आज आपण शिक्षिका सौ. नुतन युवराज इरकर यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका नुतन पालघर या ठिकाणी राहतात. त्यांचे शिक्षण (B.A. DED) असून त्या सध्या जिल्हा परिषद शाळा, खोडावेपाडा तालुका -पालघर या शाळेत कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रात एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे.
शालेय शिक्षण सुरू असल्यापासून त्यांनी शिक्षिका व्हावे हे त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यांचे वडिल टेलर होते तरीही खूप कष्ट करून त्यांनी यांना शिकवून शिक्षिका बनवले. या प्रवासात त्यांच्या आईचेही तितकेच कष्ट आहेत.
‘शिक्षक ‘हे क्षेत्र निवडताना त्यांना अडचणी आल्या नाहीत. वसई तच ‘बाजीपूर वनिता विनालय ‘ येथे त्यांनी DEd केले. थोडी फार आर्थिक अडचण होतीच. पण त्यांच्या आई वडिलांनी कधीच ते त्यांना जाणवू दिले नाही. आई वडिलांच्या आर्शिवादामुळे त्या DED झाल्या व त्याच वर्षी नोकरीचा काॅल आला व त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्ये रूजू झाल्या.
एकूण सेवा कालावधीत अनेक छोटे मोठे अविस्मरणीय अनुभव प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत.
त्यांची पहिली नेमणूक १९९९ साली डहाणू येथे झाली. त्या वसई ते डहाणू अपडाऊन करत असे. २६ जुलै २००२ च्या दिवशी पाऊस जोरदार होता. त्या शाळेत निघाल्या असताना सोबत त्यांच्या शिक्षिका ही होत्या. त्यांची पालघर पर्यंत गाडी व्यवस्थित गेली. परंतु पालघरला जी गाडी थांबली ती रात्रभर थांबली. सगळीकडे पाणीच पाणी होते. त्या व त्यांच्या बरोबर असणारा शिक्षिका रात्रभर गाडीत बसल्या. भीती खूप वाटत होती. तो प्रसंग त्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीत.
दुसरा क्षण एक आनंदाचा त्या आपल्या सोबत शेअर करू इच्छित आहेत तो म्हणजे त्यांना मनापासून खूप इच्छा होती की, त्यांचा वर्ग व त्यांचे शैक्षणिक स्टाॅल माननीय सचिव नंदकुमार साहेब यांनी पहावे. आणि खरंच माननीय नंदकुमार साहेब यांनी वाडा येथे त्यांचा गणित व सायन्स या शैक्षणिक स्टाॅलला भेट देऊन त्यांचे कौतुक केले. याचे श्रेय त्यांनी त्यांच्या केंद्र प्रमुख मॅडम ,व त्यांचे पती व घरांतील कुटुंब यांना दिले आहे.
दरवर्षी त्यांच्याकडे येणारा वर्ग १०% प्रगत करण्यासाठी त्या प्रामाणिक प्रयत्न करतात . त्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य बनवून विद्यार्थ्यांचा सराव त्या घेतात .तिच त्यांच्यासाठी अचीवमेंट आहे.
लाॅकडाऊनच्या काळात त्यांचे विध्यार्थ्यानी राज्य पातळीवर स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस मिळविणे.हीच त्यांच्यासाठी अचीवमेंट आहे.
NEP नुसार शैक्षणिक क्षेत्रात भविष्यात अनेक सकारात्मक बदल होणे त्यांना अपेक्षित आहे. तसेच तंत्रज्ञान व कौशल्य विकास याची योग्य सांगड घालून शिक्षण देणे व घेणे हि काळाची गरज आहे असे त्यांना वाटते.