नमस्कार मी श्री. प्रदीपकुमार सुरेश कळसकर (एम ए बीएड-हिंदी). मी स्टेट बोर्ड ला 6 वर्षे आणि सी बी एस ई ला 7 वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले असून सध्या बोहरा सेंट्रल स्कूल, पारोळा येथे शिक्षक म्हणून काम करत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
असे स्पेसिफिक सांगता येणार नाही मात्र मी 10 वीत असल्यापासूनच मला शिक्षक होण्याची इच्छा मनात तयार झाली होती.आपण ही मुलांना शिकवायचे आणि मुलांना घडवायचे हा विचार मनात सुरु होता आणि तेच स्वप्न मी आता सत्यात उतरवले आहे.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र म्हणून निवडताना अडचणी आल्या का?
अडचणी तर आल्याच. बऱ्याच जणांनी हे क्षेत्र काही कामाचे नाही, यामध्ये मजा नाही हे आणि असे बरेच निगेटिव बोलून हे क्षेत्र न निवडण्याचा सल्ला दिला,पण मला मिळालेला माझ्या सहशिक्षकांचा, गुरुजनांचा आशिर्वाद आणि माझ्या पत्नीची साथ यांच्या मदतीचा मी माझा घेतलेला निर्णय पूर्ण करु शकलो.
शिक्षक म्हणून 7 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
मी येथे माझा एक अनुभव सांगू इच्छितो, 2013-14 चे वर्ष, दिपक शिरसाठ नावाचा विद्यार्थी होता. क्लास मध्ये खुप खोडकर, कुठल्याही शिक्षकांचे न एकणारा.एक दिवस त्याच्या वर्गातल्या मुलीं रडत-रडत माझ्याकडे आल्या आणि त्याची तक्रार करू लागल्या. मी त्या मुलींना शांत केले, आणि काय प्रकार घडला तो जाणून घेतला.मग मी त्या क्लासटीचरला घेऊन त्या मुलाच्या वर्गात गेलो आणि त्या मुलाला सर्वांच्या समोर कानाखाली मारली, त्याला मारणे त्यावेळेस खुप गरजेचे होते.कारण मुलांना त्यावेळेस समजावून उपयोग नव्हता. शाळेच्या प्रिन्सिपल सरांनी त्या मुलाला 1 आठवड्यासाठी सस्पेंट करायला सांगितले. त्याच्या आईने ही त्याने केलेले प्रकार समजल्यावर त्या मुलाच्या कानशिलात लगावली होती.त्यानंतर 2-3 दिवस त्याला शाळेत घेतले गेले नाही.
पण नंतर जो दिपक शिरसाठ शाळेत आला तो पुर्विचा दिपक नव्हताच. त्याच्यात झालेला हा बदल मी व शाळेतील सर्वांना जणवला.त्यानंतर दिपक 10 वी बोर्ड परीक्षेमध्ये 84% मिळवून शाळेतून पहिल्या 10 मध्ये मिरिट मध्ये आला. निकाल जाहिर होताच तो शाळेत आला आणि चक्क माझ्या पायावर येऊन पडला आणि म्हणाला सर त्या दिवशी तुम्ही मला मारले नसते इतर सरांप्रमाणेच जर रागावून सोडले असते तर आज मी 10वी बोर्ड परीक्षा मध्ये आलोच नसतो.आज तोच दिपक IIT मध्ये एका चांगल्या पगाराच्या पैकेज मध्ये काम करत आहे.हा प्रसंग अनुभव मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही.
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?
मी सी बी एस ई स्कूल मध्ये जुलै-2015 ला लागल्या नंतर प्रामाणिक पणे माझे काम करत राहिलो आणि त्याचा फायदा मला 2018-19 मध्ये झाला. सी बी एस ई-10/12 वी बोर्ड परीक्षा मध्ये केंद्र प्रमुख म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली.
माझी दूसरी अचिवमेंट म्हणजे 2019-20 मध्ये मला जळगांव तालुका सी बी एस ई 10/12 वी परीक्षा साठी पुन्हा पर्यवेक्षक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली..
समाजात शिक्षक- विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे?
समाजात पालकांनी बदलने खुप गरजेचे आहे, कारण फक्त शिक्षकांवर अवलंबुन न रहता मुलांकडे आई-वडील म्हणून लक्ष्य देणे ही खुप मोठी काळाची गरज आहे, कारण शिक्षकांकडे मुलगा फक्त 7 ते 8 तास असतो, बाकी तो जास्त वेळ आई-वडिलां सोबत असतो त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ?
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्या शिक्षकांनी काळाप्रमाणे बदलले पाहिजे हेच या प्रसंगी सांगावेसे वाटेल.