S R Dalvi (I) Foundation

Tr.Pratibha Bapurao Patil

Tr.Pratibha Bapurao Patil

आज आपण श्रीमती प्रतिभा बापूराव पाटील  ( D.Ed B.sc,B.A.,M A.(marathi )M.A(English) ) यांचा शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती प्रतिभा कन्नड जिल्हा औरंगाबाद इथल्या असून गेली २२ वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतापूर’ या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत. औरंगाबाद जिल्हयातील कन्नड तालुक्यातील जैतापूर या एकमेव शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे व त्यांना याचा अभिमान आहे कि आज त्या अशा आदर्श शाळेत काम करत आहेत.

त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी या शाळेतुन त्यांच्या या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. समजायला लागले तेव्हा पासून त्यांनी मनाशी ठरवलं की आऊ साहेब जिजाऊ यांची पुण्यतिथि 17 जून व आपला जन्म दिवस 17 जून आहे. जिजाऊंना अभिवादन करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकलं व तेव्हा पासूनच ठरवलं कि जिजाऊंनी जसा शिवबा घडवला तसा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थी स्वताःचा समजून एक आदर्श विद्यार्थी, आदर्श व्यकती, आदर्श नागरीक घडवायचा.

लहानपणापासूनच त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते व घरी क्लासेस देखील घ्यायचे. त्यांच्या घरात एकदम शिस्तीचे वातावरण होते व त्यामूळे त्यांना नेहमी वडिलांसारखे आदर्श शिक्षकच व्हावेसे वाटत असे. लहानपणी खेळ खेळताना शिक्षकांची भूमिका त्यांचीच असायची.

सुरवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडतांना त्यांना काही अडचणी आल्या, त्या वेळेस १०वी पास केल्यानंतर D.ed ला ऍडमिशन मिळत असे परंतु २ महिने वय कमी भरल्यामुळे त्यांना ऍडमिशन मिळाले नाही पण नाराज न होता त्यांनी खूप अभ्यास केला. १२वी ला सायन्स घेतलं व जोमाने अभ्यास केला. १२वीला चांगले मार्क्स मिळाले तसे लगेच त्यांनी D.ed ला अर्ज करायला सुरुवात केली. पहिल्या लिस्ट मध्ये नाव नाही आले तेव्हा त्या नाराज झाल्या परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना आधार दिला व सांगितले “अजून दोन राउंड बाकी आहेत.” व तसेच झाले दूसरी लिस्ट लागली त्यांचे नावं त्या लिस्ट मध्ये आले व त्यांना औरंगाबाद चे कॉलेज मिळाले. त्यांनी आता महत्वाची पायरी पार केली होती पुढील दोन वर्ष त्यांनी खूप अभ्यास केला व चांगले मार्क्स मिळवून त्यांनी त्यांचे D.ed पूर्ण केले. आता त्या स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत होत्या पण लगेच पूर्ण होईल ते काही स्वप्न असते का? परत वाट पाहणं आलंच निवड मंडळाच्या जागा निघाल्या पण फक्त कॅटेगरी साठीच होत्या. आता मात्र त्यांना खूप दु:ख झाले, पण म्हणतात ना सब्र का फल मिठा होता है, असे झाले की नविन जाहिरात आली त्यांनी अर्ज केला, निवड झाली व पहिली शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली तो दिवस म्हणजे 17/07/2000  तसा 17हा त्यांचा लकी नंबर आहे कारण की जन्मदिनांक,प्रथम नेमणूक, सध्याची कार्यरत शाळा हजर दिनांक पण 17च. आता त्यांचे स्वप्न साकार झाले होते. आणि तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस  होता.

त्यांच्या 22 वर्षाच्या प्रवासातील अविस्मरणीय अनुभव असा आहे की त्यांची पहिली नेमणूक कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथील B.sc D.ed शिक्षक म्हणून झाली होती. तेथील मुख्याध्यापकांनी लगेच त्यांना  5वी ते 7वी चे विज्ञान व हिंदी विषय अध्यापनास दिले. त्यांच्यासाठी नवीन शाळा, नवीन काम आणि  सोबत भरपूर उत्साहही होता. त्या पूर्ण तयारीनिशी वर्गावर जाऊन अध्यापन करायच्या. त्यांना 5वी नवोदय ची तयारी करून घ्यायची होती, तसे पाहिले तर भाषिक अडचण पण होतीच कारण ते गाव बंजारा समाजाचे होते. खूप प्रयत्नांनी तेथील एक विद्यार्थी 2007 साली नवोदय साठी पात्र ठरला. त्यावेळी त्यांचं खूप कौतुक झालं व त्यांना खूप आनंद झाला त्यादिवशी. तसेच दूसरे एक सांगायचे म्हणजे आताच्या शाळेत देखील  जून 2019 ला बदली झाल्यावर वर्ग 2री दिला  वर्गातील पटसंख्या 17 होती व आता त्याच वर्गातील पट संख्या 34 आहे. त्या वेळी मुख्याध्यापक सरांनी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी संपूर्ण गावासमोर त्यांचा सत्कार केला, कारण त्या दिवशी शाळेत सगळयाता जास्त पट संख्या असणारा त्यांचा वर्ग होता .

आज त्यांना 22वर्ष झालेतं या क्षेत्रात. पण जेव्हा विद्यार्थी भेटतात व सांगतात की मॅम मी इंजिनिअर आहे, मी गायक आहे, माझा व्यवसाय आहे प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी झेप घेत आहेत. आपण त्यांना ते वयाने  मोठे झाल्यामुळे ओळखत नाही पण जवळ येऊन ते चौकशी करतात व आठवण करून देतात. की मॅम मी तूमचा विद्यार्थी तोच त्यांना पुरस्कार वाटतो आणि हीच त्यांची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे असे वाटते.

आज आपण पाहतो कि आधीच्या काळात समाजासाठी शिक्षक हा अविभाज्य भाग होता. त्याला खूप महत्त्वाचे स्थान होते. पण काळ आता बदलत चालला आहे शिक्षकाचे स्थान कूठे तरी कमी होतांना दिसत आहे. त्या साठी पालकांनी आधी आपल्या पाल्यांला चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. व शिक्षकाने देखील शिक्षक पेशा नसून एक साधना आहे हे लक्षात ठेवायला हवे. पिढ्या चांगल्या  घडविण्याचे काम हा एक शिक्षक करत असतो व त्याला समाजात एक चांगले स्थान मिळाले की तो आपसुकच चांगले काम करतो. म्हणून मला वाटते की शिक्षकांनी देखील आपले  कर्तव्य चोख पालन करावं व पालकांनी देखील शिक्षकांचा आदर करावा. कारण विद्यार्थी हे दैवत मानले व शिक्षक हा गूरू मानला तर सव॔ काही सोप होईल असा सल्ला त्यांनी विद्यार्थी व शिक्षांकना दिला.

शिक्षक हा समाज घडविण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे मी तर म्हणेन एका आई नंतर त्या बाळाची कोणी आई असेल तर तो शिक्षक असतो. शिक्षक   होतांना एक पवित्र काम आपल्या हातून घडत असते व पवित्र काम करतांना आपण आपले सर्वस्वपणाला लावून स्वताला झोकून द्यायचे असते. शिक्षक होणं म्हणजे भावी आदर्श पिढी घडवणं. स्वताला पूर्ण झोकून देऊन काम करू शकतो त्यानेच या पवित्र क्षेत्रात यायला हवे असे त्यांना वाटते.

English Marathi