आज आपण श्रीमती जयश्री रामराव बनकर ( M A. D.Ed) यांचा शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. जयश्री या चिकलठाणा ,औरंगाबाद इथल्या असून त्या गेले २० वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणा पासुन त्या शिक्षक ह्या घटकांकडे आकर्षित झाल्या होत्या.त्यांना शाळेची आवड ही होती आणि त्यांच्या माझ्या शाळेत बऱ्याचदा त्या मॉनिटर असल्यामुळे त्यांना नेहमी विद्यार्थ्यांना शिकविण्याची संधी मिळायची.
श्रीमती जयश्री या कॉमर्स फैकल्टी च्या विद्यार्थीनी होत्या आणि Account हा त्यांचा विषय आवडीचा विषय होता. तेव्हा सर्वांना वाटायचे की त्या CA साठी प्रयत्न करावेत पण त्यांचे वडील वारले झाले आणि त्यांच्या आईवर कुटुंबाचा आर्थिक ताण पडला ,ट्युशनसाठी पैसेजमा करणे ही तेव्हा कठीण झाले मग त्यांनी D.ed करण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण पूर्ण करुन त्या शिक्षिका झाल्या. सुरुवातीला 5 ते 7 चे इंग्रजी विषय शिकविण्याची वेळ आली त्यामुळे सुरवातीला नविन असल्यामुळे त्यांचा गोंधळ व्हायचा पण सरावामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि पुढे सर्व सोपे झाले.
अविस्मरणीय प्रसंग/क्षण
20 वर्षाच्या प्रवासात जयश्री यांना खुप अनुभव आले पण त्यातला एक प्रसंग त्यांनी आपल्यासह शेअर केला. मराठी विषय शिकवित असतांना त्यांना कवितेला चाल लावून तालावर गाऊन कविता शिकविणे फार आवडत असे तसेच भाषणात चारोळ्या ,गीत म्हणणे आवडत असे असेच त्यांचे विद्यार्थीही कविता गायन ,भाषणात चारोळ्या, गीत गाऊन क्रमांक पटकावत असे तेव्हा विद्यार्थी त्यांच नाव घेऊन सर्वांना सांगायचे की, ‘आमच्या मॅडमनी शिकविले’ तेव्हा जो आनंद मिळायचा तो आनंद म्हणजे पुरस्कारच वाटायचा.असे जयश्री जी सांगतात.
जयश्री यांच्या वर्गात इयत्ता 7 वी च्या वर्गात काही गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी होत्या ,त्यांच्याकडे अंगावर घालण्यासाठी पुरेशे चांगले कपडे नसायचे त्यामुळे त्यांची अनुपस्थिती वाढली व पुढे शाळेत येणार नसल्याचे त्यांना कळाले तेव्हा त्यांनी त्यांच्या पालकांशी व विद्यार्थ्यांशी भेटून स्वतःच्या खर्चातून नविन कपडे दिले व त्यामुळे त्या मुली दररोज शाळेत येऊन शिक्षणाच्या प्रवाहात राहिल्या व पुढेही काहीही अडचण आल्यास जयश्री जी नेहमी त्यांना धीर दिला देत राहिल्या. पुढे त्या मुली शिकल्या याचा शिक्षिका जयश्री यांना खुप आनंद आहे.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज वाटते:
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे अतिशय समजपूर्वक असावं ,मुलांना समजून घ्यावं,त्यांचा मित्र – मैत्रिण बनून त्यांच्या शंका समजून घ्याव्यात , विद्यार्थी असं का वागतो ? यामागचं कारण शोधुन त्यावर उपाय योजना साधणारा शिक्षक असावा , मायेनं जवळ घेणारा ,प्रेमाने समजावून सांगणारे असं एक विश्वासाचं नातं शिक्षक – विद्यार्थी यांच्यात असावं असं शिक्षिका जयश्री यांना वाटते.
शिक्षक व्हायचे आहे त्यांना काय सल्ला:
ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनी आपल्या समोर जी निरागस बालकं असतात त्यांना शिकविण्याचे पवित्र असं काम आपल्या वाट्याला आलं आहे त्यांचं भवितव्य आपल्या हातात आहे तेव्हा त्यांना जेवढं आपल्या कडून देता येईल तेवढं मनसोक्त पणे त्यांना द्यावं त्यात कसलीही कसर ठेवू नये. ज्ञान दिल्याने वाढतच जाते त्यामुळे जेवढे देता येईल तेवढं देऊन त्यांना चांगलं माणूस घडवावा .इतर क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर निर्जीव वस्तुसोबत काम करावं लागतं पण आपल्या ह्या शिक्षकी क्षेत्रात सजीवांशी आपला प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळे शिक्षक होऊन समाजाला एक चांगला सुजाण नागरिक घडवून देऊया . असा मोलाचा सल्ला शिक्षिका जयश्री यांनी शिक्षण होणाऱ्यांना दिला.