S R Dalvi (I) Foundation

Tr. Kartiki Pawar

Tr. Tr. Kartiki Pawar

आज आपण शिक्षिका कार्तिकी पवार (B.A.D.Ed ,TCPED) आंबेगाव बुद्रूक पुणे येथे राहत असून
गेली १६ वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव बुद्रुक हवेली पुणे या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत.
लहानपणा पासूनच कार्तिकी यांनी शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहिले होते. शाळेतील शिक्षकांना शिकवत असताना त्यांचे  आणखी पक्के होत होते. शाळेत असताना त्यांना मोठी होऊन काय बनणार? असे विचारले की त्या ‘शिक्षिका होणार’ असेल उत्तर द्यायच्या.

‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना अडचणी : 
शिक्षिका असलेल्या कार्तिकी स्वतःहा शाळेत, कॉलेज मध्ये असताना हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत असायच्या त्यामुळे त्या खुप चांगल्या मार्कने पास व्हायच्या. खूप चांगले मार्कस मिळवूनही त्यांनी D.Ed. करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कोणालाही पसंत नव्हते अगदी मैत्रिणी त्यांच्यावर या निर्णयावर हसायचा. ‘एवढे चांगले गुण मिळवून काय शिक्षक होतेस’ असे म्हणून चिडवायच्या. परंतु कार्तिकी यांनी शिक्षिकाच होणार हे पक्के ठरवले होते. त्यामुळे त्यांनी कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही.

अविस्मरणीय क्षण / प्रसंग: 
सुरुवातीला शिक्षिका कार्तिकी यांना खूप लांबच्या शाळेत नोकरी लागली यायला लागे तेव्हा गाडीही वेळेवर नसायच्या खूप वेळ गाडीची वाट पाहावी लागायची. परंतु शाळेतील मुले गरीब परिस्थितीतील होती पण कामसू हुशार त्यामुळे त्यांना शिकवण्यात खुप आनंद मिळायचा.

जेव्हा ही मुले पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत गेली व तिथे इतर शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा चांगली आहेत हे त्या शाळेतील शिक्षकांना लक्षात आले तेव्हा त्या विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकांनी ‘तुम्ही कोणत्या शाळेत होता? कोण शिक्षक तुम्हाला शिकवायला होते’? असे प्रश्न विचारला असता सर्व मुलांनी कार्तिकी यांचे नाव सांगितले.ही गोष्ट कार्तिकी यांच्यापर्यंत पोहचली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यानंतर हे दरवर्षी च घडत गेले.

Achievement:
वर उल्लेख केलेली शिक्षिका कार्तिकी यांची पाहिल्या बॅच चे विद्यार्थी आज ही न विसरता त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून फोन वर शुभेच्छा देतात.त्या विद्यार्थ्यांना आणि कार्तिकी यांना शाळा सोडून बरीच वर्ष होवूनही ते आजही त्यांची आठवण काढून फोन करतात.हीच त्यांच्यासाठी मोठी कमाई आहे अस शिक्षिका कार्तिकी यांना वाटते.

समाजात शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे:

शिक्षकांना शिकविण्यापेक्षा इतर कामेच जास्त असतात शिवाय वर्गाचे पट जास्त व शिक्षक कमी अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलायला हवी.तसेच शहरातील विद्यार्थी ग्रामीण विद्यार्थी यांच्या समस्या आणि गरजा वेगवेगळ्या आहेत तसेच त्यांची मानसिकता ही त्यामुळे या दोन्हींचा सर्वे व अभ्यास होवून त्यांच्या गरजा नुसार शालेय कामकाज असले पाहिजे.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
”जरून शिक्षक व्हा’ माझ्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या माझ्या मैत्रिणी जरी चांगल्या पगाराची नोकरी करीत असल्या तरी त्यांच्या पेक्षा मी खूप खूप सुखी आहे कारण मी उद्याचा भारत घडविण्यात छोटेसे पण मोलाचे काम करीत आहे. विद्यार्थांना एखादा भाग चांगला समजला की त्यांच्या चेहऱ्यवरचा आनंद पाहून देवाची सेवा केल्याचा भाव निर्माण होतो.मी शिक्षकच झाले याचा मला खूप खूप आनंद  व अभिमान आहे” अशी भावना शिक्षिका कार्तिकी यांनी बोलून दाखवली.