S R Dalvi (I) Foundation

Tr. Prabhakar Kakade

Tr. Prabhakar Kakade

“एक पुस्तक, एक पेन, एक मुल आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकते ”
आज आपण श्री प्रभाकर रामराव काकडे (एम ए बी एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. प्रभाकर काकडे हे औरंगाबाद येथे राहत असून गेले 35 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि सध्या ते जि प प्रा शा गाढे जळगाव ता जि औरंगाबाद या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत.
श्री. प्रभाकर काकडे यांचे वडील शिक्षक होते ते ज्या शाळेत शिकवण्याचे काम करायचे ती शाळा एक शिक्षकी शाळा होती. श्री.प्रभाकर जेव्हा 10 वीला होते तेव्हा बऱ्याचदा त्यांचे वडील मीटिंग ला गेले की तेच शाळा चालवायचे आणि तेंव्हापासून त्यांच्यामध्ये शाळेची, या कार्याची आवड निर्माण झाली.
शिक्षण क्षेत्र निवडताना अडचणी:
हे क्षेत्र निवडताना प्रभाकर यांना फारशा काही अडचणी आल्या नाहीत. त्यांची ओरिजनल TC कॉलेज मध्ये होती तेव्हा त्यांनी डुप्लिकेट TC काढली पण त्यांना  Admission काही मिळत नव्हते त्यामुळे त्यांचा प्रवेश पण जवळ जवळ रद्द च होणार होता.मात्र तसे काही झाले आणि सर्व सुरळीत पार पडले.
अविस्मरणीय अनुभव:
1999 ला मुख्याध्यापक प्रभाकर यांची बदली झाली होती. त्या वेळेस त्यांच्या शाळेतील सर्वात मोठा विद्यार्थी साहेबराव हा त्यांची बदली झाली होती त्या शाळेत आला आणि तुमच्याच शाळेत यायचे हा त्याचा हट्ट करू लागला. आपण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात अशी जागा मिळवू शकलो ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाही.
Achievement:
श्री. प्रभाकर काकडे हे सतत 8 वर्षे एक शिक्षकी शाळेवर होते. एक शिक्षक 5 वर्ग 216 विद्यार्थी तरी चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सतत तीन वर्षे 100%लागत होता. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मा. CEO साहेबांचे समक्ष “आडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांसारखे विद्यार्थी दाखवा आणि 1000 रु चे बक्षीस मिळवा”असे बक्षीस ठेवले होते.ही प्रभाकर यांच्यासाठी खुप मानाची आणि मोठी गोष्ट आहे.
शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी बदल:
शिक्षकांनी आपले ज्ञान आद्ययावत ठेवण्यासाठी तंत्र ज्ञानाचा वापर करून अध्यापन करावे YouTube वेबसाईड चा वापर करावा,पुस्तके वाचावी, विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनावर भर द्यावा असे मत प्रभाकर काकडे म्हणालेआणि त्यासाठी शिक्षक मित्रांना प्रशिक्षण देण्याची ही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षक होणाऱ्यांसाठी सल्ला:
काळाच्या बदलानुसार स्वतः चे अध्यापना मध्ये बदल करून  नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करावा. 21 व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी असा सल्ला मुख्याध्यापक प्रभाकर काकडे यांनी दिला.
English Marathi