S R Dalvi (I) Foundation

[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”Tr. Jagruti Patil ” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1670932147216{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor” link=”url:%20https%3A%2F%2Fsrdalvifoundation.com%2Finterview-tr-jagruti-patil-2%2F”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”10603″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”Tr. Jagruti Patil ” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]आज आपण सौ.जागृती संजय पाटील (M.A.B.Ed,D.S.M.), यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जागृती मॅम या रायगड येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या न्यू इंग्लिश स्कूल जोहे पेण रायगड या शाळेत कार्यरत आहेत.

मला लहानपणापासूनच शिक्षिका होण्याची ईच्छा होती. कारण माझे वडील शिक्षक असल्या कारणाने माझ्या मध्ये लहानपणापासूनच शिक्षिका होण्याचे गुण उपजत निर्माण झाले. प्रसंग असा होता की बारावी नंतर जेव्हा मी डी. एड करायचे ठरवले तेव्हा ती प्रक्रिया काही कारणास्तव थांबविण्यात आली.
त्यानंतर मी बी. ए . पूर्ण केले . 2003 ला माझे लग्न झाले . त्यानंतर माझ्या पतींच्या सहकार्यामुळे मी घरी बसून न राहता कुठे न कुठे तरी हंगामी स्वरूपात रामवाडी पॉलिटेक्निक कॉलेज येथे क्लर्कची तर खोपोली नगरपालिका प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर 2004 ला मुलगा झाला ,मुलाला घेऊन नेरळ दहिवली कर्जत येथे 2005 साली बी. एड . पूर्ण करत असताना खूप अडचणी आल्या . पण न घाबरता ,न डगमगता सर्व समस्यांना तोंड देत बी . एड . पूर्ण केले. कारण मला शिक्षिका व्हायचे आहे हे माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली.

या माझ्या प्रवासात माझे पती, कुटुंबातील सर्वच माणसांनी मला खूप साथ दिली. या संघर्षमय काळात स्वत:ला सावरत -सावरत आत्मविश्वासपूर्वक ,जिद्दीने व जोमाने मनाची तयारी करून माझे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 2007 साली मी एम . ए. पूर्ण केले. एके दिवशी आम्ही सर्व कुटुंबीय पाली या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा मला कोल्हापूरवरून फोन आला की तुम्हाला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री. सिद्धेश्वर विद्यालय साप गाव या शाखेवर हजर व्हायचे आहे . गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाने कोणताही विचार न करता मी 2009 साली श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेतील सातारा साप ,राहिमतपूर या शाळेवर 20. 01. 2009 या दिवशी शिक्षण सेवक या तत्त्वावर शिक्षिका पदावर रुजू झाले. खऱ्या अर्थाने माझा शिक्षिकेचा प्रवास सुरू झाला . तिथे सुद्धा परजिल्ह्यात एका खेडेगावात नोकरी करताना खूप अडचणी आल्या. आठवड्यातील दोन दिवस वेळू या शाळेवर विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवण्यासाठी जावे लागे. सापवरून वेळूला जाताना 1 तास पायी चालत जावे लागे . तरीसुद्धा हा कालावधी मी जिद्दीने पूर्ण केला. या शिक्षण सेवक कालावधीमध्ये साडेतीन वर्ष मी अतिशय प्रामाणिकपणे नोकरी करून चांगल्या प्रकारचा रेकॉर्ड तयार करून वरिष्ठानकडून पदाधिकाऱ्यांकडून मला चांगल्या प्रकारची पोचपावती मिळाली आणि त्या संदर्भात कौतुकाची थाप पडली. वरिष्ठांनी माझ्यावर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवून माझं काम पाहून मला इतर शाळा तपासणीसाठी इन्स्पेक्शन करण्यासाठी मला नेमण्यात आले आणि त्यामुळे मला बराचसा वेगळा वेगळा अनुभव मिळाला शिक्षणसेवक कालावधीमध्ये काम करत असताना इयत्ता दहावीचा मराठी विषयाचा सतत तीन वर्ष शंभर टक्के निकाल लागला व एक विद्यार्थी 94% मिळून बोर्डामध्ये आला . तसेच तालुकास्तरावरील गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य तो देण्याचा निश्चितच मी प्रयत्न केला.औ साप गावातच राहून साडेतीन वर्ष अतिशय संघर्षमय परिस्थितीत नोकरी केली ही नोकरी करत असताना माझी दोन लहान मुलं एक मुलगा पेणमध्ये राहत होता व एक मुलगा माझ्याजवळ आणि मग एखाद दिवशी शाळेला जर सुट्टी लागली तर मी धावत पळत रात्री अपरात्री
मुलांना भेटायला यायचे की त्या एका दिवसात तरी आपल्या कुटुंबीयांना भेटता येईल आणि पुन्हा सकाळी सहाच्या सातारा बसला तयार होऊन मी साप या शाखेवर हजर व्हायचे अशा पद्धतीने मी साडेतीन वर्षाचा माझा प्रवास पूर्ण केला. या वेळेला मला माझ्या माहेरीच्या व सासरच्या माणसांनी दोघांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्यातल्या त्यात माझ्या पतींनी मला खूप सहकार्य केलं आधार दिला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर असून देखील त्या जबाबदाऱ्या त्यांनी देखील परिपूर्णरित्या पूर्ण केल्या आणि अशा पद्धतीने मी शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केला. त्यानंतर 2012 साली तुंगारतन विभाग विद्या मंदिर गुळसुंदे या शाखेवर हजर झाले.

गुळसुंदे या शाखेवर हजर झाल्यानंतर लक्षात आले की तेथे शिकणारी मुले ही बहुतांशी महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत बंजारा समाजातील ही मुले या मुलांना मराठी व्यवस्थित बोलता लिहिता येत नव्हते त्या मुलांशी जवळीक साधून त्यांना मराठी विषयी गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न केले मराठीतील कविता चालीवर गायन करून त्या विद्यार्थ्यांकडून गायन करून घेतल्या त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाची गोडी निर्माण झाली तसेच मराठी विषयासंदर्भात विविध उपक्रम शुद्धलेखन हस्ताक्षर सौंदर्य वक्तृत्व निबंध स्पर्धा या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले व त्यांच्या कलागुणांना योग्य तो वाव देण्याचा प्रयत्न केला तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे वाढदिवस व्यासपीठावर बोलून प्रत्यक्ष वाढदिवस कार्ड व गुलाब पुष्प देऊन साजरे केले त्यातून विद्यार्थ्यांना जो आनंद मिळत होता त्यामुळे हे विद्यार्थी शाळेतील आनंदाने येत होते व शिकत होते तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जयंती पुण्यतिथी गॅदरिंग या सगळ्या उपक्रमांमध्ये हे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन आपल्यातल्या कला सादर करत होते याचाच परिणाम असा झाला की एके दिवशी आमच्या शाळेमध्ये गुजरात येथून इनरव्हील क्लब न्यू पनवेल येथील काही वरिष्ठ अधिकारी अचानक वर्गामध्ये येऊन आम्हाला त्यांनी वर्गा बाहेर जायला सांगितले त्यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारले की तुमच्या शाळेत उपक्रमशील शिक्षक कोण आहेत मुलांनी त्यांना एका शिक्षिकेचे नाव सांगितलं त्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांची मुलाखत घेतली मुख्याध्यापक सुरुवातीला म्हणाले की आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक उपक्रमशील आहेत परंतु त्यामध्ये अतिशय उत्साही व उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांनी माझे नाव सुचविले परंतु या गोष्टींबद्दल मला काहीही माहित नव्हते जेव्हा जेव्हा आमच्या मुख्याध्यापक साहेबांना पनवेल येथून फोन आला की तुमच्या शाळेतील सौ पाटील जे.एस. यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे त्याचे वितरण पाच सप्टेंबर 2016 न्यू पनवेल या ठिकाणी होणार आहे असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा मला आमच्या मुख्याध्यापक साहेबांनी ऑफिसमध्ये बोलावून ही बातमी दिली प्रथमता माझा या बातमीवर विश्वासच बसला नाही.

त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांचं आणि पनवेल येथून आलेल्या मॅडम त्यांचं बोलणं रेकॉर्ड केलेलं होतं ते त्यांनी मला ऐकलं आणि मग मला खूप आनंद झाला आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर साडेपाच वाजता आम्ही शाळेतून आणि आमचे मुख्याध्यापक न्यू पनवेल येथे पोहोचलो आणि तिथे विद्यार्थी प्रिय शिक्षक नेशन बिल्डर अवॉर्ड आदर्श शिक्षिका पुरस्कार मला प्रदान करण्यात आला त्या वेळेला माझा आनंद गगनात महाविनाश झाला आणि एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना आपण दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान देत असतो त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करत असतो याचीच कुठेतरी पोचपावती मला माझ्या विद्यार्थ्यांकडून मिळाली आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आपण एक शिक्षिका असल्याचा मला त्या वेळेला खूप अभिमान वाटला त्यानंतर सुद्धा मी माझे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असणारी धडपड ही सुरूच ठेवली एक वर्ष तर असा प्रसंग दहावी क च्या वर्गावर आला होता की दहावी क च्या वर्गाची मी वर्गशिक्षिका असताना बंजारा मुलं त्यांच्या आई वडील सकाळी कामाला जाणार ते रात्री घरी येणार त्यांच्या पालकांशी मी फोनवर व प्रत्यक्ष वावेघर या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पाल्याच्या प्रगती विषयी आरोग्य विषयी चर्चा करायचे व त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती तरीसुद्धा एक क्षण असा आला की त्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरता येत नव्हती तेव्हा मी स्वतः संपूर्ण वर्गाची परीक्षा फी भरून त्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचे फॉर्म भरले आणि त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची जाणीव निश्चितच ठेवली आपण विद्यार्थ्यांना कुठेतरी काहीतरी कोणत्यातरी बाबतीत मदत करत असतो याची जाणीव आपल्या विद्यार्थ्यांना असते आणि त्यांचेच आशीर्वाद ,शुभेच्छा आपल्या पाठीशी सदैव असतात याचा मला प्रत्यय त्या दिवशी आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांना जसा आपण स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करतो त्याचप्रमाणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेमध्ये आमच्या दरवर्षी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय निबंध वक्तृत्व स्पर्धा शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या असायच्या आणि त्यामध्ये 2012 पासून आज तागायत मी या वक्तृत्व निबंध स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेते आणि आनंद वाटतो की जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय द्वितीय क्रमांक व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मला मिळाला आणि त्या त्या संदर्भातले सन्मानचिन्ह रोख रक्कम प्रमाणपत्र मला आजतागायत मिळालेले आहेत. तसेच मोहपाडा या ठिकाणी प्रेरणा जल्लोष मार्फत ओन्ली स्पोर्ट विषय देऊन स्त्रियांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालं याचा मला खरंच खूप आनंद वाटतो अजूनही मी माझे प्रयत्न थांबवलेले नाहीत हे करत असताना अध्ययन आणि अध्यापन सुरू असताना देखील आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची भर पडली पाहिजे आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी माझ्याकडून काही कवितांचे लेखन देखील मी केलेला आहे काही कविता ऑनलाइन सेमिनार मध्ये माझ्या वाचून दाखवलेले आहेत आणि त्याबद्दल देखील माझं खूप कौतुक झालेलं आहे म्हणजे एक शिक्षिका म्हणून जे जे मला करता येईल त्या पद्धतीने मी प्रयत्न करत आहे आणि अजूनही मी जरी विद्यार्थ्यांना शिकवत असले तरीसुद्धा माझ्या ज्ञानात अधिकाधिक भर पडण्यासाठी मी आजही अविरतपणे ज्ञान गोळा करत आहे.

तसेच शाळेत अध्ययन अध्यापन करण्यापलीकडे देखील समाजामध्ये कुठेतरी सामाजिक कार्य आपल्याला करता आलं पाहिजे कारण समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाशी आपण बांधले गेलेलो आहोत सामाजिक बांधिलकी जपत असताना आज समाजामध्ये आपण बघतोय की स्त्रीभ्रूणहत्याच प्रमाण खूप वाढत चाललेला आहे मुलींचा जन्म नाकारला जातो आणि त्यामुळेच महिला सक्षमीकरण स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध कशा पद्धतीने आवाज उठवला पाहिजे स्त्रीचे महत्त्व घराघरांमध्ये कशा पद्धतीने पटवून दिले पाहिजे यासाठी कॉलेजेस मधून एनएसएस कॅम्प मार्फत मी स्त्रीभ्रूणहत्याविरुद्ध व्याख्यान दिलेली आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या खेडेगावांमध्ये जाऊन तिथल्या महिलांना एकत्र करून महिला सक्षमीकरण करण्याचं काम माझ्या व्याख्यानातून केलेला आहे आणि त्या त्या वेळेला मला तिथे महिलांकडून म्हणा गावातल्या माणसांकडून म्हणा खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे की त्या व्याख्यानातून त्यांना एक वेगळ्या प्रकारची दृष्टी मिळाली की आपण आपल्या घरातल्या मुलीचा जन्म नकारता आपल्या घरातील मुलगी ही मुलगा समजून तिला आपण खूप शिकवलं पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजाने व्यक्त केल्या आणि निश्चितच या व्याख्यानाचा चांगला फायदा झाला आणि याच व्याख्यानामुळे वागू दे या ठिकाणी आयपीएस ऑफिसर एकदा या व्याख्यानासाठी आलेल्या होत्या त्यांनी हे व्याख्यान ऐकून माझा तिथे चांगल्या प्रकारे सत्कार केला.

त्याचप्रमाणे 2012 पासून ते 2018 पर्यंत गुळसुंदे या शाखेवर काम करत असताना कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे काम माझ्याकडे असायचे आणि हे सूत्रसंचालन करताना अनेकांनी याबाबत कौतुक केलेले आहे .
2018 साली गुळसुंदे या शाखेवरून पेण तालुक्यातील जोहे या शाखेवर माझी बदली झाली बदली झालेल्या हे विद्यार्थ्यांना ज्या वेळेला समजलं त्या वेळेला विद्यार्थी खूप भावुक झाले होते जो हे या शाखेवर हजर झाल्यानंतर मी तितक्याच तळमळीने व प्रामाणिकपणे अध्ययन आणि अध्यापन करण्याचे काम करत होते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये प्रोत्साहित करून त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्याचा निश्चितच मी प्रयत्न केलेला आहे तिथे सुद्धा मी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये स्वतः भाग घेऊन त्यामध्ये पारितोषिक मिळवलेले आहे.

विशेष बाब म्हणजे तेरा जिल्ह्यांमधून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये 2020 21 साली माझा प्रथम क्रमांक आला आणि कोल्हापूर या ठिकाणी तिथे माझा सन्मानचिन्ह रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोन वर्ष आपण कोरोना सारख्या संकटाला सामोरे जात असताना शिक्षण शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल झाला शाळा बंद परंतु शिक्षण सुरू या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थी शाळेच्या प्रवाहापासून दूर गेले तेव्हा ऑनलाइन शिक्षण पद्धती चा अवलंब करण्यात आला आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याकरता आपण काहीतरी केले पाहिजे या दृष्टिकोनातून मी स्वतः एक लॅपटॉप खरेदी करून झूम मीटिंग द्वारे विद्यार्थ्यांसाठी दररोज ऑनलाईन तास घेऊ लागले आणि ज्या पद्धतीने ऑफलाइन शिकवले जाते तशा पद्धतीने ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न निश्चितच केला आणि त्याचा देखील फायदा विद्यार्थ्यांना झाला कारण ज्या वेळेला ऑनलाईन तास घेत होते त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांचे आई-वडील घरात असायचे आणि ते पाहायचे की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातंय विद्यार्थी देखील स्वतः जातीने ऑनलाइन शिक्षण घेताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचे अभ्यास करायचे याचा मला सुरुवातीला थोडासा त्रास झाला पण नंतर हळूहळू सर्वकाही शक्य झाले कंप्युटर मधील ज्ञान अवगत झाले.

संगणकीय क्षेत्रातील ज्या ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या सगळ्या अवगत झाल्या म्हणजे आपण म्हणतो की मला हे जमणार नाही मला हे येणार नाही अशा भ्रमात न राहता जे येत नाही ते करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले तर निश्चितच ती गोष्ट साध्य होते हे मला या कोरोना कालावधीमध्ये शिकायला मिळाले त्यातूनही मी बऱ्याचशा प्रमाणात ऑनलाइन मराठीच्या ट्रेनिंग पूर्ण केल्या जेव्हा जेव्हा व्हाट्सअप वर लिंक पाठवली जायची की आज मराठीचा अशा पद्धतीचा ट्रेनिंग आहे त्या त्या सगळ्या ट्रेनिंग मी अटेंड करून तेथे ज्ञान मिळवण्याचा निश्चितच ऑनलाईन पद्धतीने प्रयत्न केला आणि तशा प्रकारची प्रमाणपत्र देखील मी ऑनलाईन पद्धतीनेच प्राप्त केली आणि त्याच्या प्रिंट्स काढून मी माझ्या स्वतःच्या दप्तरी त्याची नोंद ठेवलेली आहे.

आणखीन एक गोष्ट म्हणजे मला वाचनाची खूप आवड आहे आणि त्यासाठी माझ्या घरामध्ये मी माझे स्वतःचे छोटेसे ग्रंथालय घरामध्येच तयार केलेले आहे जेणेकरून मी ती पुस्तके वेळ मिळेल त्या पद्धतीने वाचत जाते आणि त्याच्यातून मिळालेले ज्ञान माझ्या मुलांना माझ्या विद्यार्थी वर्गाला देण्याचा निश्चितच प्रयत्न मी करते आणि करत राहीन.

एकंदरीत सुरुवातीपासूनच जेव्हा मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं त्यावेळेला शिक्षिका म्हणून नोकरी करत असताना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण एवढंच आपलं काम नाही तर त्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचा परिसर इथलं वातावरण त्यांची कौटुंबिक परिस्थिती या सगळ्याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे त्या दृष्टिकोनातून मी ज्या ज्या शाखांवर काम केलं त्या शाखांमधील गावांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांची बारकाईनं चाचणी करून जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निश्चितच मी प्रयत्न केलेला आहे आणि अशा या गरीब व होतकर विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करून त्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्यात त्यांना त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि हे काम मी माझ्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक शिक्षिका म्हणून अविरतपणे करत आहे आणि करत राहणार आहे.

कधी कधी अध्यापन करत असताना वर्गामध्ये सर्वच विद्यार्थी हुशार असतात असं नाही आपण शिकवत असताना सर्वच विद्यार्थ्यांना आकलन होतं असं देखील नाही आणि ज्या वेळेला मी मराठी विषयाचं अध्यापन करायचे त्या वेळेला काही विद्यार्थ्यांना काही मराठी शब्दांचे समानार्थी शब्द म्हणा विरुद्धार्थी शब्द म्हणा समजत नसायचे किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नसायचा अशा वेळेला त्या विद्यार्थ्याला जवळ घेऊन किंवा त्याच्या जवळ जाऊन त्याला कोणती संकल्पना कळत नाही किंवा ती संकल्पना त्याला का कळत नाही त्याला मराठी विषयांमध्ये कोणत्या गोष्टी मध्ये अडचणी निर्माण होतात या गोष्टी जाणून घेऊन त्या विद्यार्थ्याला स्वतःचं मत निर्भीडपणे मांडता येण्यासाठी प्रवृत्त करण्याचा मी निश्चितच प्रयत्न केलेला आहे तसेच एकदा स्कॉलरशिप चा तास घेत असताना एका मुलीला वर्गामध्ये विभक्ती प्रत्यय सामान्य रूप यातला फरक कळत नव्हता किंवा ही संकल्पना तिच्या लक्षातच येत नव्हती सगळ्या मुलांना ती लक्षात आली पण तिला काही ही संकल्पना लक्षात आली नाही शेवटी संध्याकाळी घरी आल्यानंतर मी तिच्या पालकांना फोन केला आणि तिची परिस्थिती त्यांना सांगितली आणि मग फोनवर का होईना अर्धा एक तास मी तिला विभक्ती प्रत्यय सामान्य रूप ही संकल्पना समजावून सांगत होते आणि मग त्या वेळेला तिला थोड्याफार प्रमाणात ही संकल्पना आकलन झाली आणि दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यानंतर पुन्हा मी तिला त्याच संकल्पनेवर काही प्रश्न दिले आणि ते तिने चांगल्या पद्धतीने सोडवले अशाप्रकारे विद्यार्थ्यांना काही गोष्टी अध्ययन अध्यापनातल्या कठीण वाटतात त्या सोप्या करून सांगण्यासाठी त्यांच्या कलेनुसार त्यांना समजेल तुमचे अशा सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न मी करत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत मी पालकांशी संपर्क साधून पालकांना याची जाणीव करून देत आहे आणि त्यामुळेच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मला अध्ययन आणि अध्यापनामध्ये मिळत आहे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालक देखील जागरूक राहून आपल्या पाल्याचा अभ्यास घेत आहेत.

विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमता मी त्या विद्यार्थ्यांच्या समस्या कोणत्या आहेत त्यांना अध्ययनामध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत त्या अगोदर जाणून घेण्याचा प्रयत्न करते त्यानंतर सोप्यातील सोपी गोष्ट त्यांना सांगून किंवा त्यांना एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना त्या संदर्भात छोटसं बक्षीस देण्याचा प्रयत्न सुद्धा मी करत आहे उदाहरणार्थ शालेय पातळीवर विविध प्रकारच्या नेत्यांच्या पुण्यतिथी जयंत्या साजऱ्या करताना त्या दिवशी वक्तृत्व स्पर्धांचा आयोजन करून ज्या विद्यार्थ्यांना काही वेळेला व्यासपीठावर बोलण्याचा धाडस नसतं त्या विद्यार्थ्यांना स्वतः भाषण देऊन त्यांच्याकडून ते पाठ करून घेऊन त्या दिवशी त्यांना ते भाषण करण्यास मी प्रवृत्त करते जेणेकरून त्या विद्यार्थ्याला व्यासपीठावर बोलण्याची संधी प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये बोलण्याचे धाडस निर्माण होते अशा वेळेला त्या विद्यार्थ्याला बक्षीस देऊन सर्वांच्या समोर त्याचं विशेष कौतुक केलं जातं. आणि याचा परिणाम असा दिसून आला की प्रत्येक स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेतात यश अपयश याचा विचार न करता आपलं मत निर्भीडपणे मांडण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो.

विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून अध्ययन आणि अध्यापनामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ सराव परीक्षा ,वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा ,वाढदिवस ,कविता गायन ,नाट्यीकरण, वर्ग सजावट, शैक्षणिक साहित्य निर्मिती या व अशा अनेक उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून विद्यार्थी न घाबरता या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतो व स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन संदर्भात पालकांशी संवाद साधायला मला खूप आवडतो विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास, आरोग्य विषयक समस्या, गुणवत्ता वाढ, शाळेतील त्यांची उपस्थिती, प्रगती व वर्तणूक शाळेतील नियम यासंदर्भात मी सतत पालकांशी फोन द्वारे संपर्क साधून तसेच पालक मीटिंग ठेवून त्या पालकांना त्यांच्या पाल्याविषयी जागरूक राहण्यास मार्गदर्शन करत असते . तसेच मुलींच्या व मुलांच्या मातांना विशेष करून शाळेमध्ये बोलावून आमच्या सर्वच समस्यांबाबत मातापालकांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टिकोनातून माता पालक संघ निर्मिती शाळेत केलेली आहे आणि या खात्याची मी प्रमुख आहे सतत पालकांशी संपर्क असल्यामुळे उदाहरणार्थ एखाद्या दिवशी विद्यार्थी गैरहजर असेल तर दुसऱ्या दिवशी येताना त्याने पालकांच्या सहीचा अर्ज आणायचा आहे अशा प्रकारचे नियमावली मी वर्गात केलेली आहे त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी गैरहजर राहत नाही अगदीच कोणी आजारी असेल तर त्यांचे पालक स्वतः फोन करून जातील सूचना देतात की माझा मुलगा किंवा मुलगी या शाळेत येणार नाही हे स्वतः पालक या संदर्भात जागरूक आहेत आणि त्यामुळेच आपल्या मुलांच्या मुलींच्या या संपूर्ण विकासासाठी प्रगतीसाठी पालकांशी संपर्क साधल्यामुळे मुलांच्या पालकांसोबत माझे संबंध खूप चांगले आहेत.

आत्ताचे युग हे विज्ञान युग आहे विज्ञानाला संगणकाची जोड मिळालेली आहे विज्ञान+संगणक=21 व शतक या शतकामध्ये वाटचाल करत असताना संगणकीय ज्ञान आपल्याला असणे गरजेचे आहे कारण आत्ताच्या या संगणकीय युगामध्ये स्पर्धात्मक योग हाताळत असताना किंवा वाटचाल करत असताना भविष्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपला विद्यार्थी हा तंत्रज्ञाने असला पाहिजे त्याने संगणक संगणकातील सर्व गोष्टी व्यवस्थित रित्या हाताळल्या पाहिजेत आज आपण संगणकावर सर्वच गोष्टी पहात असतो आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचे ज्ञान संगणकावर मिळत असते आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार करून अध्ययन आणि अध्यापन करत असताना पावर पॉइंट प्रेझेंटेशन, प्रोजेक्टर, युट्युब व्हिडिओ याद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा वर्गामध्ये प्रयत्न केला जातो बऱ्याचशा गोष्टींमध्ये असे आढळून येते की प्रोजेक्टर हाताळत असताना बरेचसे विद्यार्थी हे तंत्रज्ञानी आहेत हे लक्षात येते कारण व्हिडिओ पुढे मागे सरकवण्याचं काम स्टॉप करण्याचं काम हे स्वतः विद्यार्थी करत असतात आणि हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की आजचा विद्यार्थी हा खूप पुढे वाटचाल करणार आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं जर आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याला देखील तंत्रज्ञानाचा व्यवस्थितरित्या नॉलेज असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच पाठ शिकून झाल्यानंतर देखील व्हाट्सअप वर त्या पाठाच्या व्हिडिओ पाठवल्या जातात कविता शिकवल्यानंतर त्या कवितांचं स्वतः चाल लावून गायन केलं जातं रेकॉर्डिंग करून पुन्हा ती कविता व्हाट्सअप वर विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर पाठवली जाते जेणेकरून विद्यार्थी ते ऐकतील पाठ करतील वारंवार म्हणतील आणि त्यामुळेच वर्गामध्ये आज प्रत्येक पाठ प्रत्येक कविता ही तंत्रज्ञानावर आधारित या पीपीटी चा वापर करून शिकवण्याचा प्रयत्न मी निश्चितच करते आणि त्याचा फायदा मलाच नव्हे तर माझ्या विद्यार्थी वर्गाला सुद्धा चांगल्या प्रकारे होतो याचा मला खूप आनंद आहे. प्रत्येक पाठाचे लेखक लेखिका कवी कवयित्री काही त्याच्यातील क्षणचित्रे हे मी स्वतः यांची एक शैक्षणिक साहित्याची फाईल तयार केलेली आहे पाठ शिकवताना ती फाईल वर्गात नेऊन पाठातील जी काही चित्र असतील ती त्यांना त्या त्या वेळेला दाखवून तो पाठ अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि निश्चितच तो पाठ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि याचा मला खूप समाधान मिळतं.

शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांशी जुळून घेऊन प्रामाणिकपणे आपल्या विषयाचे ज्ञान त्यांना देत असताना त्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करून तसेच इतर स्पर्धांमध्ये त्याला भाग घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम मी माझ्या शिकवण्या पलीकडेही केलेला आहे शाळेमध्ये हे काम करत असताना बऱ्याच ठिकाणाहून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध व्याख्यान देण्यासाठी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिथे जिथे मला निमंत्रित करण्यात आलं तिथे तिथे मी स्वखुशीने जाऊन त्या गावातील लोकांना व्याख्याना द्वारे मुलींचे महत्त्व पटून देण्याचे निश्चित काम केलेलं आहे आणि त्याचं मला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही मिळालेला आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रवृत्त केल्यामुळे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये पदार्पण करत आहेत काही विद्यार्थी तर वेगवेगळ्या पदांवर आज रुजू झालेले आहेत आणि ज्या वेळेला हे विद्यार्थी स्वतः फोन करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुप्रती विभावना व्यक्त करतात आदर व्यक्त करतात त्या वेळेला खऱ्या अर्थाने मनामध्ये एकच विचार येतो की आपण ज्या विद्यार्थ्यांना जे काही घडवलं त्याचीही आपल्याला मिळालेली पोचपावती आहे तसेच शिकवण आणि शिकणं याही पलीकडे आपण देखील स्वतः काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्या जिथे जिथे स्पर्धा आयोजित केलेल्या असतील त्या स्पर्धांमध्ये मी निश्चितच भाग घेतलेला आहे गायन स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील यामध्ये देखील मी भाग घेऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे आणि त्यातच फळ मला विद्यार्थी प्रिय शिक्षक या पुरस्काराने जेव्हा सन्मानित करण्यात आलं आणि विविध प्रकारच्या स्पर्धांमधून मला मिळालेले यश आज माझ्याकडे असणारे प्रमाणपत्र सन्मानचिन्ह पाहिल्यानंतर लक्षात येतं की शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मी केलेल्या कामाची ही खरी अचीवमेंट आहे.

शिक्षक म्हणून माझ्या आतापर्यंतच्या प्रवासातील अनेक अनुभव माझ्याकडे आहेत पण त्यातला एक अनुभव मी निश्चितच तुम्हाला सांगू इच्छिते की आपला समाज हा थोडाफार प्रमाणात रूढी प्रथा परंपरांनी ग्रासलेला आहे मुलींना पूर्वीच्या काळी बाहेरगावी पाठवून शिक्षण घेणं किंवा शिक्षण देणे हे समाज मान्य करात नव्हता आणि त्यातल्या त्यात लग्न झालेल्या बाईंना बाहेरच्या भागात जाऊन आपल्या मुलांना घेऊन तिथे शिक्षक म्हणून काम करणं नोकरी करणे हे तितकं समाजामध्ये काही माणसांना पटत नव्हतं पण तरीसुद्धा माझ्या माहेरच्या सासरच्या माणसांनी आणि विशेषता माझ्या पतींनी मला या संदर्भात खूप सहकार्य केलं सपोर्ट केला मला वेळोवेळी त्यांनी पाठिंबा देऊन आधार देऊन मला सातारा साप या ठिकाणी नोकरी करण्याची मुभा दिली आणि खऱ्या अर्थाने दोन लहान मुलं असून सुद्धा काळजावर दगड ठेवून मी ती नोकरी स्वीकारली आणि खऱ्या अर्थाने साडेतीन वर्ष कुटुंबीयांपासून दूर राहून मोठ्या मुलापासून दूर राहून या पद्धतीने प्रामाणिक पणे शिक्षिकेची नोकरी केली त्या वेळेला काम करत असताना सातारा ते पेण हा जो मी प्रवास करायचे त्या वेळेला रात्री अपरात्री एक दीड वाजता खोपोली स्टेशनवर मी यायचे आणि तिथे माझे पती मला घेण्यासाठी यायचे विचार असा असायचा की एक रात्र एक दिवस आपल्या मुलांना व्यवस्थितरित्या भेटता येईल अशा या संघर्षमय काळामध्ये मी माझ्या मुलांना सहा महिन्यातून एकदाच भेटायचे पण माझ्या मुलांनी कधीही माझ्याकडे याबाबत तक्रार केली नाही किंवा घरच्यांनी देखील मला कुठल्याही प्रकारचा यासंदर्भात जाब विचारला नाही उलट सर्वतोपरी सर्वांनीच चांगल्या प्रकारची मदत करून माझा हा शिक्षण सेवक कालावधी मी चांगल्या प्रकारे पार पडला आणि त्याचीच एक पोचपावती म्हणून आजही मी रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना सातारा जिल्ह्यातील ज्या मुलांना मी घडवलं गुळसुंदे या शाखेतील ज्या विद्यार्थ्यांना मी चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन केलं ते विद्यार्थी पालक आजही मला प्रत्येक कार्यक्रमासाठी सण उत्सव याप्रसंगी फोन करून चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतात .माझा वाढदिवस तर ते नेहमीच लक्षात ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. एकदा तर वर्गामध्ये वाढदिवस विद्यार्थ्यांनी साडी केक आणून अतिशय आनंदाने साजरा केला तो एक क्षण मी कधी विसरू शकणार नाही तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी माझी निवड केली हा देखील माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. तसेच बीएड नेरळ दहिवली येथे करत असताना माझ्या छोट्या मुलाला सांभाळत मी हे बीएड कम्प्लीट केलं पण ते करत असताना खूप अडचणींचा सामना मला करावा लागला एकदा तर 20 लेसन प्लॅन काढत असताना रात्री बरोबर बारा वाजता माझा डोळा लागला आणि तेव्हा मेणबत्ती वर हे लेसन प्लॅन काढत असताना त्या मेणबत्तीने अचानक पेट घेतला आणि माझे सर्व लेसन प्लॅन्स जळून खाक झाले मला पटकन जाग आली आणि मी पाहिले तर थोडीशी जरी झोप माझ्याकडून झाली असती तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचले देखील नसते भगवंताच्या कृपेने मला पटकन जाग आली आणि मी माझी आजी व माझा दोन महिन्याचा मुलगा यांचा जीव वाचला आणि त्यानंतर सुद्धा 20 लेसन प्लॅन जळालेले होते ते मी एका दिवसात लिहून पूर्ण करून फाईल सबमिट केली.

मला कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग खूप वेळा ओरडायचे म्हणायचे की तुझ्याने काही होणार नाही तुझं बी एड कम्प्लीट होऊ शकत नाही काही मित्र मैत्रिणी सुद्धा त्यावेळेला माझा खच्चीकरण करायच्या पण मी धीर सोडला नाही आणि यातच माझ्या दोन महिन्याचा मुलगा सतत आजारी असायचा आणि त्याचे हे आजारपण आणि माझे बीएड कम्प्लीट करण्याचे स्वप्न या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या ज्या काही गोष्टी अडचणी निर्माण झाल्या त्या मी धाडसाने हिराने निभावत नेल्या आणि माझं बीएड कम्प्लीट केलं या संदर्भात जे जे मला काही कटू अनुभव आले चांगले अनुभव आले ते खरोखरच माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत की जे मी कधीही विसरू शकत नाही.

आत्ता मी जो हे या शाखेवर काम करत असतानाच ऑनलाईन सेशन मध्ये मला एस आर दळवी फाउंडेशन यांचं खूप सहकार्य लाभलं त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या कामाची दखल घेतली आणि एस आर दळवी फाउंडेशन यांच्यामार्फत जे कार्यकर्ते आहेत त्यांनी वेळच्या वेळेला मला फोन द्वारे व्हाट्सअप द्वारे लिंक पाठवून तेथे सेशन अटेंड करण्यासाठी मला सहकार्य केलं आणि त्यामुळेच मी ते सेशन चांगल्या प्रकारे अटेंड केले व त्याची पोचपावती म्हणून पाली या बल्लाळेश्वराच्या ठिकाणी रविवारी माझा तिथे विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यामुळेच हा देखील माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग आहे यासाठी मी एस आर दळवी फाउंडेशन व त्यामध्ये काम करणारे सर्व सदस्य कार्यकर्ते यांना धन्यवाद देते. थोडक्यात पण खऱ्या अर्थाने एक एक क्षण अनुभवत असताना जगत असताना माझा हा जो शिक्षकेचा प्रवास सुरू झाला आणि आत्ता सुरू आहे तो मी या पद्धतीने जगत आहे.

आपण म्हणतो एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण मी म्हणे एका यशस्वी पत्नी मागे एक पती असतो आणि याचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे माझे पती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मला ते मोठ्या उत्साहाने सपोर्ट करतात सहकार्य करतात आणि म्हणूनच आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]

Scroll to Top