजर म्हणून काम करते. मी जे काही शिकलो ते केवळ माझ्या आईमुळेच. तिनेच मला D.ed करायला सांगितले. D.ed झाल्यावर मला लवकर जॉब करायचा होता पैसे कामवायचे होते हाच विचार माझ्या डोक्यात होता. कारण आईचा प्रवास मी खुप जवळून पाहिला होता. त्यामुळे मी लगेचच जॉब शोधायला लागलो आणि मला शिक्षकाची नोकरी मिळाली. जस मी म्हणालो की सुरुवातीला केवळ पैसा कमवण्यासाठी मला नोकरी हवी होती मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी समजल्या आणि केवळ पैसा कमवणे हा विचार पूर्ण मागे पडला.

शिक्षक क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?

नाही, साल 2000 ला मी दहावी पास झालो त्यानंतर मी D.ed केल आणि 2005 साली मी नोकरी शोधायला लागलो. मी शिक्षकाच्या जागेसाठी माझ्याच शाळेत इंटरव्यू दिला होता जिथे मी लहानाचा मोठा झालो. आणि माझा इंटरव्यू घेणारे तेक शिक्षक होते ज्यांनी मला शाळेत शिकवले होते. त्यामुळे ते मला फार जवळून ओळखत होते. माझा स्वभाव, माझे वागणे कसे आहे हे त्यांना माहित होते त्यामुळे तिथे मला नोकरी मिळवण्यास काही अडचण झाली नाही.

१७ वर्षाच्या शिक्षक क्षेत्रात आतापर्यंत चा अविस्मरणीय क्षण कोणता? 

दोन अविस्मरणीय क्षण मी इथे सांगू इच्छितो, पहिला असा की, 2009 साली शिक्षक दिनाच्या दिवशी आमच्या शाळेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी जमले होतो. तेव्हा मुख्यध्यापकांनी ‘तुमचे आवडते शिक्षक कोणते’? हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला होता आणि तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ९०% विद्यार्थ्यांनी माझे नाव घेतले.  माझ्यासाठी ही मी करत असलेल्या कामाची पोचपावती होती. त्या वेळेस मला शिक्षक क्षेत्रात केवळ ४ वर्षे झाली होती माझ्यापेक्षा अनुभवाने जास्त असलेले शिक्षक तिथे उपस्थित होते पण तरीही विद्यार्थ्यांनी माझ नाव घेणे हे माझ्यासाठी खुप खुप मोठी गोष्ट होती.
दूसरा क्षण म्हणजे नुकताच मला एस आर दळवी (|) फाउंडेशन कडून रेकगनायजेशन  (Recognition Award) मिळाला तो क्षण ही माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?

मी जेव्हा २००५ साली शिक्षक क्षेत्रात आलो तेव्हा विद्यार्थ्यांसाठी १ पेपर १०० मार्क्सचा असायचा. ज्या मध्ये फक्त अभ्यासावर आधारीत पेपर असायचा आणि त्याचे मार्क दिले जायचे. काही वर्षानंतर याच पेपर चे मार्क कमी करण्यात आले आणि प्रॅक्टिकल, विद्यार्थ्यांचा इनिफॉर्म, शाळेमध्ये इतर एक्टिविटी मधला त्यांचा सहभाग याला मार्क सुरु करण्यात आले. तसेच मला २००५ ते २०१२ पर्यंत सगळा सिलेबस लक्षात होता मात्र आता असलेला सिलेबस लक्षात नाही कारण शिक्षकांचे रिटर्न वर्क वाढले आहे. विद्यार्थ्यांना वर्षभराचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी वेळ कमी पडतो त्यात इतर बऱ्याच गोष्टी आता सामील झाल्या आहेत त्याला वेळ काढणे कठीण होते.
तसेच कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरु केले खरे पण गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा हवा तसा फायदा झाला नाही. ऑनलाइन च्या वेळेस विद्यार्थी क्लास अटेंड करायचा पण त्याचे लक्ष नसायचे तसेच गावात नेटवर्क ची ही खुप मोठी समस्या आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण गावातल्या विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय न्हवता. आपण म्हणतो  ‘ बदलत्या जीवनशैली बरोबर आपण बदलले पाहिजे’ मात्र सत्य हे आहे की आपण सगळेच बदललो नाही आहोत’.

ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांना काय सल्ला दयाल?

मला असे वाटते शिक्षक होण्यासाठी केवळ टॅलेंट असणे गरजेचे नाही तर हार्डवर्क करणे जास्त गरजेचे आहे. शिक्षकाला केवळ गोष्टी महित असणे उपयोगाचे नाही तर त्या गोष्टी प्रेजेंट ही करता यायला हव्यात. तुमच्याकडे टॅलेंट आहे तुम्ही खुप हुशार आहात पण जर तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता आले नाही तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे हार्डवर्क, प्रेजेंट करण्याची पद्धत आणि शिकवण्याची कला ही जमयलाच हवी.
Scroll to Top