आज आपण शिक्षिका सौ.इशाली केतन पाटील, यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका इशाली या तणाशी, ता-डहाणू, जिल्हा-पालघर या ठिकाणी राहतात. त्यांचे शिक्षण MA, B.ed असून सध्या त्या अनुदानित आश्रम शाळा साखरे येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या वडिलांची इच्छा होती म्हणून शिक्षक बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला, सुरुवातीला खूप अडचणी आल्या कारण त्या खेडेगावात राहत होत्या गावातून शहराकडे जाण्याचा मार्ग खूप अडचणीचा होता पायवाट होती चिखलातून त्यांना शाळेत जावे लागत असे रेल्वे ट्रॅक पार्क करून त्यांना शाळेपर्यंत पोहोचावे लागत होते. जे एम टी हायस्कूल मध्ये त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्यानंतर एम के जुनियर कॉलेज चिंचणी येथे बीएपर्यंत शिक्षण झाले, एम ए सांताक्रुज कलिना यूनिवर्सिटी येथे केले. त्यांनी त्यांचे बीएड अंधेरी ओरिएंटल कॉलेजमधून केले. एका खेडेगावातून शहरापर्यंतचा प्रवास खूप कठीण होता परंतु त्यांच्या घरच्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी तो प्रवास केला आणि आज त्यांच्या वडिलांची इच्छा पूर्ण झाली. त्यामध्ये त्यांच्या भावांचे शेजारच्या गावातील लोकांचे तसेच त्यांच्या गावातील रहिवाशांचे सुद्धा त्यांना सहकार्य लाभले.
ज्या शाळेमध्ये त्या काम करत आहेत ती शाळा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येत असून हे विद्यार्थी अविकसित भागातून आलेले आहेत त्यामुळे त्यांना शिकवण्याची संधी त्यांना मिळाली आणी म्हणून त्या स्वतःला खूप भाग्यवान समजतात, या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे ही साधी सोपी गोष्ट नाही त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हे विकास झालेले नसतात त्याच्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी खूप प्रोत्साहन करावे लागते.
तसेच त्यांना कुठल्याही प्रकारच्या ट्युशन्स वगैरे नसतात म्हणून सर्व शिक्षक त्यांचा अभ्यास घेतात आणि त्यामुळे त्यांना त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क बघून खूप खूप आनंद होतो. त्यांना हे समाजकार्य करायला मिळते याचा त्यांना खूप अभिमान आहे. समाजातील शिक्षण प्रवाहात नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे आणि त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकाविषयी आदर असणे गरजेचे आहे असे त्यांना वाटते.
आताच्या काळामध्ये शिक्षण हे आधुनिक शिक्षण पद्धती असल्यामुळे कॉम्पुटर, मोबाईल, लॅपटॉप यांच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवणे गरजेचे आहे. ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना असा सल्ला त्यांनी दिला आहे की शिक्षण क्षेत्र हे पेशा म्हणून निवडू नका तर एक समाजकार्य देशसेवा म्हणून निवडावं कारण शिक्षकांच्या हातून पुढची पिढी घडत असते.