आज आपण श्री जगदीश गणपती कुंभार (M.A. B. Ed. DSM) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जगदीश सर हे सातारा येथे राहत असून गेले त्यांना इंग्रजी व इतिहास विषय अध्यापनाचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे.
विविध शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे तसेच त्यांनी इंग्रजी विषय शिक्षकांसाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन व मार्गदर्शन केले आहे . ब्रिटिश कौन्सिल साठी mentor म्हणून त्यांनी काम केले आहे.
जगदीश सरांना बालभारती साठी इंग्रजी भाषा अभ्यासक्रम समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली तसेच त्यांना इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
इंग्रजी भाषेचे अध्यापन करत असताना वर्गांमध्ये केलेल्या विविध प्रयोगाचे सादरीकरण मुंबई येथे करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षण सचिव महाराष्ट्र शासन, शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, समग्र शिक्षा अभियान चे राज्य समन्वयक, अनेक जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते तो क्षण त्यांच्यासाठी अचिव्हमेंट होती .
विविध शैक्षणिक परिसंवादांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे इंग्रजी भाषा अध्ययन अध्यापन बाबत तीन शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संक्रमण या मासिकामध्ये इंग्रजी भाषा अध्ययन अध्यापना बाबत सातत्याने लेखन आहे .
शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अध्ययन अध्यापनामध्ये बदल करावा यासाठी विविध प्रबोधन सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अध्यापन पद्धती सुद्धा बदलली पाहिजे याबाबत आग्रही मत मांडले. आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता त्याला विविधांगी अनुभव देणे गरजेचे आहे यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
बदलत्या काळानुरूप शिक्षकांच्या समोरील आव्हाने बदलली आहेत. झपाट्याने बदलत जाणाऱ्या आजच्या युगामध्ये शिक्षकांनासुद्धा अद्ययावत राहणे गरजेचे आहे असे त्यांना वाटते. आजचे डिजिटल युग हेच खरे आव्हान आज शिक्षकांसमोर आहे.