आज आपण श्रीमती. किरण नागनाथ चव्हाण (बी. एस्सी.एम्.ए.बी.एड.डी .एस्.एम्.) यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. रा.इंदापूर, ता.माणगांव, जि.रायगड येथील रहिवासी असून गेले तब्बल 23 वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर,बोरघर हवेली ता.तळा जि.रायगड या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत. श्रीमती किरण यांनी शाळेत असतानाच शिक्षिकाच होणार हे ठरवले होते.मुलींना शिक्षिकेची नोकरी योग्य असते असे त्यांना खुप आधीपासून वाटायचे. त्या नुसार बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी बी.एड.केले. आणि मग तिथुन शिक्षिका होण्याचा प्रवास सुरु झाला. शिक्षक हे क्षेत्र निवडताना श्रीमती. किरण यांना खुप अशा अडचणींना सामोरे जावे लागले नाही मात्र नोकरीसाठी त्यांना आई वडिलांपासून लांब कोकणात यावे लागले होते. वातावरणाशी बरीच तडजोड करावी लागली.ग्रामीण भागात भाषा समजून घेऊन स्वतः मध्ये बदल करून घ्यावे लागले.
अचीवमेंट्स:
एक शिक्षक म्हणून प्रत्येक ठिकाणी मिळणारा सन्मान हा अचीवमेंट्स पेक्षा कमी नाही असे शिक्षिका किरण यांना वाटते तसेच त्यांचा डीएसएम मध्ये काँलेजमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला होता.आणि त्या कोकण रत्न पुरस्काराच्या मानकरी ही ठरल्या आहेत.
समाजात शिक्षक- विद्यार्थ्यांसाठी काय बदल होण्याची गरज वाटते:
नवीन तंत्रज्ञानाचा युगात नवीन ,सहज शिक्षण ,सर्व स्तरावर उपयोगी, भरमसाट न शिकवता थोडे पण उपयुक्त दर्जेदार ,समाजात माणूस म्हणून जगता येण्यास पात्र बनविणे,परंतु महत्त्वाचे आहेत ते संस्कार. ते रुजविणे महत्त्वाचे वाटते. कारण मोबाईल च्या या युगात आपण संस्कार क्षम पिढी घडवणे विसरतोय.असे मत शिक्षिका किरण यांनी व्यक्त केले.
शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना सल्ला:
ज्यांना भविष्यात शिक्षक व्हायचे आहे त्यांना सर्वात आधी शुभेच्छा आणि कौतुक ही , कारण ज्ञानादानाचे कार्य हे पवित्र आहे. शिक्षकांशिवाय पर्याय नाही हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे शिक्षक हा समाजासाठी उपयुक्त आहेच. अशा शब्दात किरण यांनी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन दिले.