S R Dalvi (I) Foundation

Tr .Krishna Naik

Tr .Krishna Naik

आज आपण शिक्षक श्री कृष्णा शांताराम नाईक (B.Sc, B.ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक कृष्णा हे सिंधुदुर्ग येथे राहतात. एकूण 20 वर्षे ते शिक्षण क्षेत्रात गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. ते सध्या एम आर नाईक विद्यालय कोनाळकट्टा या हायस्कुलमध्ये कार्यरत आहेत.

सर हायस्कुलमध्ये शिकत होते तेव्हा शिक्षक दिन शाळेत शिक्षक बनून साजरा केला जायचा. तेव्हा ते 10 वीत असताना शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बनले होते. तेव्हापासून पुढे शिक्षक बनण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते व त्याप्रमाणे Bsc झाल्यानंतर b.ed पूर्ण केले.

सुरुवातीस मांगेली सारख्या दुर्गम भागात विनाअनुदानित शाळेत त्यांनी काम केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्यादानाचे पवित्र काम त्यांनी अंगिकारले. एक मात्र खरं आहे की विद्यार्थ्यांना शिकविण्यातला आनंद आणखीन दुसरा नाही जो ते आजपर्यंत अनुभवत आहेत.

त्यांचे मांगेली गावातील विद्यार्थी जे आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी त्यांचा गावाच्या वतीने केलेला यथोचित सन्मान हाच त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणावा लागेल कारण विद्यार्थी हेच आपले खरे मूल्यमापक असतात असे त्यांना वाटते. SSC परीक्षेत आतापर्यंत त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. त्याबद्दल सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळामार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.

आज शासनाच्या काही नवीन निकषानुसार शाळांमधील शिक्षक संख्या कमी झाली आहे त्यामुळे शिक्षकांवरील workload वाढले आहे. विषयांना पुरेसा न्याय देणं थोडं कठीण झालंय. Onlineअध्यापना पेक्षा offline अध्यापन किती परिणामकारक आहे हे आपण कोरोना काळातील अनुभवातून नक्कीच शिकलोय. आजचा विद्यार्थी social media च्या आहारी खूप गेलाय त्यामुळे अध्ययनाकडे फार दुर्लक्ष होताना दिसतंय यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना वेळीच निर्बंध घालायला हवेत. असे त्यांना वाटते.

ज्यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करायचंय त्यांनी केवळ आर्थिक स्थैर्यासाठी म्हणून या क्षेत्राकडे न वळता आपल्याला देशाचे सुजाण व सुशिक्षित पिढी घडवण्याची संधी मिळणार आहे या दृष्टिकोनातून या पेशाकडे वळावे असे त्यांना वाटते.