S R Dalvi (I) Foundation

[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”Tr. Krushna Naik ” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1652249242351{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”8042″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”Tr. Krushna Naik ” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]आज आपण श्री.कृष्णा शांताराम नाईक (B.Sc.B.Ed) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री.कृष्णा हे गेली 20 वर्षे मी शिक्षण क्षेत्रात गणित विषयाचे अध्यापन करत असून सध्या ते एम आर नाईक विद्यालय कोनाळकट्टा या हायस्कुलमध्ये गेल्या 4 वर्षापासूनशिकवत आहेत. त्याआधी 16 वर्षे ते माध्यमिक विद्यालय मांगेली मध्ये शिकवत होते.

श्री कृष्णा हे हायस्कुलमध्ये शिकत असताना ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. त्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक बनवले जायचे. इयत्ता10 वीत असताना श्री कृष्णा शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बनले होतो. त्याच दिवसापासून कृष्णा यांनी शिक्षक बनण्याचे ध्येय निश्चित केले आणि तोच प्रवास पूर्ण करण्यासाठी शालेय शिक्षण पूर्ण करुन त्यांनी B.Sc. झाल्यानंतर B.Ed. पूर्ण केले.

‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी 

सुरुवातीस शिक्षक कृष्णा यांनी मांगेली सारख्या दुर्गम भागात विनाअनुदानित शाळेत काम केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्यादानाचे पवित्र काम अंगिकारले. विद्यार्थ्यांना शिकविण्यातला आनंद आणखीन दुसरा नाही जो शिक्षक कृष्णा आजपर्यंत अनुभवत आहेत. असे ते म्हणतात.

अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:

शिक्षक श्री कृष्णा यांनी शिकवलेले मांगेली गावातील विद्यार्थी जे आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी कृष्णा यांच्या गावच्या वतीने केलेला यथोचित सन्मान हाच त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे कारण विद्यार्थी हेच आपले खरे मूल्यमापक असतात’ असे त्यांना वाटते.

अचीवमेंट:

शिक्षक कृष्णा यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी SSC परीक्षेत आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. त्याबद्दल सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळामार्फत  शिक्षक कृष्णा यांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज:

आज शासनाच्या काही नवीन निकषानुसार शाळांमधील शिक्षक संख्या कमी झाली आहे त्यामुळे शिक्षकावरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे विषयांना पुरेसा न्याय देणं थोडं कठीण झाल आहे.
आजचा विद्यार्थी सोशल मिडियाच्या खूप आहारी गेलाय त्यामुळे अध्ययनाकडे फार दुर्लक्ष होताना दिसतंय यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना वेळीच निर्बंध घालायला हवेत. ऑनलाइन अध्यापनापेक्षा ऑफलाइन अध्यापन किती परिणामकारक आहे हे आपण कोरोना काळातील अनुभवातून नक्कीच शिकलोय.असे मत शिक्षक कृष्णा यांनी मांडले.

शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला: 

ज्यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करायच आहे  त्यांनी केवळ आर्थिक स्थैर्यासाठी म्हणून या क्षेत्राकडे न वळता आपल्याला देशाचे सुजाण व सुशिक्षित पिढी घडवण्याची संधी मिळणार आहे या दृष्टिकोनातून या पेशाकडे वळावे असा मोलाचा शिक्षक कृष्णा यांनी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना दिला.

[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]

Scroll to Top