आज आपण शिक्षिका सौ.ज्योती धीरज चौधरी (D.Ed.M.A) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्योती टीचर या भुसावळ येथे राहत असून मागील २१ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या त्या सेंट अलॉयसियस मराठी प्राथमिक कॉन्व्हेंट शाळा, भुसावळ येथे असिस्टण्ट टीचर म्हणून काम करत आहेत. त्यांना शिक्षक होऊन मुलानं ज्ञानदान करण्याची आवड होती म्हणून त्यांनी या क्षेत्राची निवड केली.
विद्यार्थ्यांना जवळ बोलावून, त्यांना काय येतं,काय आवड आहे हे लक्षात घेऊन, मुलांच्या कलाने घेत कठीण विषय सोपा करून त्यानुसार त्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे त्यांना कठीण वाटते अशा विद्यार्थ्यांना हॅन्डल करतात. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जाणून घेऊन, मुलांना चित्रे दाखवून त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारून त्या मुलांना अभ्यास करण्यास प्रेरित करतात. मुलांना प्रोजेक्टर लेसन्स शिकवून त्या मुलांना मोटिवेट करतात.
पालकांसोबत संवाद साधायला त्यांना खूप खूप आवडते, पालकांसोबत संवाद केल्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय मुलांची प्रगती साधली जाऊ शकत नाही. पालकांसोबत त्यांचे संबंध खूप जवळीकचे आहेत. वर्गात मुलांना शिकवताना प्रोजेक्टरचा वापर करून मुलांना वेगवेगळे शैक्षणिक व्हिडीओस दाखवतात अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर त्या वर्गात करतात.
उत्कृष्ट शिक्षण मुलांना देऊन त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही हीच खरी चांगल्या शिक्षकाची Achievement आहे, असे त्यांना वाटते. त्याही एक आदर्श शिक्षक आहेत . त्या शिक्षक झाल्या हीच त्यांची achievement आहे.
त्यांना Teachers Day च्या दिवशी एकदा सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले होते तो दिवस व प्रसगं त्या अविस्मरणीय अनभुव समजतात त्या दिवशी त्यांना विद्यार्थी व पालक सर्वानी खपू खपू धन्यवाद दिले होते की,आमच्या मुलांना खपू छान Teacher मिळाल्या आहेत. तुमच्यामुळे मुले खूप छान घडत आहेत, ही पावतीच त्यांना खूप लाख मोलाची कामगिरी केल्याचे समाधान देते.