S R Dalvi (I) Foundation

Tr. Pratibha Junnare

Tr. Pratibha Junnare

आज आपण श्रीमती प्रतिभा तुषार जुन्नरे M.A English, D.Ed,M.Ed  Diploma in school management 3 months NCC training at OTA Gwalior in 2014) यांच्या शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. प्रतिभा या गेल्या 14 वर्षांपासून गोखले एज्युकेशन  सोसायटीचे  एच. ए. एल हाईस्कूल इंग्लिश मीडियम ओझर टाउनशिप येथे D. Ed बेस वर कार्यरत असून 8 वर्षांपासून NCC OFFICER (ARMY WING) या पदावर काम करत आहेत.
प्रतिभा यांचे वडील जरी या क्षेत्रात नसले तरी, शिक्षक आणि शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात आदर होता. शिक्षक होऊन आपल्याला सामाजिक कार्य करता आले तर योग्यच होईल ही भावना त्यांच्या मनात होती. अर्थात  प्रतिभा  यांच्या मनात ही तेच बीज रुजवले गेले आणि पावले आपोआपच या दिशेने पडत गेली. आज प्रतिभाजी या कार्याचा भाग आहेत याचा त्यांच्या कुटुंबातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. प्रामुख्याने त्यांच्या आदरणीय वडिलांना.

अचीवमेंट: 

NCC च्या माध्यमातून मुलींच्या मनात राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम रुजवणे ही जिकरीचे काम होते. प्रत्येक मुलीमध्ये असलेले कौशल्य ओळखून तिला काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करणं हे ही अवघड काम होतं. NCC चे प्रशिक्षण आणि विविध शिबिरं यांच्या माध्यमातून मुलींना या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. कु.निधी देवरे, कु. रुपाली माळी, कू. दिपाली या विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर जाऊन शाळेचे, समाजचे आणि कौटुंबाचे नांव उंचावण्यासाठी कठीण असे प्रयत्न केले. त्यांचा प्रतिभा यांना कायम अभिमान आहे.
शिवाय त्यांना देखील NCC TRAINING प्रशिक्षणा दरम्यान होणाऱ्या ‘फायरिंग’ या धाडसी प्रकारात ‘सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात आले होते.


शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज वाटते:

सध्या ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. लेखन वाचन आणि इतर कौशल्ये विद्यार्थी विसरला, मागे पडला. आता सर्व काही सुरळीत झाले आहे तर शिक्षकांनीही कसून कामाला लागणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वानीच प्रयत्न करणे गरजेचं आहे.असे मत शिक्षिका प्रतिभा यांनी मांडले.

शिक्षक व्हायचे आहे त्यांना काय सल्ला दयाल:

शिक्षक ही नोकरी नसून ते एक व्रत आहे. निव्वळ पैसे कमावणे हा उद्देश बाजुला सारून आपल्याला विद्यार्थ्यांना काही वेगळं देता येईल का, त्यांच्या ठिकाणी आवश्यक मूल्यांची रुजवण करता येईल का यासाठी भविष्यातील शिक्षकांनी प्रयत्न करावा. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे हे ओळखून इमाने इतबारे समाजाचं ऋण आपण कसे फेडू शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा.