आज आपण सौ.मानसी महेश साळुंखे यांचा शैक्षणिक जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचे शिक्षण बीएसी बी.एड.असून त्यांनी डी.एस.एम एज्युकेशन.देखील केले आहे.शिक्षिका मानसी या वसई येथे राहतात व त्यांना एकूण १० वर्षांचा शैक्षणिक अनुभव आहे व सध्या त्या रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र ता. वसई. जिल्हा.पालघर या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत.
लहानपणा पासूनच त्यांना शिक्षकां विषयी आदराची भावना होती. खाजगी शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करत असताना ऑफ तासाला वर्गात जाण्याची त्यांना संधी मिळाली. आणि यामधून त्यांना शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करावे असे मनापासून वाटले. सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या.
त्यांनी बीएडला प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते. कुटुंबाला एक हातभार म्हणून त्यावेळी त्यांनी एका खाजगी शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम केले. ते करून बि.एड.च्या नियमित तासिकेला उपस्थित राहताना त्यांची तारेवरची कसरत होत होती. शिक्षक म्हणून 10 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव अविस्मरणीय असा आहे की, रयत शिक्षण संस्थे अंतर्गत वाशी या ठिकाणी तिसऱ्या विज्ञान परिषदेमध्ये पोस्टर सादरीकरणासाठी त्यांची निवड झालेली होती.याच दरम्यान अंघोळीच्या उकळत्या पाण्याने त्यांचा चेहरा पूर्ण भाजला त्यावेळी चेहऱ्यावर त्यांना उन्हाचा खूप त्रास होत होता. तरीसुद्धा त्यांनी त्या अवस्थेत वाशी या ठिकाणी जाऊन पोस्टर सादरीकरण केले. परंतु त्यांना ते या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे सादरीकरण करता आले नाही, याची त्यांना अजूनही खंत वाटते.
शिक्षकाने पारंपरिक शिक्षण पद्धती बरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे फक्त पुस्तकातील ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात ग्रहण केलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच एक शिक्षक म्हणून आपण स्वतः जिज्ञासू राहून हीच जिज्ञासु वृत्ती आपल्या मुलांमध्ये निर्माण करता आली पाहिजे असे त्यांना वाटते.
शिक्षकी पेशा हा ज्ञानदानाचा पवित्र पेशा आहे समाजाचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आदर्श नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर समाजाने देऊ केली आहे आपण या जबाबदारीला योग्य न्याय दिला पाहिजे आपले उत्तरदायित्व आपण योग्य प्रकारे निभावणे आवश्यक आहे इतर पेशाप्रमाणे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवता कामा नये असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.