S R Dalvi (I) Foundation

Tr. Neeti Nagarkar

Tr. Neeti Nagarkar

मी, सौ नीती संदीप नगरकर (M.Sc, ECCE, Professional Trainer for Jolly Phonics & Grammar, accreditated from Jolly Learning Ltd, UK, Consultant for Handwriting Without Tears, USA. ) मी गेली 20 वर्ष Early years educator & Teacher Trainer म्हणून कार्यरत आहे. 12 वर्ष मुंबईतील प्रतिष्टीत शाळेत काम करून आणि अनुभव घेऊन 2013 मध्ये मी स्वतः ची ‘Kids World Education Consultants ‘ स्थापना केली.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?

M.Sc नंतर मला पुणे विद्यापीठात M.Phil ला ऍडमिशन मिळाले होते. त्याच वर्षी मी अभिनव विद्यालय या शाळेत leave vacancy मध्ये इयत्ता 5-6 ला शिकवले. वर्ग शिक्षक म्हणून काम केले आणि मला ते काम करणे मला खूप आवडत होते. मुलांबरोबर राहताना खुप वेगळा अनुभव मिळत होता आणि आनंददायी वाटत होता. त्याच वेळी मि पूर्ण वेळ शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?

खर तर नाही, फक्त BEd करायचं कि ECCE हाच निर्णय मला घ्यायचा होता. ECCE खूप इंट्रेस्टिंग आहे कारण इथे मला फाउंडेशन स्टेज ला काम करता येत. आणि हे काम करणे खुप मजेदार आणि उत्साही आहे.

शिक्षक म्हणून 20 वर्षांच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे

*आतापर्यंत मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवले आहे आणि जेव्हा आजही मुले व पालक शिक्षक दिनाच्या दिवशी भेटतात किंवा फोन करतात, आणि म्हणतात  ‘तुम्हीच आहात ज्यांनी आमचा हात धरला आणि आम्हाला लिहायला-वाचायला शिकवले.’ हे ऐकल्यावर समाधान मिळते आणि वाटते हीच तर खरी आपल्या कमची पोचपावती आहे.
*मी देशभरात आणि बाहेर अनेक जॉली फोनिक्स प्रोजेक्ट्स खाजगी इंग्रजी शाळांमध्ये राबविले आहेत. 2015-16 ला मला सरकारी शाळेमध्ये असे प्रकल्प राबविण्याची संधी मिळाली आणि तो टर्निंग पॉइंट ठरला. त्या शाळेत गावातील, खेड्यातील मुले खुप लांबून शाळेत येतात. काही शिक्षक ही मुलांना शाळेत घेऊन येत असत.त्यांचे पालक अशिक्षित मात्र आपल्या पाल्याला शिकवण्याची त्यांची इच्छा असते. त्यांच्यासाठी इंग्रजी ही खरी परदेशी भाषा आहे. मी 7 ZP शाळेमध्ये पायलट प्रोजेक्ट केला होता आणि सर्व शिक्षकांचे आभार की त्यांच्या सहकार्य ने तो प्रोजेक्ट  यशस्वी रित्या पूर्ण झाला. 3 महिन्यात शाळेतील मुलांनी  इंग्रजी वाचन आणि लेखनामध्ये उल्लेखनीय सुधारणा केली. हे यश पाहुन अकोला महापालिका आयुक्त यांनी मला बोलावून शहरांतल्या सगळ्या 33 शाळांमध्ये ही मेथड  रबावायला सांगितली.
आणि त्याच्या पुढच्या वर्ष मला अकोला जिल्हा दत्तक प्रकल्पसाठी मान्यता मिळाली. सुमारे 950+ शाळा, सुमारे 2000 टीचर्स चे प्रशिक्षण आणि 9000+ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सध्या साथीच्या रोगाचे मूळ हे प्रकल्पावर आहे. हे प्रोजेक्ट संपूर्ण पणे Jolly Learning Ltd, UK यांच्या कडून स्पॉन्सर केले जातात आणि आपण त्याचा वापर केला पाहिजे. असे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दर्जेदार शिक्षण आपल्याला देतात.असाच जिल्हा दत्तक प्रकल्प मी नोव्हेंबर २०२१ ला सिक्कीमला सुरुवात केली आहे. 450 शिक्षकांचे प्रशिक्षण ही झाले आहे आणि आता जानेवारी 2022 पासून वर्गात अंमलबजावणी सुरू होईल.

तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?

मला आतापर्यंत अनेक पारितोषिक, सन्मान मिळाले आहेत पण  ZP शाळेमधील मुलांची इंग्रजी विषयातील झालेली सुधारणा,फक्त 3 महिन्यात पहिली दूसरीतील मुले इंग्रजी वाचू – लिहू शकली ही माझ्यसाठी मोठी Achievement आहे.
तसेच इथे मी उल्लेख करू इच्छिते की I am the first trainer to introduce Jolly Phonics method in Bhutan.

समाजात शिक्षक-विद्यार्थी  यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?

सर्वच शिक्षक तर प्रशिक्षण घेतात, मेहनत घेतात, विशेषतः लहान गावांमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यात शिकवतात.मुलांनाही ते खूप आवड आणि त्यांच्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याचा व आत्मसात करण्याचा उत्साह आहे .या मुलासाठी जर आणखी मुलभुत व दर्जेदार सुविधा पुरवता आल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?

सल्ला देण्याइतकी तर मी मोठी नाही पण माझ्या अनुभवाने सांगू इच्छिते की शिक्षक हा पेशा नाही, Passion आहे. मनापासून मुलांबरोबर काम करा आणि त्याचे परिणाम आपोआपसमोर दिसु लागतील . त्या वेळी शिक्षक म्हणून जे समाधान आपल्याला  मिळेल ते शब्दात नाही मांडता येतं फक्त अनुभवता येतं.
Scroll to Top