आज आपण श्री.प्रज्वल साठम,(B.Sc, B.Ed. ) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रज्वल सर हे अहमदनगर येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते Indus world school या शाळेत कार्यरत आहेत.
शिक्षक हा समाजशील प्राणी आहे अगदी त्याप्रमाणे गावातील सर्वच शिक्षक गावच्या कार्यात, अडीअडचणीत, सुखा-दुःखात सोबत राहायचे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावण्याचे काम त्यांनीच गावकऱ्यांनीच केले त्यांच्यामुळेच लहान असल्यापासूनच मला शाळा, गुरुजी खूप आवडू लागले त्यांना समाजात असणारे आदराचे स्थान पाहून तेव्हाच मी पण शिक्षक व्हायचे ठरवले. आणि माझे हे स्वप्न मी पूर्ण केले.
शिक्षक या क्षेत्राची निवड झाली त्या दिशेने शिक्षण चालू झाले डीएड पूर्ण केले. मात्र नोकरी साठी अनेक ठिकाणी इंटरव्यू द्यावे लागले होते . अखेर बरेच इंटरव्यू दिल्यानंतर प्राथमिक आश्रम शाळा येथे शिक्षक म्हणून नोकरी मला मिळाली आणि तिथे रुजू झालो.
शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी मानसिकता व कौशल्य विकास करावा लागला. प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव मिळण्यासाठी एका ओळखीच्या शाळेत दोन आठवडे शिकवले. त्याचा खूप फायदा झाला.
माझ्या शाळेची मान्यता गेल्यानंतर मी व माझ्या सहकाऱ्यांनी मिळून खूप स्ट्रगल करून पुन्हा शाळा मिळवली व पुन्हा शिक्षक म्हणून रुजू झालो. तो क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे.
माझ्या मते समाजात विद्यार्थ्याकडे फक्त गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर त्याला सुसंस्कारित नीतिमूल्यांची जोपासना करणारा खरा माणूस बनवण्याचे महान कार्य शिक्षक का कडून अपेक्षित आहे कारण शिक्षक हाच समाजात परिवर्तन घडवून शकणारा समाजशील प्राणी आहे. यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल होणे गरजेचे आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे असेल त्यांना मी एवढेच सांगेन समाजात राहून सामाजिक कार्य सोबत शैक्षणिक कार्य करता येण्याचे पवित्र क्षेत्र म्हणून या क्षेत्राची ओळख आहे एका शिक्षकातून च भारताचा राष्ट्रपती झालेला आपण पाहिले आहे त्यामुळे हे क्षेत्र खूप चांगले आहे.