शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही, आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.”
आज आपण बारामती येथे राहणाऱ्या कोमल भिसे (एम ए डी एड ) यांच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. शिक्षिका कोमल बारामती येथे रहात असून गेली आठ वर्ष शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे काम करीत आहेत.सध्या त्या बारामतीमधील शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल शारदानगर येथे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय शिकवत आहेत.
शिक्षिका कोमल यांचे वडील शिक्षक होते. त्यांचे त्यांच्या का माविषयी चे प्रेम त्यांनी जवळू न पाहिले. त्यांच्या वडिलांनी कधीहीपैशाचा विचार न करता किंवा कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आपले काम अतिशय प्रामा णिकपणे व आनंदाने करत आणि तेच त्यांना जास्त भावत गेले.त्यांच्या आईलाही त्यांनी शिक्षक व्हावे असे वाटत होते. कोमल यांचे बालपण देखील अशा वातावरणात गेले ज्या ठिकाणी सगळेच शिक्षक त्यांच्या अवतीभोवती होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना क्षेत्राची निवड करावीशी वाटली.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना अडचणी-
D.ed पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी कोमल वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करीत होत्या , परंतु त्या ठिकाणी शिक्षकाच्या गुणवत्तेपेक्षा वशिल्याने शिक्षक भरती करण्यावरती भर जास्त होता ही गोष्ट त्यांना प्रकर्षाने जाणवली.
अविस्मरणीय क्षण / आठवण –
काही दिवसापूर्वी कोमल यांना एका विद्यार्थ्याचा फोन आला होता आणि त्या विद्यार्थ्यांचे मेडिकलसाठी सिलेक्शन झा लेला आहे ही आनंदाची बातमी त्याने सांगितली.याबरोबर तो पुढे “ ताई हे सर्व तुमच्या प्रेरणेमु ळे शक्य झालेला आहे.माझ्या घरच्यांचा आज जेवढा या माझ्या यशामध्ये आहे तेवढाच वाटा तुमचा देखील आहे.कारण तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळेच ही गोष्ट मी करू शकलो” असं ही तो त्यांना म्हणाला. ही गोष्ट त्यांच्यासाठी अवि स्मरणीय आहे.
अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटत –
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते हे काळानुसार बदलायला हवे.विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते हे काळानुसार बदलायला हवे. समाजाने देखील त्या पद्धती ने त्याचा स्वीकार करायला हवा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल नुसताच धाक, भीति असेल तर तोच केवळ चांगला शिक्षक असे न म्हणता, जर विद्यार्थी शिक्षक यांच्या मध्ये मैत्रीपूर्ण नाते असेल आणि शिक्षक तेवढ्याच विश्वासाने आणि आनंदाने काम करत असेल तर त्याचा नक्कीच करायला हवा असे शिक्षिका कोमल यांना वाटते.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांनी पैसा मिळवायचा आहे किंवा नुसतेच पारंपरिक पद्धतीचा वापर करून वर्गात शिकवण्यापेक्षा आपल्याला कोणत्या नवनवीन तंत्रज्ञान शिकवता येईल किंवा आपणही समाजाचे काही देणे लागतो, आपण एक पिढी घडवत आहोत याचा विचार करून या क्षेत्रात येण्याचा विचार करावा. असे कोमल यांना वाटते. त्याचप्रमाणे आपण हार्डवर्क, प्रमाणिकपणा आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करून या क्षे त्रात पाऊल ठेवावे. असे ही त्या म्हणाल्या.